loading...

चालू घडामोडी : Daily Current Affiars 7 August 2019

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं  हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं  हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्या ६६ वर्षांच्या होत्या.भाजपच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती. प्रकृतीच्या कारणावरून २०१९ची लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते.

थ्योडक्यात : सुषमा स्वराज यांची संपूर्ण कारकीर्द (14 फेब्रुवारी 1952 ते 6 ऑगस्ट 2019)
 • 2014 ते 2019 – परराष्ट्र मंत्री
 • मे 2014 ते जानेवारी 2016 – प्रवासी भारतीय कार्यमंत्री
 • 2009 ते 2014 – लोकसभेच्या विरोधीपक्ष नेत्या
 • जानेवारी 2003 ते मे 2004 – संसदीय कामकाज मंत्री
 • जानेवारी 2003 ते मे 2004 – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
 • सप्टेंबर 2000 ते जानेवारी 2003 – माहिती व प्रसारण मंत्री
 • ऑक्टोबर 1998 ते डिसेंबर 1998 – दिल्लीच्या मुख्यमंत्री
 • मे 2009 ते मे 2019 – खासदार (विदिशा लोकसभा मतदारसंघ)
 • मे 1996 ते ऑक्टोबर 1999 – खासदार (दक्षिण दिल्ली)


 • १९७७ साली वयाच्या २५ व्या वर्षी सुषमा स्वराज या कॅबिनेट मंत्री बनल्या होत्या.
 • सर्वात कमी वयाच्या त्या कॅबिनेट मंत्री ठरल्या होत्या.
 • १९७७ ते १९७९ दरम्यान त्यांच्या खांद्यावर सामाजिक कल्याण, रोजगार यांसारख्या ८ महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला होता. यानंतर १९७९ मध्ये २७ व्या वर्षी त्या हरियाणाच्या भाजपाच्या अध्यक्षा बनल्या होत्या.
 • सुषमा स्वराज यांना एका राष्ट्रीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या होण्याचाही मान मिळाला आहे.
 • याव्यतिरिक्त राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री, केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्षाच्या पहिल्या महिला नेत्या होण्याचाही मान त्यांना मिळाला होता.
 • माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाची धुरा सांभाळणाऱ्या त्या दुसऱ्या महिला होत्या.
 • गेल्या चार दशकांमध्ये त्यांना ११ निवडणुका लढवल्या होत्या. त्यातून तीन वेळा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना विजय मिळाला होता. तसेच त्या सात वेळा खासदारही राहिल्या होत्या.
 • पंजाबमधील अंबाला येथे सुषमा स्वराज यांचा जन्म झाला होता. त्यांनी पंजाब विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले होते. आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. आणीबाणीनंतर त्या राजकारणात अधिक सक्रिय झाल्या होत्या.
 • सुषमा स्वराज या पहिल्या आणि एकमेव महिला खासदार ठरल्या ज्यांना आऊटस्टॅंडिंग पार्लिमेन्टेरियन सन्मानाने गौरविण्यात आले होते.
 • नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या ५ वर्षांच्या कार्यकाळात स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार सांभाळला. भारताचं परराष्ट्र धोरण मजबूत करण्यामध्ये स्वराज यांचा मोलाचा वाटा होता. 

ओडिशा सरकारची निर्माण कुसुम योजना
 • ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी 6 ऑक्टोबर रोजी केली. या योजनेद्वारे बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना तांत्रिक शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाईल.
 • या अंतर्गत आयटीआय विद्यार्थ्याना 23,600 रुपये वार्षिक आर्थिक सहाय्य आणि डिप्लोमा विद्यार्थ्यांना  26,300 रुपये वार्षिक  आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल.
 • या योजनेसाठी 1.09 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सुमारे 1878 विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होईल.
 • मुलींसाठी सरकारने या प्रोत्साहनपर रक्कमेमध्ये 20% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलींसाठी आर्थिक सहाय्य इयत्ता सहावीपासून पदवीपर्यंत दिले जाईल.
 • या व्यतिरिक्त सरकारने कामगारांच्या मृत्यूपश्चात देण्यात येणारी रक्कम 1 लाख रुपयांहून वाढवून 2 लाख रुपये केली आहे.
 • त्याचप्रमाणे अपघात झाल्यास मिळणारे मदत 2 लाख रुपयांहून वाढवून 4 लाख रुपये केली आहे.
 
ईस्ट बंगाल फुटबॉल क्लब
 • ईस्ट बंगाल फुटबॉल क्लब हा कलकत्ता येथील एक फुटबॉल क्लब आहे.
 • याची स्थापना 1 ऑगस्ट 1920 रोजी झाली.
 • याने आतापर्यंत तीन राष्ट्रीय फुटबॉल लीग (आय-लीग), आठ फेडरेशन चषक आणि तीन भारतीय सुपर कप जिंकले आहेत.

Post a Comment

0 Comments