loading...

चालू घडामोडी : Daily Current Affiars 4 July 2019

loading...
भारताला नाटोसमान दर्जा देणारे विधेयक संमत
 • भारताला नाटो संघटनेच्या सदस्य देशांसमान दर्जा देण्याची तरतूद असणारे विधेयक अमेरिकेच्या वरीष्ठ लोकप्रतिनिधीगृहात (सिनेट) संमत करण्यात आले आहे. 
 • यामुळे भारताला अमेरिकेच्या अत्याधुनिक संरक्षणसामग्री आणि तंत्रज्ञानाचा लाभ होणार असून इस्रायल आणि दक्षिण कोरिया या देशांप्रमाणे अमेरिकेचे सहकार्य मिळविणे भारताला शक्य होणार आहे.
 • हे विधेयक वरीष्ठ लोकप्रतिनिधी  गृहात भारत समर्थक गटाचे उपनेते सिनेटर जॉन कॉर्निन यांनी भारत समर्थक नेते मार्क वॉर्नर यांच्यासह सादर केले. 
 •  भारत समर्थक गटाचे उपनेते ब्रॅड शेरमन तसेच सभागृह सदस्य जो विल्सन, अमी बेरा, टेड योहो, जॉर्ज होल्डिंग, एड केस आणि राजा कृष्णमूर्ती यांनी सादर केले होते. कनिष्ठ प्रतिनिधीगृहात हे विधेयक जुलैच्या दुसऱया आठवडय़ात चर्चेला येणार आहे.
 • कनिष्ठ सभागृहाने ते संमत केल्यानंतर त्यावर सर्व लोकप्रतिनिधी आणि दोन्ही सभागृहांच्या प्रमुखांची स्वाक्षरी होईल. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप त्यावर स्वाक्षरी करतील. मग त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे.
स्विस बँकांतील निधीत भारत ७४ व्या क्रमांकावर
 • स्वित्झर्लंडमधील मध्यवर्ती स्विस नॅशनल बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार तेथे गुंतवण्यात आलेल्या पैशाचा विचार करता भारताचा ७४ वा क्रमांक लागला असून ब्रिटन पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचे स्थान एक अंकाने घसरले आहे.
 • स्विस  बँकेत अनेक देशातील संस्था व नागरिकांचा काळा पैसा ठेवलेला आहे. गेल्या वर्षी भारताचा ७३ वा क्रमांक लागला होता. वर्षभरापूर्वी भारताचा ८८ वा क्रमांक होता पण त्यानंतर तो ७३ पर्यंत आला.
 • भारतीय व्यक्ती व संस्थांचा स्वित्झर्लंडच्या बँकांमध्ये गुंतवण्यात आलेल्या पैशाचा विचार करता भारत खालच्या स्थानावर आहे.स्वित्झर्लंडमध्ये गुंतवण्यात आलेल्या एकूण सर्व देशांच्या पैशाचा विचार करता त्यात भारतीय व्यक्ती व संस्था यांचा पैसा केवळ ०.०७ टक्के आहे.
 • ब्रिटन यात पहिल्या क्रमांकावर असून २०१८ अखेरीस तेथील व्यक्ती व संस्था यांचा जास्तीत जास्त निधी स्विस बँकात आहे. स्विस बँकांतील एकूण परदेशी निधीत ब्रिटनचा वाटा २६ टक्के आहे. त्यानंतर अमेरिका, वेस्ट इंडिज, फ्रान्स, हाँगकाँग यांचा क्रमांक पहिल्या पाचात आहे.

राणीच्या बागेत उभारणार देशातील पहिले बंदिस्त ‘डोम’ पक्षिगृह
 • भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात डोम पद्धतीचे पक्षिगृह 2 उभारण्यात येणार आहे.
 • पक्षिगृहाला ‘वायर रोप मेश’ (स्टेनलेस स्टील) वापरून पिंजरा तयार केला जाणार आहे. हा पिंजरा 50 वर्षांहून अधिक काळ टिकू शकतो. अशा प्रकारचे हे देशातील पहिले डोम पद्धतीचे बंदिस्त पक्षिगृह असणार आहे.
 • पक्षिगृह 2 हे पूर्णपणे बंदिस्त असून यात पर्यटक आतमध्ये जाऊन विहार करत पक्षी निरीक्षण करतील.
 • तसेच यामध्ये हेरॉन्स, क्रॉन्स, मालढोक, पेलीकन अशा 20 प्रजातींच्या पक्ष्यांना ठेवण्यात येणार आहे. पक्षिगृहामध्ये झाडे, तलाव आणि धबधबादेखील असणार आहे.
 • राणीबागेमध्ये तीन हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये  ‘वॉक थु्र एव्हीअरी’ (पक्षिगृहात मुक्तपणे संचार) या संकल्पनेवर आधारित बंदिस्त पक्षिगृह 2 उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
 • तर या पक्षिगृह 2 चे काम सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होऊन पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

2025 सालापर्यंत 50 अब्ज डॉलरच्या भारत-इंडोनेशिया द्वैपक्षीय व्यापाराचे लक्ष्य ठेवले
 • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी जपानच्या ओसाका या शहरात जी-20 परिषदेच्या दरम्यान भेट घेतली.
 • दोन्ही देशांमधील द्वैपक्षीय व्यापार 2025 सालापर्यंत 50 अब्ज डॉलरपर्यंत पोहचविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अर्थव्यवस्था, संरक्षण आणि सागरी सुरक्षा यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याला चालना देण्यावर चर्चा केली गेली.

भारत-इंडोनेशिया संबंध :

 • इंडोनेशिया हा आग्नेय आशिया व ओशनियामधील एक देश आहे. हा देश हिंद महासागरातील 17,508 बेटांचा एक द्वीपसमूह आहे. जकार्ता ही देशाची राजधानी आहे आणि इंडोनेशियन रुपिया हे राष्ट्रीय चलन आहे.
 • भारतीय व चिनी संस्कृतीचा मिलाफ येथे दिसून येतो. या देशाचा भारताशी पुरातन संबंध आहे. भारतातल्या पुराणांमध्ये याचा उल्लेख दीपांतर भारत म्हणजेच समुद्रापारचा भारत असा आढळतो. दीपांतर हे नाव इंडोनेशिया मध्ये अजूनही प्रचलित आहे.
 • इंडोनेशियाच्या केंद्रीय सांख्यिकी संस्थेनुसार, भारतासोबतचा व्यापार 2016 साली 12.90 अब्ज डॉलर झाला. सन 2017 मध्ये दोन्ही देशांचा द्वैपक्षीय व्यापार 28.70% ने वाढून 18.13 अब्ज डॉलरवर पोहचला आहे.

Post a Comment

0 Comments