चालू घडामोडी : Daily Current Affiars 12 July 2019

स्किल इंडिया मिशन - सदिच्छा दूत

Anushka Sarma and Varun Dhavan
 • अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांची केंद्र सरकारच्या 'स्किल इंडिया मिशनच्या' सदिच्छा दूतपदी नियुक्ती
 • त्यांच्या चित्रपटातून - 'सुईधागा' मधून कौशल्यपूर्ण प्रशिक्षणाचे महत्त्व नमूद केले आहे.
 • स्किल इंडिया मिशन 15 जुलै 2015 रोजी नरेंद्र मोदी यांनी योजनेची सुरुवात केली होती.
 • अभियान उद्दिष्ट - 2022 पर्यंत 40 कोटी भारतीयांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण पुरवणे.

200 मीटर रेसमध्ये हिमा दासने दुसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले
 • पोलंडमधील कुत्नो अथलेटिक्स मीटमध्ये भारताची धावपटू हिमा दास हिने 200 मीटरमध्ये दुसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले. 
 • ह्या आठवड्यात तिचे हे दुसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे. तिने पोलंडमध्ये झालेल्या महिलांच्या 200 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले. 
 • हिमा दासला गेल्या काही महिन्यांपासून पाठदुखीचा त्रास होत असला तरी तिने 23.97 सेकंदात सुवर्णपदक जिंकले तर व्ही के विस्मयाने 24.06 च्या वेळेत रौप्यपदक जिंकले. 
 • 21.18 सेकंदाच्या वेळेत भारताच्या राष्ट्रीय रेकॉर्डधारक मोहम्मद अनास याने 200 मीटर रेसमध्ये सुवर्णपदक जिंकले.

पुरस्कार 2018-19: आशालता देवी,सुनील छेत्री हे वर्षातले सर्वोत्कृष्ट खेळाडू
 • अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (AIFF) कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर 2018-19 या हंगामासाठी वार्षिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
 • भारत आणि बेंगळुरू फूटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्री ह्याला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा (AIFF) 2018-19 या हंगामासाठी वर्षाचा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. तर, केरला ब्लास्टर्स फूटबॉल संघाची आशालता देवी हिने वर्षाची सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार जिंकला.
 • छेत्रीला मिळालेला हा पुरस्कार एकूणच कारकि‍र्दीतला सहावा पुरस्कार असून त्याने भारतीय फूटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा AIFFचा सर्वोच्च पुरस्कार जिंकल्याचा नवा विक्रम रचला आहे. 
 • छेत्रीच्या नावावर 70 गोल आहेत आणि तो नामांकित खेळाडू क्रिस्टीआनो रोनाल्डो (149) याच्या मागे असून सध्या सक्रिय आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहे.

अन्य AIFF पुरस्कारांची संपूर्ण यादी खालील प्रमाणे आहे:

🔸बेस्ट ग्रासरूट्स डेव्हलपमेंट प्रोग्राम – जम्मू व काश्मीर फूटबॉल संघ
🔸सर्वोत्कृष्ट सहाय्यक पंच (रेफरी) - जोसेफ टोनी (केरळ)
🔸सर्वोत्कृष्ट पंच (रेफरी) – आर. व्यंकटेश (तामिळनाडू)
🔸वर्षाचा उदयोन्मुख खेळाडू (महिला) - डांगमेई ग्रेस (मणीपूर)
🔸वर्षाचा उदयोन्मुख खेळाडू (पुरुष) - सहल अब्दुल समद (केरळ)

UNCCD परिषदेचे ‘COP-14’ सत्र प्रथमच भारतात होणार
 • संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषद (UNCCD) याच्या ‘COP-14’ म्हणजेच संबंधित देशांच्या परिषदेच्या 14 व्या सत्राचे यजमानपद भारताला मिळाले असून ग्रेटर नोएडा या शहरात 2 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2019 या काळात ही परिषद भरविली जाणार आहे.
 • प्रथमच भारतात होणार्‍या परिषदेचे आयोजन भारत सरकारचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय UNCCDच्या भागीदारीने करणार आहे. 
 • या परिषदेसाठी 197 देशातले 5 हजार प्रतिनिधी सहभागी होण्याचे अपेक्षित आहे. परिषदेत वाळवंटीकरण, जमीन नापिक होणे आणि दुष्काळ अशा जागतिक संकटांच्या मुद्द्यांवर उपाययोजना शोधल्या जातील आणि त्यावर चर्चा केली जाणार आहे.
 • संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषद (United Nations Convention to Combat Desertification -UNCCD) याची स्थापना करण्याची संकल्पना रिओ कराराच्या 21 व्या उद्देशातल्या थेट शिफारशीतून निर्माण झाली. त्यात 196 आणि युरोपीय संघ (EU) सदस्य राज्ये आहेत.
 • फ्रान्सची राजधानी पॅरिस या शहरात दिनांक 17 जून 1994 रोजी रिओ करार स्वीकारण्यात आला आणि ही संघटना अस्तित्वात आली. संघटना डिसेंबर 1996 मध्ये कार्यरत झाली. संघटनेचे स्थायी सचिवालय जानेवारी 1999 पासून बॉन (जर्मनी) या शहरात आहे.

Post a Comment

0 Comments