चालू घडामोडी : Daily Current Affiars 26 June 2019

26 जून सामाजिक न्याय दिन राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती
आपल्या कृतीतून सामाजिक समतेचा संदेश देणारे लोकोत्तर महाराज राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात येते.


 • मूळ नाव : यशवंतराव , वडिलांचे नाव-जयसिंगराव घाटगे ,आईचे नाव –राधाबाई
 • जन्म :२६ जून१८७४,कागल ,कोल्हापूर
 • राज्याभिषेक : २ एप्रिल १८९४ रोजी वयाच्या २० व्या वर्षी.
 • मृत्यू : ६ में १९२२ मुंबई

राजर्षि छत्रपती शाहू महाराज कार्ये :
 • १८९५ - शाहूपुरी गुळाची बाजारपेठ स्थापन .
 • २६ जुलै १९०२- रोजी एक आदेश संमत करून शासकीय सेवेत ब्राह्मणेतरांना ५०%जागा राखीव ठेवल्या .
 • १९०६ -कोल्हापूर येथे शाहू मिल ची स्थापना.
 • १९०८ -भोगावती नदीवर राधानगरी नावाचे धरण बांधले.
 • १९११- मध्ये कोल्हापुरात सत्येशोधक समाजाच्या चळवळीचे पुनरुज्जीवन करून तिचे नेतृत्व केले ,१९१३ मध्ये सत्यशोधक विद्यालय स्थापन.
 • १९१२ -नवी कृषी  तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ संस्था कोल्हापुरात स्थापन .
 • १९१३- मध्ये महाराजांनी संस्थानातील प्रत्येक खेड्यात शाळा असावी असा आदेश काढला.१९१८ मध्ये त्यांनी आणखी एक आदेश काढून  कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
 • इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.
 • १९१८ - आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात संमत.
 • संस्थानात आर्ये समाजाची स्थापना केली व  राजाराम college,राजाराम विद्यालय ,ट्रेनिंग कॉलेज यांची जबाबदारी आर्ये समाजावर सोपवली
 • कनिष्टजातींना त्रासदायक ठरणारी बलुता पद्धती नष्ट केली .
 • कुलकर्णी वतनाचे उच्चाटन करून त्यावर पगारी तलाठ्याची नेमणूक केली .
 • १९१९- संस्थानात अस्पृशतापालनास बंदी घातली.
 • १३व्या अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय परिषदेचे अध्यक्ष(कानपूर,एप्रिल१९१९ ),कानपूरच्या जनतेने त्याना”राजर्षी”पदवी दिली .
 • १९२० –भावनगर(गुजरात ) येथे आर्यधर्म परिषदेचे अध्यक्षस्थान राजांनी भूषविले .हुबळी येतील सामाजिक परिषदेचे अध्यक्ष .

राष्ट्रीय साक्षरता मिशन
 • सुरुवात :- 5 मे 1988
 • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 चा एक भाग म्हणून
 • लाभार्थी :- 15 ते 35 वर्षे वयोगट
 • लक्ष्य :- 1990 पर्यंत 3 कोटी तर 1995 पर्यंत 5 कोटी प्रौढ निरक्षरांना साक्षर बनवण्याचे लक्ष ठेवले होते. [एकूण 8 कोटी]
 • मुख्य भर :- ग्रामीण भागातील महिला अनुसूचित जाती - जमाती यांच्यावर देण्यात आला होता.

अफस्पा कायदा(AFSPA) Armed forces special power act 1958
 • 11 sept 1958 ला मंजूर
 • पंजाब मध्ये 1983 ला राबवला.
 • जम्मू काश्मिर मध्ये 1990 ला
 • त्रिपुरा ला 1997 ला
 • सध्या आसाम ,मणिपूर,नागालॅंड,अ.प्र., जम्मु काश्मिर मध्ये हा कायदा लागू.
 • लढा कोणी दिला:- इरोल शर्मिला
 • १६ वर्षे उपोषण
 • मनीपूरची आयर्न लेडी

भारतीय वायुसेना (आयएएफ) ने 24 जून, 2019 रोजी कारगिल युद्धाच्या 20 वा वर्धापनदिन साजरा
 • हा दिवस चिन्हांकित करण्यासाठी आयएएफने ग्वाल्हेर एअर बेसला 1999 मध्ये काही महत्त्वाचे हवाई ऑपरेशन्स वापरून आणि सुधारित करून वॉर थिएटरमध्ये बदलले. 
 • आयएएफने मिराज 2000 लड़ाकू विमान वापरून टाइगर हिल अटॅकचे दृश्य पुन्हा जिवंत केले. युद्धांचे महत्त्वपूर्ण कार्यक्रम पुन्हा तयार करण्यासाठी ‘मॉडेल हिल’ वर आयएएफ विमान आणि स्फोटक द्रव्ये उडवण्यात आली.

राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जबुडाव्यांचे प्रमाण गेल्या 5 वर्षांमध्ये 60% ने वाढले
 • राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जबुडाव्यांची (विलफुल डीफॉल्टर) संख्या गेल्या 5 वर्षांमध्ये 60% ने वाढली असून मार्च 2019 पर्यंत ही संख्या 8,582 एवढी होती. 2014-15 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस ही संख्या 5,349 इतकी होती.
 • कर्जबुडवे (विलफुल डीफॉल्टर) म्हणजे एखादी संस्था किंवा एखादी व्यक्ती ज्याची परतफेड करण्याची क्षमता असूनही कर्जाची परतफेड केली नाही.
 • RBIच्या निर्देशानुसार, कर्जबुडाव्यांना बँक किंवा वित्तीय संस्थांद्वारे कोणतीही अतिरिक्त सुविधा मंजूर केली जात नाही आणि त्यांच्या संस्थेला पाच वर्षे कोणतेही नवीन उपक्रम चालविण्यास बंदी घातली जात आहे.
 • भारतात 17 राष्ट्रीयीकृत बँका आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांच्या आकडेवारीनुसार, दि. 31 मार्च 2019 पर्यंत वसुलीसाठी 8,121 प्रकरणांची नोंद केली गेली आहे. सुरक्षित मालमत्तेचा समावेश असलेल्या प्रकरणांमध्ये, SARFAESI कायद्याच्या तरतुदींनुसार 6,251 प्रकरणांमध्ये कारवाई सुरू केली गेली आहे.
 • गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये कर्जबुडाव्यांकडून 7,654 कोटी रुपयांची वसुली केली गेली आहे.