loading...

चालू घडामोडी : Daily Current Affiars 6 August 2019

जम्मू-काश्मीरचे विभाजन
 • कलम 370 हटवण्याची शिफारस
 • लडाख , जम्मू आणि काश्मीर असे तीन भाग होणार
 • जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश असणार , विधानसभेची तरतूद
 • लडाख केंद्रशासित प्रदेश असणार (विधानसभा नाही)
 • जम्मू-काश्मीर राज्य नसून आता केवळ केंद्रशासित प्रदेश असणार
RBI चे डेप्युटी गव्हर्नर - सुबीर गोकर्ण यांचे निधन
 • नोव्हेंबर 2009 ते जानेवारी 2013 काळात RBI चे उप-गव्हर्नर होते
 • आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(IMF) चे कार्यकारी संचालक म्हणूनही काम केले होते.
 • 2010 साली त्यांनी भारतात प्रथिनांच्या फुगवट्याचा सिद्धांत मांडला होता.
 • (लोकांच्या मिळकतीत वाढ होत असल्याने जनता अंडी , डाळ आणि मांस याचा मोठ्या प्रमाणात आहार करत असल्याचे मत)
 • मुंबई - सेंट झेव्हीयर्स कॉलेज - BA दिल्ली - MA अमेरिकेत - PhD

प्रिया प्रियदर्शिनी जैन यांना ब्रिटनचा “इंडियन वुमन ऑफ इंफ्लुएन्स”  पुरस्कार मिळाला
 • ब्रिटनच्या संसदेचे उच्च सभागृह 'हाऊस ऑफ लॉर्ड्स' येथे 'इंडियन वुमन ऑफ इंफ्लुएन्स अवॉर्ड' या प्रतिष्ठित पुरस्काराने प्रख्यात फॅशन डिजाइनर, सामाजिक उद्योजिका आणि समाजसेविका प्रिया प्रियदर्शिनी जैन यांना गौरविले .
 • सत्कार समारंभात जगातल्या 50 सर्वाधिक प्रभावशाली भारतीय स्त्रियांची माहिती देणारी एक पुस्तिका देखील प्रसिद्ध करण्यात आली.
 • हा पुरस्कार ब्रिटन, भारत, अमेरीका, स्पेन आणि स्कॉटलंड यासारख्या विविध देशांमध्ये कार्य करणार्‍या भारतीय स्त्रियांना दिला जातो.
 • विविध क्षेत्रांमध्ये प्रभावी ठरलेल्या भारतीय वंशाच्या स्त्रियांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो.

कपिल देव भारत गौरव पुरस्काराने सन्मानित
 • १ ऑगस्ट रोजी, ईस्ट बंगाल क्लबने आपल्या 100 व्या वर्धापन दिनी कपिल देवला भारत गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
 • कपिल देव यांनी  22 जून 1992 ला इस्ट बंगाल क्लब जॉईन केले होते.त्यानंतर त्यांनी या क्लबच्या वतीने 27 मॅच खेळल्या.

आसियानची  52 वी परराष्ट्र मंत्री बैठक
 • बँकॉकमध्ये 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान 52 व्या आसियान परराष्ट्रमंत्र्यांची बैठक आयोजित केली जात आहे.
 • आसियान (ASEAN) the Association of Southeast Asian Nations (ASEAN)
 • 10 आग्नेय आशियाई देशांची प्रादेशिक आंतर-सरकारी संस्था.
 • स्थापना : 6 ऑगस्ट 1967
 • मुख्यालय : इंडोनेशिया (जकार्ता)
 • Motto : "One Vision, One Identity, One Community"
 • उद्देश : सदस्य देशांचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि स्वातंत्र्य आणि विवादांचे शांततेने निवारण.
 • आसियानने मंजूर केलेल्या प्रस्तावांची अंमलबजावणी करण्याचे व कामात सहकार्य देण्याचे काम करतात.

Post a Comment

0 Comments