चालू घडामोडी : Daily Current Affiars 20 June 2019

'रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर' संस्थेने जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक २०१९ प्रसिद्ध केला
 • जगभरातल्या १८० देशांचा जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक २०१९ मध्ये समावेश करण्यात आला.
 • जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक २०१९ मध्ये भारत १४० व्या क्रमांकावर
 • जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक २०१९ मध्ये नॉर्वे अव्वल स्थानी विराजमान, पाकिस्तान १४२ व्या क्रमांकावर, चीन १७७ व्या क्रमांकावर, बांगलादेश १५० व्या स्थानावर आहे.
 • तुर्कमेनिस्तान जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक २०१९ मध्ये शेवटच्या (180 व्या) क्रमांकावर.
आसाम राज्यात ‘कौशल्य विद्यापीठ’ उभारले जाणार
 • आसाम राज्य सरकारने दारंग जिल्ह्यात 850 कोटी रुपये खर्चून कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रस्तावित संस्था ‘कौशल्य शहर’ म्हणून ओळखली जाईल.
 • हे देशातले पहिले कौशल्य विद्यापीठ असू शकते, जिथे 10 हजार जागा असतील. त्यापैकी 80 टक्के जागा आसामसाठी राखीव तर उर्वरित जागा ईशान्येकडील राज्यांसाठी राखीव ठेवले जातील.

जागतिक पशू-आरोग्य संघटनेची ‘वन हेल्थ कंसेप्ट’ (OHC) संकल्पना
 • जागतिक पशू-आरोग्य संघटना (OIE) कडून ‘वन हेल्थ कंसेप्ट’ (OHC) ही त्याची संकल्पना स्पष्ट केली आहे.
 • ‘वन हेल्थ कंसेप्ट’ (OHC) याचा अर्थ असा की "मानवी-आरोग्य आणि पशू-आरोग्य एकमेकांवर अवलंबून असते आणि ते अस्तित्वात असलेल्या पर्यावरणाच्या स्थितीशी निगडित आहे."
 • इ.स.पू. 400 मध्ये हिप्पोक्रेट्सने देखील ही संकल्पना स्पष्ट केली होती. जसजशी लोकसंख्या वाढते तसतशी पाळीव आणि वन्य प्राण्यांशी अधिकाधीक संपर्क वाढतो आणि त्यातून रोगांचा प्रसार होण्याची शक्यता वाढते. 
 • सोबतच हवामानातले बदल, जंगलतोड आणि अत्याधिक शेतीमुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो.

NITI आयोग 5 वी बैठक 2019
 • नीती आयोगाची आज 5 वी बैठक राष्ट्रपती भवनात पार पडली.
 • यामध्ये सर्व मंत्री ,सर्व राज्य सरकार  मुख्यमंत्री केंद्रशासित प्रदेश गव्हर्नर, काही प्रमुख अधिकारी हजार होते.
 • बांग्लादेश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्रप्रदेश मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, आणि पंजाब मुख्यमंत्री अमरेंद्र सिंग गैरहजर होते.
 • या बैठकीला संबोधित करताना मोदी म्हणाले कि,सबका साथ ,सबका विकास आणि सबका विश्वास वाढवण्यासाठी NITI  आयोग महत्त्वाची भूमिका  पार पाडले.
 • भारताला 2024 पर्यंत 5 trillion $(34,94,0000 करोड रु)  इकॉनॉमी बनवायची आहे हे लक्ष कठीण आहे पण अश्यक्य नाही असे मोदी बोलले​​मुंबईत ‘किम्बर्ले प्रोसेस’ संदर्भात आंतरसत्रीय बैठक आयोजित
 • 17 जून ते 21 जून 2019 या काळात मुंबई (महाराष्ट्र) या शहरात भारताच्या अध्यक्षतेत ‘किम्बर्ले प्रोसेस’ संदर्भात आंतरसत्रीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.
 • भारत दि. 1 जानेवारी 2019 पासून ‘किम्बर्ले प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम (KPCS)’ याचे अध्यक्षपद भूषवित आहे.
 • 2003 साली ‘किम्बर्ले प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम (KPCS)’ याचा शुभारंभ करण्यात आला.
 • क्षमता बांधणी, तांत्रिक सहाय्य आणि मूल्यमापनासंबंधी शिक्षण, नैसर्गिक आणि प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे यामधील फरक ओळखणे, कायदेशीर आणि औपचारिक खनिकर्म सराव पद्धतींचे महत्त्व याबाबतीत आर्टिसनल आणि स्मॉल-स्केल मायनिंग (ASM) यांना मदत पुरविणे, हे KPCSचे उद्दिष्ट आहे.
 •  हिरे उत्पादन, व्यापार आणि निर्मिती यावर अवलंबून असलेल्या लोकांच्या जीवनमानांबद्दल कार्यक्षम, अधिक पारदर्शी वितरणाच्या दृष्टीने ते वचनबद्ध असलेल्या बाबतीत समावेशकता, मजबूत प्रशासन आणि अंमलबजावणीच्या दृष्टीने KPCSच्या माध्यमातून मजबूत प्रक्रिया तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातात.