चालू घडामोडी : Daily Current Affiars 22 June 2019

फोर्ब्सच्या यादीत भारतातील ५७ कंपन्या :
 • नवी दिल्ली : जगातील २०० बड्या कंपन्यांच्या यादीत यंदा भारतातील ५७ कंपन्यांना स्थान मिळाले आहे. मात्र पहिल्या २०० कंपन्यांत रिलायन्स इंडस्टीज ही एकच भारतीय कंपनी आहे. 
 • या यादीत ६१ देशांतील कंपन्यांचा समावेश असून, त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ५७५ कंपन्या अमेरिकेतील आहेत.
 • फोर्ब्सच्या यावर्षीच्या २०० जागतिक पातळीवरील कंपन्यांच्या यादीत इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक आ‍ॅफ चायना पहिल्या स्थानी आहे. 
 • या २०० कंपन्यांत एचडीएफसी बँक, ओएनजीसी, इंडियन आ‍ॅईल, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, एल अँड टी, स्टेट बँक एनटीपीसी, टाटा स्टील, कोल इंडिया, कोटक महिंद्रा बँक, भारत पेट्रोलियम, इन्फोसिस, अ‍ॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, आयटीसी, भारती एअरटेल, विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, हिंडाल्को, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व, गेल, पंजाब तॅशनल बँक, बँक आ‍ॅफ बडोदा, कॅनरा बँक आदींचा समावेश आहे.
सुपर कॉम्प्युटर 'डीजीएक्स-2' भारतात
 • कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत जगात सर्वात शक्‍तिशाली असलेला सुपर कॉम्प्युटर 'डीजीएक्स-2' आता भारतातही आला आहे.
 • हा कॉम्प्युटर आयआयटी जोधपूरमध्ये बसवण्यात आला आहे. यामुळे देशातील कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित प्रशिक्षणाला गती मिळू शकेल.
 • जोधपूरमध्ये कॉम्प्युटर सायन्स विभागाचे अध्यक्ष डॉ. गौरव हरित यांनी सांगितले, हा जगातील सर्वात वेगवान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अ‍ॅप्लिकेशन्ससाठी सर्वात शक्‍तिशाली सुपर कॉम्प्युटर आहे.
 • तो एका विशेष प्रयोगशाळेत बसवण्यात आला आहे. या सुपर कॉम्प्युटरची किंमत सुमारे 2.50 कोटी रुपये आहे. त्यामध्ये 16 विशेष जीपीयू कार्ड बसवले असून प्रत्येकाची क्षमता 32 जीबीची आहे.
 • तिची रॅम 512 जीबी आहे. सामान्य कॉम्प्युटरची क्षमता केवळ 150 ते 200 वॅट असते तर या सुपर कॉम्प्युटरची क्षमता 10 किलोवॅट आहे.

चंद्रबाबू नायडू यांचे 4 टीडीपी राज्यसभा खासदार भाजपामध्ये सामील झाले
 • मोठ्या राजकीय झगड्यात, चार तेलुगू देशम पक्ष (टीडीपी) च्या 4 राज्यसभा सदस्यांनी भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. 
 • सध्या, राज्यसभेत टीडीपीचे सहा खासदार आहेत. राज्यसभेचे तीन टीडीपी खासदार- रमेश, वाईएस चौधरी, टीजी वेंकटेश हे भाजपा कार्यकारिणी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये सामील झाले. 
 • चौथा टीडीपी राज्यसभा खासदार, जीएम राव लवकरच औपचारिकपणे भाजपमध्ये सामील होतील. 
 • या चार राज्यसभा खासदारांनी 20 जून रोजी उपाध्यक्ष वेंकय्या नायडू यांना टीडीपीमधून आपला राजीनामा सोपला.

महाराष्ट्राने तेलंगाणाला दिली जगातील 'या' सर्वांत मोठ्या सिंचन प्रकल्पाची भेट!
 • महाराष्ट्र, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी नदीवरील तेलंगाणामधील जयशंकर भूपलपल्ली जिल्ह्यातील मेडीगड्डा येथील जगातील सर्वात मोठ्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पाचे आज लोकार्पण झाले.
 • ८० हजार कोटी खर्चून उभारलेल्या या मेगा जलसिंचन प्रकल्पाचे उदघाटन तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते झाले.
 • कालेश्वरम सिंचन प्रकल्पाची उभारणी विक्रमी वेळेत केली असून याद्वारे गोदावरीचे १३ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी लिफ्टद्वारे उचलले जाणार आहे.
 • हे पाणी उचलण्यासाठी जमिनीखाली १४.०९ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केला आहे. तर यामुळे ४५ लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
 •  या प्रकल्पामुळे हैदराबाद शहरातील एक कोटी लोकांना पिण्याचे आणि तेलंगाणातील उद्योगांना १६ टीएमसी पाणी मिळणार आहे.

DRDO, JNU येथील शास्त्रज्ञांनी अधिक शक्तिशाली अँथ्रॅक्स लस विकसित केली
 • संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) येथील शास्त्रज्ञांनी अधिक शक्तिशाली अशी अँथ्रॅक्स लस विकसित केली आहे.
 • ते असा दावा करतात की नवीन लस सध्या उपलब्ध असलेल्या लसींपेक्षा अधिक प्रभावी, कारण ते अँथ्रॅक्सटॉक्झिन तसेच स्पोरसला अश्या रोगांसाठी प्रतिकारशक्ती वाढवते.
 • अँथ्रॅक्स हा बॅसिलस अँथ्रॅसिस या रोगजणूकामुळे होणारा एक रोग आहे. बॅसिलस अँथ्रॅसिस हे मातीत आढळून येतात. हे मानवाच्या तुलनेत अनेकदा जनावरे, मेंढी आणि बकरी यासारखे पशूंच्या आरोग्याला प्रभावित करते. 
 • मानव संक्रमित असलेल्या प्राण्याच्या संपर्कात आल्याने या रोगाचा मानवात प्रसार होतो.

Post a Comment

0 Comments