चालू घडामोडी : Daily Current Affiars 28 June 2019

सामंत गोयल 'RAW' चे प्रमुख तर 'IB' च्या प्रमुखपदी अरविंद कुमार
 • पुन्हा सत्तेत आलेल्या मोदी सरकारने बुधवारी देशाच्या गुप्तचर विभागात नवी नियुक्ती केली आहे.
 • सरकारने १९८४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अरविंद कुमार यांची इंटेलिजेंस ब्युरो (आयबी) तर १९८४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सामंत गोयल यांची 'रॉ' प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 • पंतप्रधान मोदीच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने त्यांच्या नावाला परवानगी दिली आहे.
 • अरविंद कुमार यांना काश्मीरमधील विविध प्रकरणाबाबत माहिती असल्याचे मानले जाते.
 • ते आताच्या आयबी चीफ राजीव जैन यांची जागी पदभार स्वीकारतील. तर गोयल हे सध्याचे रॉ प्रमुख अनिल कुमार धस्माना यांच्या जागी पदभार स्वीकारतील.
 •  गोयल यांंनी पाकिस्तानविरोधात २०१६ च्या उरी हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइक आणि २०१९ मध्ये पाकिस्तानातील बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे.
जयपुर फुट कोरिया': कृत्रिम अंग निर्मिती क्षेत्रातला भारत आणि कोरिया यांचा उपक्रम
 • भारतातले कोरियाचे राजदूत बोंग- किल शिन यांनी 'जयपुर फुट कोरिया' या उपक्रमाचा शुभारंभ केला. हा कोरिया आणि भारताची भगवान महावीर विकलांग सहायता समिती (BMVSS) ही कृत्रिम-अंग तयार करणारी संस्था यांच्यातला एक सहकारी उपक्रम आहे.
 • यासाठी केलेल्या कराराच्या अंतर्गत, प्रामुख्याने कृत्रिम अंग, बायोनिक हात, 3D प्रिंटेड फ्लॅट फुट उपाय आणि दळणवळण उपाययोजना अश्या क्षेत्रामध्ये वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या उद्योगांशी समन्वय साधून संशोधन आणि विकास कार्यांच्या क्षेत्रात सहकार्यासाठी कोरिया आर्थिक व तांत्रिक सहाय्य भारताला देणार.
 • याव्यतिरिक्त या करारामुळे कोरियाच्या विद्यार्थ्यांना विविध देशांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या या क्षेत्रातल्या भारतीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी तसेच ‘जयपूर फूट’ उपक्रमामधून शिकवल्या जाणार्‍या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये सहभागी होण्यास मदत होईल.

अमली पदार्थाचे सेवन व अवैध तस्करी विरुद्ध संकल्पना – हेल्थ फॉर जस्टीस. जस्टीस फॉर हेल्थ.
 • NITI आयोगाच्या ‘राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा सर्वंकष आरोग्य निर्देशांक 2019’ यामध्ये महाराष्ट्र राज्याचा क्रमांक – तृतीय.
 • NITI आयोगाच्या ‘राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा सर्वंकष आरोग्य निर्देशांक 2019’ यामध्ये प्रथम स्थान – केरळ.
 • ‘लेसन्स लाइफ टॉट मी अननोइंगली’ या आत्मकथेचे लेखक - अनुपम खेर.
 • भारताच्या रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (R&AW) याचे पुढील प्रमुख - सामंत गोयल.
 • भारताच्या गुप्तचर विभागाचे (IB) पुढील संचालक - अरविंद कुमार.
 • संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) याचे कायमस्वरूपी सदस्य – चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका.
 • व्यवहारांच्या तपशीलाची संपूर्ण माहिती भारतात संग्रहित करण्याचे RBIचे आदेश

भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) सर्व वित्तीय संस्थांना दिला आदेश
 • सोबतच देयकांच्या व्यवहारांशी संबंधित आतापर्यंतची संपूर्ण प्रक्रियाकृत माहिती 24 तासांच्या आत परदेशातून भारतात परत आणावी तसेच परदेशातल्या सिस्टीममधून भारताची ती माहिती नष्ट करावी असे निर्देश दिले आहेत.
 • एप्रिल 2018 च्या परिपत्रकानुसार, भारताबाहेर व्यवहारांच्या माहितीवर प्रक्रिया करण्यास कोणतेही बंधन नाही. ती माहिती प्रक्रियेनंतरच भारतातच साठविली जाईल.
 • ‘डेटा लोकलायझेशन’ म्हणजे भारतातल्या ग्राहकांची माहिती विशेषतः भारतातच स्थानिक सर्व्हरवर संकलित करणे आणि साठवून ठेवणे. ती माहिती परदेशात मिरर वेबसाइट तयार करून कोणत्याही प्रकारे संग्रहित केली जाता कामा नये.

NASAच्या ‘क्यूरिओसिटी’ रोव्हरला मंगळावर मोठ्या प्रमाणात मिथेनचा साठा आढळला
 •  मंगळ ग्रहावर एका प्रयोगादरम्यान वातावरणामध्ये रेणूचे प्रमाण मोजत असताना NASAने पाठवविलेल्या ‘क्यूरिओसिटी’ नावाच्या रोव्हरला कल्पनेच्या विपरीत तेथे मोठ्या प्रमाणात मिथेन वायू उपलब्ध असल्याचे आढळून आले आहे.
 • संशोधकांना मिळालेल्या माहितीमधून असे निष्कर्ष निघाले की तेथे 21 पार्ट्स पर बिलियन या प्रमाणात मिथेन वायूची पातळी आहे, जे पूर्वी कधीही पाहिले गेले नव्हते आणि पूर्वी आढळलेल्या प्रमाणापेक्षा सुमारे तीन पटीने ते जास्त आहे. योग्य उपकरणे उपलब्ध नसल्याने ही उत्पत्ती जैविक आहे की भूगर्भीय हे अजूनही स्पष्ट झाले नाही.
 • मंगळ हा सूर्यमालेतला चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह (किंवा लाल ग्रह) असेसुद्धा म्हटले जाते. हा तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साइडमुळे मिळाला आहे. सूर्यमालेतला सर्वांत उंच पर्वत ऑलिम्पस मॉन्स तसेच सर्वांत मोठी दरी व्हॅलेस मरिनेरिस मंगळावर आहे.

आता दिव्यांग जवानांच्या पेन्शनवर कर आकारला जाणार
 • दिव्यांग जवानांना मिळणाऱ्या पेन्शनवर कर आकारण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. तिन्ही दलांसाठी हा नियम लागू असेल. 
 • याआधी सैन्य दलातून कर्तव्य बजावून निवृत्त झालेल्या जवानांना मिळणारी पेन्शन करमुक्त होती. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे. 
 • या संदर्भातली अधिसूचना अर्थ मंत्रालयानं प्रसिद्ध केली आहे.
 • 1922 च्या कायद्यानुसार सैनिकांना मिळणारी पेन्शन करमुक्त होती. अ
 • धिकाधिक जणांनी ब्रिटिशांसाठी लढावं या हेतूनं पेन्शनवर कर आकारला जात नव्हता.

Post a Comment

0 Comments