loading...

चालू घडामोडी : Daily Current Affiars 9 August 2019

जम्मू काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
 • जम्मू काश्मीर संबंधित कलम 370 आणि 35 ए रद्द करण्यात आल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधला आहे.
 • कलम 370 हटविल्याने जम्मू-काश्मीरमधील निवडणुका पारदर्शीपणे होतील
 • शिक्षणाच्या अधिकारापासून ते मुलींच्या कल्याणाच्या योजना जम्मू-काश्मीरमध्ये लागू होतील
 • केंद्रशासित प्रदेश केल्याने काश्मीरचा विकास होईल
 • जम्मू-काश्मीरमधील सफाई कर्मचारी, दलितांना सुविधा मिळणार
 • लडाखसाठी सरकार नव्या योजना आखणार
 • काश्मीरमधील पर्यटनाला नवी चालना मिळणार
 • येथील सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारचे सगळे आर्थिक फायदे आणि सुविधा मिळणार
 • लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल
 • जम्मू-काश्मीरमध्ये उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देणार
 • घराणेशाहीने काश्मिरी तरुणांना पुढे येऊ दिलं नाही
 • काश्मीर आणि लडाखमधील जनतेचे आभार
राज्य व केंद्रशासित प्रदेशमध्ये काय फरक आहे?
 • केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या पूर्नरचनेचा निर्णय घेतल्यामुळे आता देशात 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश होतील.
 • सद्यस्थितीत भारतात 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. मात्र आता जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला जाणार आहे.
 • शिवाय लडाख देखील जम्मू-काश्मीरपासून विभक्त करून त्याला देखील केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला जाणार आहे.

राज्य म्हणजे काय?
 • हे भारतीय राज्यघटनेअंतर्गत येणारा एक घटक असून ज्याचे स्वतंत्र असे सरकार आहे.
 • हे सरकार 'राज्य सरकार' म्हणून ओळखले जाते. या सरकारची निवड जनता मतांद्वारे करते.
 • राज्यांना आपले कायदे तयार करण्याचे व त्यात दुरूस्ती करण्याचे अधिकार असतात.
 • प्रत्येक राज्याला स्वतंत्र विधानसभा आणि मुख्यमंत्री असतो. या ठिकाणी राज्यपाल हे राष्ट्रपतींच्या प्रतिनिधींच्या स्वरूपात असतात.

केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय?
 • केंद्रशासित प्रदेश हा एक छोटा प्रशासकीय घटक असतो. ज्यावर केंद्र सरकाचे नियंत्रण असते.
 • या ठिकाणी थेट केंद्र शासनाचे नियम लागू असतात.
 • या नियमांची अंमलबजावणी उपराज्यपालांच्या माध्यमातून होत असते.
 • उपराज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून कार्य करतात, त्यांची निवड केंद्र सरकार करत असते.
 • केंद्रशासित प्रदेशांच्यावतीने संसदेचे उच्च सभागृह म्हणजेच राज्यसभेत नवी दिल्ली आणि पुदुचेरी सोडले तर कोणतेही प्रतिनिधीत्व नसते.

‘माउंट एलब्रुस’ सर करण्याचा पराक्रम कल्याणमधील गिर्यारोहक निलेश माने
 • युरोपातील सर्वोच्च शिखर ‘माउंट एलब्रुस’ सर करण्याचा पराक्रम कल्याणमधील गिर्यारोहक निलेश माने ७३ व्या स्वातंत्रदिनी करणार आहेत. यावेळी ते ७३ भारतीय ध्वजांचे तोरण बांधून नवा विक्रम करणार असून त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
 • माउंट एलबु्रस हे युरोप खंडातील सर्वाेच्च शिखर असून त्याची उंची १८ हजार ५१० फूट (५६४२ मीटर) असून काळा समुद्र आणि कॅस्पियन समुद्राच्या मधोमध हे शिखर आहे.
 • या शिखराचे वैशिष्ट्य म्हणजे हा एक निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे. तेथील तापमान उणे २५ डिग्रीपर्यंत आहे. वर्षभर येणारी सततची वादळे, हाडे गोठवणारी थंडी यामुळे माउंट एलबु्रसची मोहीम अवघड आहे.

ज्येष्ठ अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे निधन
 • चित्रपट रंगभूमी व मालिकांमधील हरहुन्नरी अभिनेता श्रीराम कोल्हटकर यांचे आज पहाटे निधन झाले. डोंबिवलीत राहून नाट्यसृष्टीत कार्य करणाऱ्या त्यांच्या वडिलांचे म्हणजे भालचंद्र कोल्हटकर यांचे काही महिन्यांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले होते.
 • ‘आपला माणूस’, ‘एक अलबेला’ आणि ‘करले तू भी मोहब्बत’ अशा विविध चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांचा अभिनय चतुरस्त्र होता. डोंबिवलीच्या टिळक नगर हायस्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली होती. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांसोबत हिंदी सिनेसृष्टीतील त्यांचे सहकालाकारही शोकाकूल झाले आहेत.
 • अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचं आज सकाळी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे सिनसृष्टीत शोककळा पसरली आहे. श्रीराम कोल्हटकर यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात अभिनय केला. ‘अ डॉट कॉम मॉम’, ‘आपला माणूस’, ‘करले तू भी मोहब्बत’, ‘एक अलबेला’, ‘उंच भरारी’ आदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांची वाहवा मिळाली. 
 • तसेच त्यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतही त्यांनी भूमिका साकारली. त्यांच्या वाट्याला काही निवडक भूमिका आल्या, पण त्यातही त्यांनी आपली विशिष्ट शैली दाखवून दिली.

Post a Comment

0 Comments