चालू घडामोडी : Daily Current Affiars 12 June 2019

IAAF ला परत एकदा ‘वर्ल्ड अ‍ॅथलेंटीक्स’म्हणून ओळख दिली जाणार
 • जागतिक मैदानी खेळाडूंचे प्रशासकीय मंडळ म्हणून ओळखले जाणारे ‘इंटरनॅशनल एसोसिएशन ऑफ अ‍ॅथलेंटीक फेडरेशन्स (IAAF)’ या क्रिडा-संघटनेला परत एकदा “वर्ल्ड अ‍ॅथलेंटीक्स” अशी ओळख देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • वर्तमानातले नाव 2001 साली स्वीकारले गेले होते. नव्या निर्णयानुसार ऑक्टोबर 2019 मध्ये IAAFचे वर्तमान नाव बदलून “वर्ल्ड अ‍ॅथलेंटीक्स” असे केले जाणार.
 • इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अ‍ॅथलेंटीक फेडरेशन्स (IAAF) ही अ‍ॅथलेंटीकच्या खेळासाठीची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. IAAFची स्थापना 1912 साली इंटरनॅशनल आर्मेचर अ‍ॅथलेंटीक्स फेडरेशन या नावाने करण्यात आली. IAAF चे मुख्यालय मोंटे कार्लो (मोनॅको) येथे आहे. या महासंघाचे 215 राष्ट्रीय संघ सदस्य आहेत.
भारताच्या ‘डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी’ने UNDPचा ‘इक्वेटर’ पारितोषिक जिंकला
 • संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) कडून दहाव्या ‘इक्वेटर’ पारितोषिक विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. जगभरातल्या 22 स्थानिक आणि स्वदेशी समुदायांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
 • विजेत्यांमध्ये भारताच्या ‘डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी’ या संस्थेचाही समावेश आहे. विजेते बेनिन, ब्राझिल, कॅमेरून, इक्वाडोर, इंडोनेशिया, केनिया, मायक्रोनेशिया, नायजेरिया, पाकिस्तान, पेरू, टांझानिया आणि वानुआतू या देशांमध्ये कार्यरत असलेल्या संस्था आहेत.
 • डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी भारताच्या झहिराबाद या प्रदेशात दरिद्री आणि आदिवासी महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिलांच्या नेतृत्वात कृषी-कार्ये आणि समुदायिक बियाणे बँकांना प्रोत्साहन देते. तसेच जमिनीचा शाश्वत वापर आणि अन्न सुरक्षा साध्य करण्यासाठी प्रोत्साहन देते.
 • 2002 सालापासून UNDP कडून ‘इक्वेटर’ पारितोषिक दिला जात आहे. यावेळी विजेत्यांना प्रत्येकी USD 10,000 एवढी रोख रक्कम प्राप्त होणार. तसेच न्यूयॉर्कमध्ये होणार्‍या 74 व्या संयुक्त राष्ट्रसंघ आमसभा (UNGA) बैठकीदरम्यान शिखर परिषदेत दोन प्रतिनिधींना सहभागी होण्याची संधी दिली जाणार.

UAE देशाचे “नॅशनल स्ट्रॅटजी फॉर वेलबीइंग2031” धोरण
 • 9 जून रोजी संयुक्त अरब अमिरात (UAE) या देशाने “नॅशनल स्ट्रॅटजी फॉर वेलबीइंग 2031” हे धोरण मंजूर केले.
 • प्रस्तावानुसार धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेस समर्थन देण्यासाठी प्रथमच 'नॅशनल वेलबीइंग ऑब्जर्वेटरी' तयार केले जाणार आहे. यामधून 40 पेक्षा अधिक प्राथमिक क्षेत्रांमध्ये 90 सहकारी उपक्रमांना राबवविले जाणार आहे. 
 •  याद्वारे ‘UAE व्हिजन 2021’ आणि ‘UAE सेंटेनियल 2071’ या धोरणांना समर्थन देऊन सुदृढतेच्या समाकलित संकल्पनांचा प्रचार करण्याचा हेतू आहे.
 • संयुक्त अरब अमिरात (UAE) हा एक अरबी द्वीपकल्प देश आहे जो प्रामुख्याने पारशी (अरब) आखाती प्रदेश आहे. हा देश 7 अमिरातीचा महासंघ आहे. अबू धाबी ही या देशाची राजधानी आहे आणि ‘यूएई दिरहम’ हे राष्ट्रीय चलन आहे.

