चालू घडामोडी : Daily Current Affiars 19 June 2019

2027 मध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या भारतात : अहवाल
 • संयुक्त राष्ट्राने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, भारताच्या लोकसंख्येत 2050 पर्यंत 27.3 कोटींची वाढ होऊ शकते
 • 2027 च्या सुमारास चीनला मागे टाकत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनू शकतो
 • संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक कामकाज विभागाच्या पॉप्युलेशन डिव्हिजनच्या 'द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट 2019 हायलाईट्स' मध्ये ही बाब नमूद.
अहवालात काय म्हटले आहे?
 • पुढील 30 वर्षांमध्ये जगाच्या लोकसंख्येत दोन अब्जांपर्यंत वाढ होईल.
 • 2050 पर्यंत लोकसंख्येत दोन अब्जांनी वाढ होऊन, ती 7.7 अब्जांवरुन 9.7 अब्जापर्यंत पोहोचण्याची शक्यता.
 • जगाची लोकसंख्या या शतकाच्या अखेरपर्यंत सुमारे 11 अब्जांपर्यंत पोहोचू शकते.
 • 2050 पर्यंत लोकसंख्येत जेवढी वाढ होईल, त्यापैकी निम्मी वाढ ही भारत, नायजेरिया, पाकिस्तान, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, इथियोपिया, तांझानिया, इंडोनेशिया, इजिप्त आणि अमेरिकेत होण्याचा अंदाज.
 • सध्याच्या घडीला लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर असून पहिल्या स्थानावर चीन आहे.

भारताला ५ ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणे मोठे आव्हान - पंतप्रधान
 • सन २०२४ पर्यंत भारताची अर्तव्यवस्था ५ ट्रिलिअन डॉलरपर्यंत (५ लाख कोटी डॉलर) पोहोचवण्याचे सरकारचे ध्येय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. हे ध्येय गाठणे आव्हानात्मक असले तरी प्राप्त करण्यासारखे आहे.
 • मोदी म्हणाले, आगामी काळात सरकारच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या धोरणाची अंमलबजावणी करण्यात निती आयोग महत्वाची भुमिका बजावेल.
 • सन २०२४ पूर्वी भारताला ५ ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. हे मोठे आव्हान आहे मात्र ते गाठता येऊ शकते. यासाठी राज्यांनी त्यांची मूळ क्षमता ओळखून जिल्हा स्तरावर जीडीपीचे टार्गेट वाढवण्यासाठी काम करायला हवे, अशी अपेक्षा यावेळी मोदींनी व्यक्त केली.

ब्रिटनमधील ‘तंत्रव्हिसा’त भारत, अमेरिकेची आघाडी
 • इंग्लंडमधील डिजिटल तंत्रज्ञानविषयक उद्योजकांच्या समूहाने दिलेल्या माहितीनुसार, तेथील तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जास्तीत जास्त व्हिसा अर्ज करणाऱ्यांत भारतासह अमेरिकेचा वरचा क्रमांक लागतो.
 • ब्रिटनच्या गृहविभागाची मान्यता असलेल्या ‘टेक नेशन’ या संस्थेतर्फे तेथील तंत्रज्ञान क्षेत्रातील व्हिसा दिला जातो. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रासाठीच्या टेक नेशन प्रथम स्तरीय असाधारण प्रज्ञा व्हिसा वर्गवारीत २०१८-१९ मध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे
 • याविषयी याच आठवडय़ात ‘टेक नेशन’चा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. तंत्रज्ञानविषयक व्हिसासाठी येणारे सर्वाधिक अर्ज हे यंदाही भारत आणि अमेरिकेतून आले आहेत. यात सॉफ्टवेअर अभियंते, या क्षेत्रातील उद्योक विकासक, एआय-मशीन लर्निग, फिनटेक-एन्टरप्राईज, क्लाऊड सेक्टर यांचा समावेश आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
 • तंत्रज्ञान व्हिसासाठी मोठय़ा प्रमाणावर अर्ज करणाऱ्यांत नायजेरिया, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचाही समावेश आहे.  २०१४ पासून टेक नेशन व्हिसासाठी एक हजार ६५०हून अधिक अर्ज आले होते.

‘चंद्रयान-2’ मोहिमेच्या दोन महिला प्रमुख
 • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) पहिल्यांदाच दोन महिला शास्त्रज्ञांची एका अंतराळ मोहिमेसाठी प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे.
 • रितू करिधल (मिशन डायरेक्टर) आणि मुथैय्या वनिता (प्रकल्प संचालक) ही त्यांची नावे आहेत.
 • ISRO 15 जुलैला चंद्रयान-2 मोहीम आंध्रप्रदेशाच्या श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केली जाईल.
 • रितू करिधल यांना ‘रॉकेट वूमन ऑफ इंडिया’ असंही म्हटले जाते.
 • त्या मंगळयान मोहिमेच्या म्हणजेच 'मार्स ऑर्बिटर मिशन'च्या डेप्युटी डायरेक्टरही होत्या.
 • 2007 साली त्यांना माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते इस्रो यंग सायंटिस्ट पारितोषिक मिळाले.
 •  एम. वनिता यांच्याकडे डिजाईन इंजिनिअरिंगची पदवी आहे.
 •  त्यांनी अनेक वर्ष उपग्रहांवर काम केले आहे.

