चालू घडामोडी : Daily Current Affiars 30 June 2019

विराट कोहलीने मोडला अझरुद्दीनचा 27 वर्षांपूर्वीचा विक्रम
 • वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकासह  भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा 27 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.
 • तर कोहलीचे या विश्वचषकातील हे सलग चौथे अर्धशतक ठरले.
 • त्यामुळे कोहली भारताचा सलग चार अर्धशतके लगावणारा पहिला कर्णधार ठरला आहे.
 • यापूर्वी हा विक्रम अझरच्या नावावर होता. अझरने 1992 साली झालेल्या विश्वचषकात सलग तीन अर्धशतके लगावली होती. आता हा विक्रम कोहलीच्या नावावर असेल.
 • तसेच विश्वचषकात सलग चार अर्धशतके लगावत कोहलीने भारताच्या सचिन तेंडुलकर आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी बरोबरी केली आहे.
 • सिद्धूने 1987 साली झालेल्या विश्वचषकात सलग चार अर्धशतके लगावली होती. • सचिनने तर दोन विश्वचषकांमध्ये सलग चार अर्धशतके लगावली होती. सचिनने 1992 आणि 2003 सालीझालेल्या विश्वचषकात सलग चार शतके लगावली आहेत.
 • तसेच या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने  सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या दोन्ही माजी महान खेळाडूंना मागे टाकले आहे.
 • तसेच पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत कोहलीनं वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11 हजार धावा करण्याचा विक्रम नावावर केला होता.
 • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा करणारा कोहली जगातील बारावा, तर तेंडुलकर आणि राहुल द्रविडयांच्यानंतर तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
​​निती आयोगाच्या आरोग्य क्रमवारीत केरळ  प्रथम
 • एकूण आरोग्य कामगिरीत देशात केरळने पहिला क्रमांक पटकावला असून बिहार व उत्तर प्रदेश सर्वात खालच्या  क्रमांकावर आहेत. निती आयोगाने आरोग्य निर्देशांक क्रमवारी जाहीर केली आहे.महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागला आहे.
 • आरोग्य निर्देशांकाची दुसरी फेरी ही २०१५-१६ पायाभूत वर्ष व २०१७-१८ संदर्भ वर्ष मानून तयार  केली आहे. अहवालात म्हटले आहे की, आंध्र प्रदेश व महाराष्ट्र हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. ‘दी हेल्दी स्टेट्स, प्रोग्रेसिव्ह इंडिया’ नावाचा अहवाल निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी जाहीर केला.
 • आरोग्य निर्देशांकात २३ आरोग्य निकषांचा विचार करून क्रमवारी तयार केली आहे, त्यात वेगवेगळ्या घटकांवरचा भर ठरलेला आहे.

DNA तंत्रज्ञान विधेयक 2019
 • केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘DNA तंत्रज्ञान (उपयोग व अनुप्रयोग) नियमन विधेयक-2019’ याला मंजुरी दिली. DNA (डीऑक्सीरिबोन्यूक्लिक असिड) हा शरीरात आढळणारा रेणू असून त्यात शरीराची अनुवांशिक माहिती दडलेली असते.
 • विधेयकातल्या तरतुदी DNA डेटा बँक तयार करणे, ज्यामुळे त्याचा सरकारला गुन्हे सोडवण्यासाठी, हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आणि मृत शरीर ओळखण्यासाठी मदत मिळणार.
 • राष्ट्रीय आणि प्रादेशिक DNA डेटा बॅंक स्थापन करण्याची तरतूद आहे.
 • याठिकाणी गुन्ह्याचे ठिकाण, संदिग्ध किंवा तपास अंतर्गत, गुन्हेगार, हरविलेले व्यक्ती आणि अज्ञात मृत व्यक्ती अश्या वर्गांमध्ये नमुने साठवणे.
 • DNA विश्लेषणासाठी शरीराचे नमुने सात वर्षांपर्यंतची शिक्षा भोगत असलेल्या लोकांच्या समावेशासह लोकांच्या संमतीने एकत्रित केले जाऊ शकतात. ज्या लोकांना सात वर्षांहून अधिक काळ शिक्षा मिळाली असेल त्यांच्या संमतीविना नमुने गोळा केले जाऊ शकतात.

आफ्रिकी संघाने (AU) सुदानचे सदस्यत्व निलंबित केले
 • सुदान या देशाच्या लष्कराने निर्देशने करणार्‍या लोकांना ठार मारण्याच्या क्रूर कारवाईनंतर आफ्रिकी संघाने (African Union -AU) सुदानचे सदस्यत्व निलंबित केले.
 • या निलंबनामुळे आता सुदानला आफ्रिकी संघाच्या कोणत्याही क्रियाकलापांमध्ये भाग घेता येणार नाही. आता पुढे नागरिकांच्या नेतृत्वाखाली संक्रमणकारी प्राधिकरणाची प्रभावीपणे स्थापना केली जात नाही तोपर्यंत हे निलंबन प्रभावी असणार.
 • आफ्रिका खंडातल्या सुदानमध्ये सरकारच्या विरोधात झालेल्या जनआंदोलनादरम्यान तत्कालीन राष्ट्रपती ओमार अल-बशीर ह्यांना देशाच्या लष्कराने दि. 11 एप्रिल 2019 रोजी पदावरून हटवले आणि त्यांना अटक केली. 
 • गेल्या 30 वर्षांपासून सुदानवर राज्य करणारे ओमार अल-बशीर ह्यांना सत्तेतून खाली खेचण्यात आले. अल-बशीर यांना हटवण्यात आल्यानंतर पुढील तीन महिन्यांसाठी सुदानमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
 • अश्यात देशात माजलेल्या अराजकतेच्या विरोधात आणि लष्कराच्या सशस्त्र कारवाईच्या विरोधात सुदानी प्रोफेशनल असोसिएशन या गटाच्या नेतृत्वात लोकांनी निर्देशने दिली. त्यावेळी ही घटना घटली.

जागतिक अर्थव्यवस्था, आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत मोदी-अबे चर्चा
 • ओसाका : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जपानचे पंतप्रधान शिजो आबे यांच्याशी जागतिक अर्थव्यवस्था, आर्थिक गैरव्यवहार करून फरार झालेले आरोपी, आपत्कालीन व्यवस्थापन या विषयांवर चर्चा केली. 
 • ऑक्टोबर महिन्यात सम्राट नारुहितो यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित राहतील, असेही मोदी यांनी या वेळी जाहीर केले.
 • जी २० शिखर परिषदेसाठी आलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी आभार मानले. रेइवा पर्वाची सुरुवात झाल्याबद्दल मोदी यांनी आबे आणि जपानच्या जनतेचे अभिनंदन केले. नव्या पर्वासाठी रेई आणि वा या दोन शब्दांनी तयार झालेली रेइवा ही संज्ञा आहे.
 • या भेटीबाबत परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले की, दोन्ही पंतप्रधान एकमेकांचे चांगले मित्र असून त्यांच्यात परस्पर संबंधांबाबत रचनात्मक आणि सविस्तर चर्चा झाली. 
 • अबे यांनी जी२० परिषदेकडून काय अपेक्षा आहेत त्या मुद्दय़ावर चर्चेला सुरुवात केली. त्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेबाबत चर्चा केली, असे गोखले म्हणाले.

Post a Comment

0 Comments