loading...

चालू घडामोडी : Daily Current Affiars 10 September 2019

loading...

2019 च्या स्मार्ट सिटी क्रमवारीत नागपूर पुन्हा अव्वल स्थानी
 • स्मार्ट सिटी क्रमवारीत गेल्या आठवडय़ात दुसऱ्या क्रमांकावर असलेले नागपूर शहर आता पहिल्या क्रमांकावर आले आहे.
 • अहमदाबाद दुसऱ्या स्थानावर आहे.
 • स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ला केंद्र सरकारच्या गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयाने स्मार्ट सिटीच्या क्रमवारीत प्रथम क्रमांक दिला आहे.
 • महापालिकेला‘बेस्ट सस्टेनेबल अ‍ॅण्ड लिव्हेबल’पुरस्कार शाश्वत विकासाच्या दृष्टीने नागपूर महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.
 • याच उपक्रमाची दखल घेत महापालिकेला पाचव्या ‘अटल शास्त्र मार्केनॉमी’ पुरस्कार २०१९ या सोहळ्यामध्ये ‘बेस्ट सस्टेनेबल, लिव्हेबल, ग्रीन, क्लिन अ‍ॅण्ड इक्ल्यूझिव इन्फ्रा सिटी’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

चंद्रिमा शहा - भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या पहिल्या महिला अध्यक्षा
 • प्रख्यात जीवशास्त्रज्ञ चंद्रिमा शहा यांची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे.
 • 2020 ते 2022 पर्यंत त्या भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
 • याआधी त्या  दिल्लीच्या राष्ट्रीय रोगप्रतिकार संस्थाच्या संचालिका होत्या.
 • या संस्थेची स्थापना 1935 मध्ये झाली होती, त्यावेळी ही संस्था "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया" या नावाने ओळखली जात होती.
 • 1970 पासून ही संस्था भारतीय 'राष्ट्रीय विज्ञान अकादमी' नावाने ओळखली जाते.
 • ही विज्ञानातील सर्व शाखांमधील वैज्ञानिकांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च संस्था आहे.

'जन-धन'मध्ये सहा हजार कोटींच्या ठेवी; पुणेकर अव्वलस्थानी
 • झिरो बॅलेन्सवर उघडलेल्या 'जन-धन'च्या बँक खात्यांमध्ये राज्यात सहा महिन्यांपूर्वी साडेचार हजार कोटींची ठेव होती.
 • आता दोन कोटी सहा लाख बँक खात्यांत तब्बल सहा हजार 123 कोटी 66 लाखांची ठेव झाली आहे. पुणेकरांच्या 11 लाख 28 हजार 540 खात्यांमध्ये सर्वाधिक 598 कोटी; तर ठाण्यातील 12 लाख 81 हजार 508 खात्यांत 469 कोटी; तर 13 लाख 25 हजार नाशिककरांच्या खात्यात 455 कोटींची रक्‍कम जमा आहे.
 • मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवत परदेशातील काळा पैसा भारतीयांच्या खात्यात जमा करू, असे जाहीर केले.
 • मोदी सरकारची सत्ता आल्यानंतर झिरो बॅलन्सवर जन-धन योजना सुरू करण्यात आली.

कॅनडाच्या बियांका आंद्रेस्कूची पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर मोहोर
 • २३ ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का
 • आर्थर अ‍ॅश स्टेडियमवर एक तास आणि ४० मिनिटे रंगलेल्या या सामन्यात १९ वर्षीय बियांकाने ३७ वर्षीय आठव्या मानांकित सेरेनाला ६-३, ७-५ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले.
 • १५व्या मानांकित बियांकाचे हे कारकीर्दीतील एकूण तिसरे विजेतेपद असून यापूर्वी तिने एंडियन वेल्स आणि टोरंटो टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे.
 • कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी ती कॅनडाची पहिली खेळाडू ठरली आहे.
 • ४ सेरेनाला गेल्या दोन वर्षांत चार विजेतेपदांनी हुलकावणी दिली. २०१८ आणि २०१९ची विम्बल्डन तसेच अमेरिकन या दोन्ही स्पर्धामध्ये तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

Post a Comment

0 Comments