loading...

चालू घडामोडी : Daily Current Affiars 8 August 2019

जगातील सर्वात श्रीमंत स्पोर्ट्स टीम मालक २०१९
 • १८ मार्च २०१९ रोजी फोर्ब्स मासिकाने जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघ मालकांची घोषणा केली. या यादीत भारतीय उद्योगपति मुकेश अंबानी प्रथम क्रमांकावर आहेत.
 • दुसऱ्या स्थानावर नॅशनल बॉस्केट बाल (असोसिएशन) (NBA) ची टीम लॉस एंजिल्स क्लिपर्स चे मालक स्टीव बाल्मर हे आहेत तर या यादीत तिसऱ्या स्थानावर ऑटो रेसिंग टीम ‘रेड बुल’ चे मालक डिएट्रिच माटेशिट्ज हे आहेत.
 • महत्वाचे म्हणजे मुकेश अंबानी इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची टीम मुंबई इंडियंस चे प्रमुख आहे.
ग्राहम रीड यांची भारतीय पुरुष हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड
 • हॉकी इंडियाने भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि प्रशिक्षक ग्राहम रीड यांची नियुक्ती केली.
 • सध्या तरी पुढील वर्षीच्या अखेरपर्यंत रीड यांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, भारतीय संघ त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी ठरला त्यांचा कालावधी २०२२ च्या वर्ल्ड कपर्यंत वाढू शकतो. अलीकडेच रीड यांनी गेल्या वर्षी पार पडलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या नेदरलँड संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे.
 • ग्राहम रीड यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना डीफेंडर/मिडफील्डरची भूमिका बजावली आहे. १९९२च्या बार्सिलोना ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या संघात त्यांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाने १९८४, १९८५ आणि १९८९, १९९० अशी सलग चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यात रीडचा समावेश होता. १३० आंतरराष्ट्रीय लढतींचा अनुभव त्यांना आहे.
 • २००९ मध्ये त्यांची ऑस्ट्रेलियाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नेमणूक झाली होती. पुढे त्यांना प्रमुख प्रशिक्षकपदी बढती देण्यात आली अन् त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाने २०१२ मध्ये सलग पाचव्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची किमया केली. 
 • २०१८ मध्ये पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपविजेतेपद पटकावणाऱ्या नेदरलँड संघाचे त्यांनी सहाय्यक प्रशिक्षकपद भूषवले आहे.

फीफा रॅकिंग मध्ये  भारत १०१ व्या स्थानावर
 • ४ एप्रिल २०१९ रोजी फीफा ने प्रसिद्ध केलेल्या जागतिक क्रमवारीत भारताने १२१९ अंक मिळवत १०१ वे स्थान पटकावले तर आशियाई देशाचा विचार केला तर भारत १८ व्या स्थानावर आहे.फिफा क्रमवारीत आशियातून इराणचे सर्वोत्तम मानांकन असून, ते २१ व्या स्थानावर आहेत. त्यानंतर जपान (२६),दक्षिण कोरिया (३७),आस्ट्रेलिया (४१), आणि कतार(५५ )यांचा क्रम लागतो.
 • फिफाच्या जागतिक क्रमवारीत बेल्जियम (१७३७ अंक )प्रथम स्थानावर तर फ्रांस (१७३४ अंक) दुसऱ्या स्थावर तर १६७६ अंक मिळवत ब्राझील तिसऱ्या स्थानावर आहे.
 • मार्च २०१८ मध्ये भारत जागतिक क्रमवारीत ९९ व्या स्थानावर होता. काही कालावधीतच भारत १०३ व्या क्रमांकावर आला होता. आत्तापार्यन्तची भारताची सर्वोच्य क्रमवारी १९९६ मध्ये ९४ होती.
 • स्टीफन कांस्टेनटाइन च्या मार्गदर्शनाखाली  २०१७ मध्ये भारताने ९६ वे क्रमवारीत स्थान प्राप्त केले होते.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा:- मनू-सौरभ जोडीचा विश्वविक्रम
 • मनु भाकर आणि सौरभ चौधरी या जोडीने तैपेईमधील ताआयुआन येथे सुरु असलेल्या १२ व्या आशियाई एअरगन चॅम्पियनशीप स्पर्धेत १० मी.एअर पिस्तुल मिस्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्याआधी या जोडीने पात्रता फेरीमध्ये विश्वविक्रम  केला होता.
 • पात्रता फेरीत भारतीय जोडीने ७८४ गुणांची कमाई करत, रशियाच्या जोडीचा विक्रम मोडीत काढला. काही दिवसांपूर्वी झालेल्या युरोपियन चॅम्पियनशीप स्पर्धेत रशियाच्या व्हिटॅलीना आणि आर्टेम जोडीने ४८४.८ गुण कमावले होते. 
 • कोरिया च्या ह्वांग सियोनगुन आणि किम मोज या जोडीने ४८१. गुण प्राप्त करीत रौप्य पदक  तर ताइपे च्या  चिया यिंग आणि  कोउ कुआन तिंग यांनी ४१३. अंक मिळवत कास्य पदक पटकावले
 • याच प्रकारात भारताच्या अनुराधा आणि अभिषेक वर्मा जोडीने अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्यांना ३७२.१ गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
 • सौरभ चौधरी:- (सुवर्णपदक) प्रकार :- १० मीटर एअर पिस्तुल
 • २०१९:- विश्वकरंडक(नवी दिल्ली ,भारत)
 • २०१८:- आशियायी क्रीडा स्पर्धा (जाकार्ता-पालेमबंग,इंडोनेशिया )
 • २०१८:- युवा ऑलीम्पिक (ब्युनोस आयर्स-अर्जेंटिना)
 • २०१८:- ज्युनिअर विश्वकरंडक(सुह्ल जर्मनी)
 • २०१८:- ज्युनिअर विश्वकरंडक(चॅगवांॅन,चीन)
 • मनु भाकर जन्म :- १८ फेब्रुवारी २००२ (हरियाणा )
 • अयएसएसएफच्या नेमबाजी विश्वचषकात सुवर्णपदकाची कमाई केली. तिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये हे साेनेरी यश मिळवले
 • २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये साेनेरी पदक

SAFF महिला फुटबॉल स्पर्धा २०१९
 • दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाने(SAFF) आयोजित ५ वी SAFF महिला फुटबॉल स्पर्धा १२-२२ मार्च २०१९ दरम्यान बिराटनगर (नेपाळ) येथे पार पडली .या स्पर्धेत एकूण ६ संघांनी सहभाग घेतला होता:-भारत, नेपाळ, बांग्लादेश, मालदीव, श्रीलंका आणि  भूतान
 • स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान नेपाळचा पराभव करून सलग पाचव्यांदा भारताने विजेतेपद पटकावले
 • सर्वोत्कृष्ट खेळाडू:-दांगमेई ग्रेस (भारत)
 • फेयर प्ले अवॉर्ड’- बांग्लादेश
 • सर्वाधिक गोल:-इदुंमाथी कैथिरेसान (भारत) आणि  साबित्रा भंडारी (नेपाळ), दोघींनी ४-४ गोल केले
 • दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (SAFF) या संस्थेची स्थापना १९९७ मध्ये झाली. 
 • बांग्लादेश, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघाचे संस्थापक सदस्य आहेत. पुढे भुतान (2000) आणि अफगाणिस्तान (2005) यात सामील झाले आहे.

Post a Comment

0 Comments