चंद्रयान-2 मोहीम 
 • चंद्रयान-2 ही अत्यंत महत्त्वाची अंतराळ मोहीम असून यात एक ऑर्बिटर आहे, एक 'विक्रम' नावाचे लँडर आहे आणि एक 'प्रज्ञान' या नावाचे रोव्हर आहे.
 • 3.8 टन वजन असलेली चंद्रयान-2 या अंतराळ मोहिमेचा संपूर्ण खर्च हा 600 कोटीपेक्षा अधिक असल्याचे म्हटले जात आहे.
 • या मोहिमेद्वारे पहिल्यांदाच भारत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. असे झाले तर चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करणाऱ्या देशांच्या पंक्तीत भारताचा समावेश होईल.
 • याआधी ऑक्टोबर 2008 मध्ये ISRO चंद्रयान-1 या यानाला चंद्रावर पाठवले होते.

UNCTAD याचा ‘जागतिक गुंतवणूक अहवाल 2019’
 • संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) कडून त्याचा ‘जागतिक गुंतवणूक अहवाल 2019’ याच्यानुसार, 2018 साली भारतात 42 अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक (FDI) झाली
 • दक्षिण आशियाई क्षेत्रात झालेल्या FDIपैकी जवळपास 77% गुंतवणूक भारतात झाली. भारतातली FDI गुंतवणूक 6 टक्क्यांनी वाढून 42 अब्ज डॉलर एवढी झाली.
 • संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) याची स्थापना 1964 साली करण्यात आली. त्याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे. संघटनेला 16 एप्रिल 1985 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने स्वीकारले आणि 22 डिसेंबर 2015 रोजी त्याला सुधारित केले गेले.
 • ही संघटना व्यापार, गुंतवणूक आणि विकास मुद्दे संबंधित क्षेत्रात एक प्रमुख म्हणून कार्य करते. सध्या, UNCTAD चे 194 सदस्य राज्ये आणि देश आहेत.

एव्हरेस्टवर जगातले सर्वात उंचीवरचे हवामान केंद्र उभारले
 • एव्हरेस्ट या जगातल्या सर्वोच्च शिखरावर जगातले सर्वात उंचीवरचे हवामान केंद्र उभारण्यात आले आहे
 • नॅशनल जियोग्राफिक सोसायटी आणि त्रिभुवन विद्यापीठ येथील शास्त्रज्ञांनी तेथे एका अंतराने दोन हवामान केंद्रांची स्थापना केली आहे. एक केंद्र 8,430 मीटर (27,657 फूट) आणि दुसरे 7,945 मीटर (26,066 फूट) उंचीवर उभारण्यात आले आहे. तसेच, आणखी तीन केंद्र उभारले जात आहे.
 • जागतिक तापमान वाढीचा हिमनद्यांवर कसा प्रभाव पडतो याचा अभ्यास करण्यासाठी लागणारी माहिती गोळा करण्याचा उद्देश आहे.
 • हिमालय ही आशिया खंडात पसरलेली जगातली सर्वांत उंच पर्वतरांग आहे. हिमालय पर्वतरांगा भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करते. 
 • येथे ‘एव्हरेस्ट’ (उंची 8848 मीटर) हे जगातले सर्वोच्च शिखर आहे. ह्या पर्वतरांगेची लांबी 2400 किलोमीटर पेक्षाही जास्त आहे. ही पर्वतरांग भारत, पाकिस्तान, नेपाळ, चीन, भुटान या देशांमधून जाते.

‘नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र (NDIAC) विधेयक-2019’ याला मंजुरी
 • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीने ‘नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र (NDIAC) विधेयक-2019’ याला मंजुरी दिली.
 • हे विधेयक नवी दिल्लीत संस्थात्मक लवाद प्रकरणांमध्ये मध्यस्थीसाठी स्वतंत्र आणि स्वायत्त संस्था स्थापन करण्यास मदत करते. 
 • शिवाय हे विधेयक दि. 2 मार्च 2019 पासून प्रभावी करत आंतरराष्ट्रीय पर्यायी तंटा निवारण केंद्र याचे अधिग्रहण करण्यासाठी आणि त्याच्या कामकाजाची जबाबदारी NDIAC कडे हस्तांतरित करण्यासाठीच्या उद्देशाने आहे.
 • प्रस्तावित NDIAC यामध्ये एक अध्यक्ष असणार, जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा तज्ञ व्यक्ती असणार.