loading...

चालू घडामोडी : Daily Current Affiars 3 July 2019

loading...
RISAT-2B: शत्रूवर नजर ठेवण्यासाठी भारताचा रडार इमेजिंग उपग्रह
 • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) दि. 22 मे 2019 रोजी “री सॅट-2B” (RISAT-2B) या रडार इमेजिंग उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
 • RISAT-2B या उपग्रहाचा उपयोग शत्रूवर नजर ठेवण्याबरोबर कृषी, वन खाते, आपतकालीन व्यवस्थापनासाठी होईल.
 • इस्रोच्या PSLV C46 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने श्रीहरीकोटा येथील तळावरून RISAT-2B अवकाशात सोडण्यात आला.
 • ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (PSLV) प्रक्षेपकाची ही 46 वी यशस्वी मोहीम आहे.
 • RISAT मालिकेतला पहिला उपग्रह दि. 20 एप्रिल 2009 रोजी अवकाशात सोडण्यात आला होता. आणि त्यानंतर 2012 साली या वर्गातला आणखी एक उपग्रह पाठवला.
 • यानंतर 2019 साली ISROची चार ते पाच पाळत उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना आहे.
1 जुलैपासून ऑनलाइन पैसे पाठवणे स्वस्त झाले
 • भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नव्या नियमांमुळे आता ऑनलाईन पैसे पाठवणे स्वस्त झाले आहे. त्यानुसार मोठ्या ट्रान्झॅक्शनसाठी वापरण्यात येणाऱ्या रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम (RTGS) फंड ट्रान्सफर आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) यावर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. दि. 1 जुलै 2019 पासून हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
 • या पावलामुळे बँका देखील आपल्या ग्राहकांसाठी ट्रान्झॅक्शन शुल्क कमी करण्याची शक्यता आहे. डिजिटल पेमेंटला चालना देण्याच्या उद्देशाने RBIने हा पुढाकार घेतला आहे.
 • मोठी रक्कम पाठवण्यासाठी RTGS वापरले जाते. तर, 2 लक्ष रुपयांपर्यंतची रक्कम ही NEFTद्वारे पाठवली जाते. परंतू, ऑनलाइन ट्रांजिशनला कोणतेच शुल्क आकारले जाणार नाहीत.

‘नैसर्गिक भाषा भाषांतरण’ विषयक राष्ट्रीय मोहीम
 • भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने “नैसर्गिक भाषा भाषांतरण’ विषयक राष्ट्रीय मोहीम” राबविण्याची योजना आखली आहे.
 • हा प्रस्ताव मंत्रालयाच्या 100 दिवसांच्या कृती योजनेचा एक भाग आहे. प्रकल्पासाठी पुढील तीन वर्षांसाठी 450 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभिनवता सल्लागार परिषद (PM-STIAC) कडून याला मान्यता दिली गेली आहे.
 • मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग यांच्याबरोबरीने माहिती तंत्रज्ञान मंत्रालय ही मोहीम राबवविणार आहे. केंद्र आणि राज्य संस्था तसेच स्टार्टअप उद्योगांच्या मदतीने हा उपक्रम चालवला जाणार आहे.

ग्लोबल पीस इंडेक्स 2019
 • आइसलँड पहिल्या क्रमांकावर 2019 च्या ग्लोबल पीस इंडेक्स 163 देशांच्या यादीमध्ये भारताचे स्थान पाच स्थानांनी घटून 141 झाले आहे.
 • ऑस्ट्रेलियन थिंक टँक इंस्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस रिपोर्टनुसार, आइसलँड हा यादीतील सर्वात शांत देश आहे आणि अफगाणिस्तान सर्वात कमी शांततापूर्ण देश आहे.

NASAच्या ‘क्यूरिओसिटी’ रोव्हरला मंगळावर मोठ्या प्रमाणात मिथेनचा साठा आढळला
 • मंगळ ग्रहावर एका प्रयोगादरम्यान वातावरणामध्ये रेणूचे प्रमाण मोजत असताना NASAने पाठवविलेल्या ‘क्यूरिओसिटी’ नावाच्या रोव्हरला कल्पनेच्या विपरीत तेथे मोठ्या प्रमाणात मिथेन वायू उपलब्ध असल्याचे आढळून आले आहे.
 • संशोधकांना मिळालेल्या माहितीमधून असे निष्कर्ष निघाले की तेथे 21 पार्ट्स पर बिलियन या प्रमाणात मिथेन वायूची पातळी आहे, जे पूर्वी कधीही पाहिले गेले नव्हते आणि पूर्वी आढळलेल्या प्रमाणापेक्षा सुमारे तीन पटीने ते जास्त आहे. योग्य उपकरणे उपलब्ध नसल्याने ही उत्पत्ती जैविक आहे की भूगर्भीय हे अजूनही स्पष्ट झाले नाही.
 • अनेक असे सुचवितात की मिथेनची उच्च पातळी असणे म्हणजे मंगळावर जीवन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पृथ्वीवरील मिथेन हा एक महत्त्वाचा रेणू आहे आणि अनेक जिवंत प्राणी आणि सूक्ष्मजीव सुद्धा हा शरीराच्या बाहेर टाकतात.
 • मंगळ हा सूर्यमालेतला चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह (किंवा लाल ग्रह) असेसुद्धा म्हटले जाते. हा तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साइडमुळे मिळाला आहे. सूर्यमालेतला सर्वांत उंच पर्वत ऑलिम्पस मॉन्स तसेच सर्वांत मोठी दरी व्हॅलेस मरिनेरिस मंगळावर आहे.

Post a Comment

0 Comments