NITI आयोगाची पुनर्रचना :
 • भारत सरकारने NITI आयोगाची पुनर्रचना केली आहे. नव्याने निवडल्या गेलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकार च्या द्वितीय कार्यकाळात NITI आयोगाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
 • पंतप्रधानांनी पुनर्रचनेला मंजुरी दिली असून ती पुढीलप्रमाणे आहे
 • अध्यक्ष : पंतप्रधान नरेंद्र मोदी
 • उपाध्यक्ष : डॉ. राजीव कुमार
 • पूर्ण-वेळ सदस्य : व्ही. के. सारस्वत, प्रा. रमेश चंद, डॉ. व्ही. के. पॉल
 • कार्यकारी अधिकारी : राज नाथ सिंग, अमित शाह, निर्मला सीतारमण, नरेंद्र सिंग तोमर
 • विशेष आमंत्रित : नितीन गडकरी, थावर चंद गेहलोत, पियूष गोयल, राव इंद्रजीत सिंग

डिजीटल कर म्हणजे काय?
 • जपानच्या फुकुओका या शहरात दि. 8 जूनला जी-20 देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि केंद्रीय बँकांच्या प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत ‘डिजीटल कर’ ही संकल्पना अस्तीत्वात आणण्यासाठी उपस्थित देशांनी प्रस्तावाला मान्यता दिली.
 • या प्रस्तावानुसार, गूगल आणि फेसबुक यासारख्या इंटरनेटच्या (महाजाल) क्षेत्रात काम करणार्‍या प्रमुख कंपन्यांवर कर लादण्यासाठी एक जागतिक व्यवस्था तयार करण्याच्या दृष्टीने उपस्थित देशांनी मान्यता देण्यात आली.
 • आयर्लंडसारख्या ठिकाणी करासंबंधी नियम कमकुवत असल्याने काही मोठ्या कंपन्या त्याचा फायदा उचलून प्रचंड नफा कमावताना दिसून येत आहे. त्यामुळे जी-20 समूहाने आर्थिक सहकार्य व विकास संघटना (OECD) याकडे एक कर व्यवस्था तयार करण्याची जबाबदारी दिली आहे.

SEBIने इन्साइडर ट्रेडिंगसंबंधी घट करण्यासाठी माहितीकोष यंत्रणेचा प्रस्ताव मांडला
 • भारतीय रोखे व विनिमय मंडळाने (SEBI) इन्साइडर ट्रेडिंगशी संबंधित प्रकरणांमध्ये आरोपींपर्यंत पोहचण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अश्या प्रकरणांमध्ये घट करण्यासाठी माहितीकोष यंत्रणेचा (informant mechanism) प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
 • संशयास्पद लोकांच्या फेसबुक खात्यांवर लक्ष ठेवले जात आहे आणि त्यासोबत जुडलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. शिवाय माहिती देणार्‍याला 1 कोटी रुपयांपर्यंत बक्षीस दिले जाणार.
 • प्रस्तावित धोरण ‘SEBI (इनसाइडर ट्रेडिंग प्रतिबंधक) अधिनियम-2015’ यामध्ये सुधारणा करून लागू केले जाईल.

इन्साइडर ट्रेडिंग म्हणजे काय?

इन्साइडर ट्रेडिंग म्हणजे कंपनीशी संबंधित अश्या मुद्द्यांची व सूचनांची ओळख पटवणे, ज्यांचा प्रभाव सरळ बाजारावर पडतो, चुकीच्या पद्धतीने फायदा उठवला जातो. अश्या सूचनांना कोणा दुसर्‍याला विकणे किंवा त्याच्या आधारावर बाजारामध्ये चुकीच्या पद्धतीने व्यापार करून एखाद्याला फायदा पोहचवणे हा यामागे उद्देश असतो.