चालू घडामोडी : Daily Current Affiars 14 June 2019

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना JNUकडून ‘डिस्टिंग्विश्ड अ‍ॅल्युमिनी अवॉर्ड’ दिला जाणार
 • अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र कल्याण मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) कडून ‘डिस्टिंग्विश्ड अ‍ॅल्युमिनी अवॉर्ड’ दिला जाणार आहे.
 • केंद्रीय मंत्री सीतारामन आणि जयशंकर हे नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) विद्यार्थी होते. त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून ऑगस्ट 2019 मध्ये एका कार्यक्रमात त्यांना हे पुरस्कार दिले जाणार आहे.
खासदार वीरेंद्र कुमार १७ व्या लोकसभेचे ‘प्रोटेम स्पीकर’
 • १७ व्या लोकसभेसाठी भाजपा खासदार डॅाक्टस वीरेंद्र कुमार खटिक यांना मंगळवारी ‘प्रोटेम स्पीकर’ म्हणुन नियुक्त करण्यात आले आहे. 
 • वीरेंद्र कुमार हे मध्यप्रदेशमधील टीकमगढचे खासदार आहेत. आता ते सर्व खासदारांना शपथ देतील.

शरद कुमार: प्रभारी केंद्रीय दक्षता आयुक्त
 • केंद्रीय दक्षता आयुक्त के. व्ही. चौधरी यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर 9 जून 2019 रोजी भारत सरकारने दक्षता आयुक्त शरद कुमार यांची प्रभारी केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे.
 • ही नियुक्ती 10 जूनपासून प्रभावी झाली आहे आणि पदावर पुढील नियुक्ती होतपर्यंत ते या पदाचा कारभार सांभाळतील.
 • भारताचे केंद्रीय दक्षता आयोग (CVC) भारत सरकारच्या विभिन्न विभागांच्या अधिकारी/कर्मचारी यांच्या संबंधित भ्रष्टाचार नियंत्रणाची सर्वोच्च संस्था आहे. याची स्थापना सन 1964 मध्ये झाली.
 • ही कोणत्याही कार्यकारी अधिकारीच्या नियंत्रणापासून मुक्त आहे आणि केंद्र सरकाराच्या अंतर्गत सर्व दक्षता कृतींवर देखरेख ठेवते. आयोगात एक केंद्रीय दक्षता आयुक्त (CVC) आणि दोन दक्षता आयुक्त नियुक्त केले जातात.

ब्रॅंड्झ टॉप 100 मोस्ट व्हॅल्यूएबल ग्लोबल ब्रँड्स 2019
 • ‘ब्रॅंड्झ टॉप 100 मोस्ट व्हॅल्यूएबल ग्लोबल ब्रँड्स 2019’ हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत अमॅझोनने अ‍ॅपल या ब्रॅंडला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.
 • वर्षाला 52% या दराने वाढत आज अमॅझोनच्या ब्रॅंडची किंमत 315.5 अब्ज डॉलर एवढी झाली आहे.
 • अमेरिकेतल्या कंपन्यांनी यावर्षीच्या यादीत प्रथम दहा क्रमांकांमध्ये सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत.
 •  त्यात 309 .5 अब्ज डॉलरसह अ‍ॅपल, 309 अब्ज डॉलरसह गूगल आणि 251 अब्ज डॉलरसह मायक्रोसॉफ्ट या अनुक्रमे द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ स्थानी आहेत.
 • या यादीत आशियातले 23 ब्रॅंड सूचीबद्ध आहेत, त्यात 15 तर केवळ चीनचे आहेत.तीन भारतीय कंपन्यांना यावर्षी या यादीत स्थान मिळाले आहे, त्या आहेत – HDFC बँक (60), भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) (68) आणि टाटा कन्सल्टंसी सर्विसेस (TCS) (97).

हवाई दलाच्या बेपत्ता‘AN-32’ विमानाचे  अवशेष सापडले
 • भारतीय हवाई दलाचे ‘AN-32’ हे विमान आसाममधल्या हवाई दलाच्या तळावरुन 3 जून 2019 रोजी बेपत्ता झाले होते. 
 • या परिसरात शोध घेणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरला लिपोच्या उत्तरेकडे 16 किलोमीटरच्या अंतरावर अंदाजे 12,000 फूट उंचीवर या विमानाचे अवशेष आढळले.
 • तब्बल आठ दिवसांच्या शोधानंतर बेपत्ता असलेल्या विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशातील लिपो भागात दिसल्याची माहिती दिली गेली. 
 • या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच हे विमान रडार वरून बेपत्ता झाले होते.
 • 3 जून रोजी आसाममधील जोरहाटहून अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागात असलेल्या मेनचुका येथे जाण्यासाठी हे विमान दुपारी 12.25 वाजता निघाले होते. 
 • मात्र पुढच्या 35 मिनिटांतच त्याचा रडारशी संपर्क तुटला होता. त्यानंतर भारतीय सैन्यदलाकडून युद्धपातळीवर विमानाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु होते.

नव्या तीन तलाक विरोधी विधेयकाला केंद्राची मंजुरी
सतराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन १७ जूनपासून सुरू होत असून मोदी सरकार आपल्या नव्या पर्वातील पहिल्याच अधिवेशनात तीन तलाक विरोधी विधेयक संसदेत मांडणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नव्या तीन तलाक विरोधी विधेयकाला मंजुरी देण्यात आली. याबाबत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती दिली.

विरोधकांच्या मागणीनुसार केलेले बदल:
 • पत्नी वा तिच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने केलेली तक्रारच ग्राह्य धरली जाईल.
 • पती आणि पत्नीची सहमती असल्यास न्यायदंडाधिकारी समेट घडवून आणू शकतात.
 • तीन तलाक हा आता अजामीनपात्र गुन्हा नसेल. पत्नीचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायदंडाधिकारी जामिनावर निर्णय देऊ शकतात.

राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवलाजम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीचा कालावधी सहा महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णयही आज घेण्यात आला. ३ जुलै २०१९ पासून पुढील सहा महिने तिथे राष्ट्रपती राजवट राहणार आहे.

भारतातल्या TCS कंपनीचे भागभांडवल IBM कंपनीपेक्षाही जास्त ठरले
 • BSE आणि ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, भारतातल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या तंत्रज्ञान सेवा कंपनीने बाजारपेठेतल्या भागभांडवलाच्या संदर्भात IBM कंपनीलाही मागे टाकले आहे.
 • दि. 10 जून रोजी व्यापाराच्या अखेरीस TCSचे बाजार भांडवल 120.5 अब्ज डॉलर (किंवा 8.37 लक्ष कोटी रुपये) होते, तर अमेरीकेमधील IBM कंपनीचे भांडवल 119.6 अब्ज डॉलर होते.
 • तसेच TCS ने रिलायन्स इंडस्ट्रीजला (8.36 लाख कोटी रुपये) मागे टाकत  सर्वाधिक किंमतीची भारतीय कंपनी ठरली आहे.