चालू घडामोडी : Daily Current Affiars 23 June 2019

भारताने अफगाणिस्तानवर विजय मिळवत मोहम्मद शमी विश्वचषकात हॅटट्रीक नोंदवणारा पहिला गोलंदाज ठरला • शनिवारी पार पडलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 224 धावा करत अफगाणिस्तान समोर विजयासाठी 225 धावांचे आव्हान ठेवले होते.
 • 225 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डाव 49.5 षटकात सर्वबाद 213 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे भारताने 11 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने 52 धावांची अर्धशतकी खेळी करत शेवटपर्यंत एकाकी झुंज दिली होती.
 • पण अखेर त्याला शेवटच्या षटकात मोहम्मद शमीने बाद केले. त्याला बाद केल्यानंतर लगेचच पुढील दोन चेंडूत शमीने आणखी दोन विकेट्स घेतल्या आणि हॅट्रिकही साजरी केली.
 • भारताकडून गोलंदाजीत शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर बुमराहने रेहमत शहा(36) आणि हशमततुल्लाह शाहीदी(21) यांच्या महत्त्वाच्या 2 विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला. त्याचबरोबर या दोघां व्यतिरिक्त युजवेंद्र चहल आणि हार्दिक पंड्यानेही प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

RBI ‘बॅसेल III’चे निकष पूर्ण करण्यात अपयशी ठरला
 • बॅसेल कमिटी ऑन बँक सुपरव्हीजन (BCBS) या संस्थेच्या अहवालानुसार, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ‘बॅसेल III’ नियमांनुसार ठरविण्यात आलेल्या कठोर मानदंडांची पूर्तता करण्यास कमी पडली आहे.
 • अहवालानुसार RBIने अद्याप टोटल लॉस-अब्सोर्बिंग कपॅसिटी (TLAC) आवश्यकतांच्या संदर्भातले सुरक्षिततासंबंधी कार्यचौकट आणि नियम प्रकाशित केलेले नाहीत, जेव्हा की जागतिक पातळीवर हे नियम 1 जानेवारी 2018 रोजी प्रभावी झालेले आहेत. 
 • शिवाय RBIने TLAC आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ठरविलेली अंतिम मुदत चुकविली आहे, ज्यामुळे वित्तीय स्थिरता निश्चित होते.

मेक्सिकोची खाडी येथील ‘मृत क्षेत्र’ विस्तारत आहे
 • नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमोस्फोरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेषण आणि लुइसियाना स्टेट युनिव्हर्सिटी येथील शास्त्रज्ञांनी असा अंदाज वर्तविला आहे की या वसंत ऋतुच्या पावसामुळे मेक्सिकोच्या खाडीत सर्वात मोठे "मृत क्षेत्र" तयार होऊ शकते.
 • मेक्सिकोच्या खाडीतले मृत क्षेत्र मिसिसिपी नदीच्या मुखापासून निघणार्‍या पाण्याने तयार होते, जे जगातले द्वितीय क्रमांकाचे सर्वात मोठे मृत क्षेत्र आहे. प्रत्येक उन्हाळ्यात ते उष्णतेने वाढते. जेव्हा उबदार पाण्यामुळे सूक्ष्मजीवांचे चयापचय वाढते आणि वातावरण बदलत असते तेव्हा ही परिस्थिती आणखीनच  वाईट होऊ शकते.

मृत क्षेत्र म्हणजे काय?

 • शहरीकरण आणि कृषी यासारख्या मानवी क्रियाकलापांमुळे एकपेशीय वनस्पती (अल्गी) यांचे प्रमाण वाढल्यामुळे जलमार्गांमध्ये ऑक्सीजन नसलेले "मृत क्षेत्र" दिसून येते. या घटनेला “युट्रोफिकेशन” असे म्हणतात.
 • युट्रोफिकेशनच्या घटनेत नायट्रोजन आणि फॉस्फरस यांचे प्रमाण वाढते, जे एकपेशीय वनस्पतीच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावते. तसेच त्यामधून कार्बन डाय-ऑक्साईड देखील तयार होतो, जो सागरी पाण्याचे pH कमी करते.

DRDO, JNU येथील शास्त्रज्ञांनी अधिक शक्तिशाली अँथ्रॅक्स लस विकसित केली
 • संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) येथील शास्त्रज्ञांनी अधिक शक्तिशाली अशी अँथ्रॅक्स लस विकसित केली आहे.
 • ते असा दावा करतात की नवीन लस सध्या उपलब्ध असलेल्या लसींपेक्षा अधिक प्रभावी, कारण ते अँथ्रॅक्सटॉक्झिन तसेच स्पोरसला अश्या रोगांसाठी प्रतिकारशक्ती वाढवते.
 • अँथ्रॅक्स हा बॅसिलस अँथ्रॅसिस या रोगजणूकामुळे होणारा एक रोग आहे. बॅसिलस अँथ्रॅसिस हे मातीत आढळून येतात. हे मानवाच्या तुलनेत अनेकदा जनावरे, मेंढी आणि बकरी यासारखे पशूंच्या आरोग्याला प्रभावित करते. मानव संक्रमित असलेल्या प्राण्याच्या संपर्कात आल्याने या रोगाचा मानवात प्रसार होतो.
आसाम राज्यात ‘कौशल्य विद्यापीठ’ उभारले जाणार

 • आसाम राज्य सरकारने दारंग जिल्ह्यात 850 कोटी रुपये खर्चून कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रस्तावित संस्था ‘कौशल्य शहर’ म्हणून ओळखली जाईल.
 • हे देशातले पहिले कौशल्य विद्यापीठ असू शकते, जिथे 10 हजार जागा असतील. त्यापैकी 80 टक्के जागा आसामसाठी राखीव तर उर्वरित जागा ईशान्येकडील राज्यांसाठी राखीव ठेवले जातील.

महाराष्ट्रातील महिला धोरणाला 25 वर्ष पूर्ण
 • 1994 साली महाराष्ट्र राज्याचे महिला धोरण जाहीर.
 • महाराष्ट्र - 1993 - महिला आणि बालविकास स्वतंत्र खाते निर्माण.
 • राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाल्यानंतर 'राज्य महिला आयोगाची' स्थापना करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले होते.
 • सरकारी- निमसरकारी विभागात महिलांना 30% आरक्षण देणारे देशातील प्रथम राज्य.
 • स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 33%(नंतर 50%) आरक्षण देणारे महाराष्ट्र देशातील प्रथम राज्य.

Post a Comment

0 Comments