चालू घडामोडी : Daily Current Affiars 6 June 2019

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना कॅबिनेटचा दर्जा
 • लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवत पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय सल्लागार पदी असलेल्या अजित डोभाल यांना कॅबिनेटचा दर्जा दिला आहे.
 • पुढील पाच वर्षांसाठी अजित डोवाल यांना हा दर्जा मिळाला आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आले त्यावेळी त्यांनी अजित डोवाल यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्त केलं होतं. आजवर राष्ट्रीय सल्लागार पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त होता.
 • अजित डोवाल यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानमुळे मोदी सरकारने त्यांना पुढील पाच वर्षांसाठी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे. पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचं श्रेय डोवाल यांना दिलं जातं.
 • लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने प्रचारादरम्यान राष्ट्रीय सुरक्षा मुद्द्यावर जास्त भर दिला होता. याचा फायदा भाजपला निवडणुकीत झाला आहे आणि 303 जागांवर भाजपने विजय मिळवला. राष्ट्रीय संरक्षण रणनीती चांगल्याप्रकारे आखल्याचा फायदा भाजपाला झाला आहे. यामुळे डोवाल यांना हे बक्षिस मिळालं आहे.

आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यास जनरल कॅटेगरीत नोकरी नाही - सुप्रीम कोर्ट
 • आरक्षणाचा फायदा घेणाऱ्या नागरिकांसदर्भातील एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानेमहत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला केवळ आरक्षित श्रेणीमध्येच सरकारी नोकरीमिळेल. 
 • मात्र, आरक्षित प्रवर्गात जागा न मिळाल्यास संबंधित उमेदवाराला जनरल कॅटेगिरीत नोकरी देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आर भानुमती आणि न्यायाधीश एएम खानविलकर यांच्या खंडपीठाने एका याचिकेवरील सुनावणीवेळी हा निर्णय दिला.
 • आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारापेक्षाही अधिक गुण मिळवले असले, तरी या उमेदवारास केवळ आरक्षित प्रवर्गातून नोकरी दिली जाईल. 
 • जनरल कॅटेगिरीतील नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला दावा करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेतील सुनावणीवेळी दिला.


योजना :- कुसुम (KUSUM)
 •  केंद्र सरकारच्या अक्षय ऊर्जा मंत्रालयाने शेतकर्यांमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढवा या उद्देशाने ‘किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान (KUSUM/कुसूम)’ योजना तयार केली आहे.
 • योजनेचे स्वरूप : ग्रामीण भागात प्रत्येकी 500 किलोवॅट ते 2 मेगावॅट एवढ्या क्षमतेच्या ग्रिडला जोडलेल्या अक्षय ऊर्जा प्रकल्पाची स्थापना करणे.
 • सिंचनाची गरज पूर्ण करण्यासाठी ग्रिडशी जोडले नसलेले सोलर वॉटर पंप प्रस्थापित करणे.
 • ग्रिडशी जोडल्या गेलेल्या उपस्थित वॉटर पंपला सौर ऊर्जा क्षमतेवर चालवणे आणि तयार झालेली अतिरिक्त ऊर्जा ‘डिसकॉम’ला विकून अतिरिक्त प्राप्ती करणे.


डॉ. हेमा दिवाकर यांना एशिया वनचा 'ग्लोबलएशियन ऑफ द इयर' पुरस्कार
 • बेंगळुरू येथील चिकित्सक हेमा दिवाकर यांना ‘एशिया वन’ मासिकाच्या प्रकाशकाकडून 'ग्लोबल एशियन ऑफ द इयर 2018-19' हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
 • दुबई (UAE) येथे आयोजित झालेल्या ‘एशियन बिझिनेस अँड सोशल फोरम 2019’ या कार्यक्रमात हेमा दिवाकर यांना भारतात महिलांचे आरोग्य राखण्यात त्यांच्या समर्पित सेवेसाठी आणि योगदानासाठी त्यांना 'समाज आणि देशाची सेवा' या श्रेणीच्या अंतर्गत हा पुरस्कार दिला गेला.


निर्मला सीतारमण यांची भारतातील पहिली महिला अर्थमंत्री म्हणून नियुक्ती
 • 2017 पासून निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून काम केले आहे. सध्या कर्नाटकचे राज्यसभा सदस्य (एमपी) आहेत.
 • 2014 मध्ये त्या आंध्र प्रदेशातील राज्यसभा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी वित्त आणि कॉर्पोरेट अफेयर्सचे राज्य मंत्री म्हणून काम केले आणि नंतर ते वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून स्वतंत्र प्रभार म्हणून काम केले.
 • यासोबत त्या भारताची पहिली पूर्ण वेळ महिला अर्थमंत्री बनली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी फक्त 1 वर्षासाठी (जुलै 1969 आणि जून 1970) हे मंत्रालय ठेवल्यानंतर निर्मला सीतारामन प्रथम महिला अर्थमंत्री आहेत.


इंडियन क्रिकेट हीरोज पुरस्कार सोहळा २०१९
 • वर्षांतील सर्वोत्कृष्ट उद्योनमुख महिला खेळाडू - राधा यादव
 • वर्षांतील सर्वोत्कृष्ट उद्योनमुख पुरुष खेळाडू : मयंक अग्रवाल
 • सर्वोत्कृष्ट महिला गोलंदाज – पूनम यादव
 • सर्वोत्कृष्ट पुरुष गोलंदाज – जसप्रीत बुमराह
 • सर्वोत्कृष्ट महिला फलंदाज - स्मृति मंधाना
 • सर्वोत्कृष्ट पुरुष फलंदाज - रोहित शर्मा
 • आयपीएल २०१९ मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी - आंद्रे रसेल
 • सर्वोत्कृष्ट प्रदर्शन विरूद्ध भारत २०१९ – सैम क्यूरन
 • वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू – जसप्रीत बुमराह.
 • हीरोज सम्मान २०१९ - युवराज सिंह.

Post a Comment

0 Comments