चालू घडामोडी : Daily Current Affiars 11 June 2019

युवराज सिंगचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम
 • भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यानं हा निर्णय जाहीर केला. तसंच, निवृत्तीमागची भूमिकाही स्पष्ट केली.
 • बऱ्याच काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेल्या युवराजला नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेतही फारशी चमक दाखवता आली नव्हती. 
 • त्यामुळं निवृत्तीचा विचार त्याच्या मनात घोळत होता. पहिली टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि २०११ मधील वन डे विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या युवराजचा सध्या सुरू असलेल्या विश्वचषकासाठी विचारही झाला नाही. 
 • बदलत्या परिस्थितीचा विचार करून त्यानं अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला.

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले!
 • आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पर्यटनासाठी उपलब्ध करण्याचा निर्णय 'नासा'कडून घेण्यात आला आहे.
 • २०२० पासून असे पर्यटन केंद्र सुरू करण्यात येणार असून, या अवकाश स्थानकांवर एक रात्र घालवण्यासाठी तब्बल ३५ हजार डॉलर इतका खर्च येईल, अशी माहिती नासाचे प्रमुख वित्त अधिकारी जेफ ड्विट यांनी शुक्रवारी दिली.
 • संशोधनाशिवाय आता पर्यटन आणि अन्य व्यावसायिक उपक्रमांसाठीही आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानके खुली होतील.
 • २०२० नंतर वर्षातून कमीत कमी दोन वेळा अवकाश स्थानकावर पर्यटकांना घेऊन जाण्याची आणि ३० दिवस एका अवकाश स्थानकावर राहण्याची सोय केली जाईल. एकावेळी १२ पर्यटकांना अवकाश स्थानकावर जाता येईल, असे नासाचे उपसंचालक रॉबिन गाटेन्स यांनी सांगितले.
 •  नासाकडून 'एलन मस्क'ची 'स्पेस एक्स' आणि 'बोइंग' या दोनच कंपन्या सध्या अंतराळ पर्यटनावर काम करत आहेत. यासाठी एक विशेष वाहनही तयार करण्याची योजना आहे. 
 • या वाहनासाठी 'स्पेस एक्स'चे 'क्रू ड्रॅगन कॅप्सूल' आणि 'बोइंग'चे 'स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट' या दोन अंतराळयानांचा वापर केला जाणार आहे. 
 • या दोन कंपन्या एक स्पर्धा आयोजित करून पर्यटकांची निवड करणार असून, अवकाश स्थानकांवर जाऊन परत येण्यासाठी ५.८ कोटी डॉलर इतका खर्च अपेक्षित आहे.

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आणखी १०० स्पाइस बॉम्ब
 • भारताने इस्रायलशी ३०० कोटी रुपये किंमतीच्या स्पाइस बॉम्ब खरेदीचा करार केला आहे. भारतीय हवाई दल इस्रायलकडून १०० SPICE बॉम्बची खरेदी करणार आहे. हे बॉम्ब भारताने बालाकोट येथे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात वापरले होते.
 • स्पाइस बॉम्ब आपल्या भेदक क्षमतेसाठी विशेष ओळखले जातात. पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलानं पाकिस्तानातील बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या छुप्या तळांवर हवाई हल्ले केले होते. 
 • त्या हल्ल्यांसाठी हेच स्पाइस बॉम्ब वापरण्यात आले. हा बॉम्ब एका विशिष्ट जीपीएस गायडन्स किटसोबत लावला जातो. यामुळे बॉम्ब नेमकं लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरतात.
 • या करारानुसार, येत्या तीन महिन्यात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात हे अद्ययावत स्पाइस बॉम्ब दाखल होणार आहेत.

भारताकडून सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ मिसाइल ब्रह्मोसचं यशस्वी परीक्षण
 • ओडिशाच्या चांदीपूरमध्ये चाचणी श्रेणी(आयटीआर)त मंगळवारी सुपरसोनिक क्रूझ मिसाइल ब्रह्मोसचं परीक्षण करण्यात आलं.
 • संरक्षण संशोधन व विकास संस्थे(डीआरडीओ)च्या सूत्रांच्या माहितीनुसार, या मिसाइलचं परीक्षण आईटीआरमध्ये करण्यात आलं आहे.
 • ही जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ मिसाइल आहे. जिची मारक क्षमता जबरदस्त आहे.
 • ब्रह्मोस मिसाइलचा जमीन, समुद्र आणि हवेतून मारा करू शकतो. या मिसाइलची मारक क्षमता 290 किलोमीटरच्या जवळपास आहे.
 • भारताच्या कूटनीतीसाठी शस्त्रास्त्रं आहे. चीन आणि पाकिस्तानकडून मिळणाऱ्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर ही मिसाइल निर्णायक ठरत आहे.
 • 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्र येत्या 7 ते 10 वर्षांत आवाजापेक्षा सातपट अधिक अर्थात 'मॅक 7' इतक्या वेगाने मारा करू शकणार आहे.

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा
पुरुष एकेरी विजेतेपद - राफेल नदाल(स्पेन)
 • (12 व्या वेळेस फ्रेंच ओपन विजेतेपद)
 • (एकूण 18 ग्रँडस्लॅम विजयी)
 • (2 विम्बल्डन , 3 वेळा अमेरिकन ओपन , 1 वेळेस ऑस्ट्रेलियन ओपन)
 • फ्रेंच ओपन स्पर्धेत आजपर्यंत 93 पैकी फक्त 2 सामने पराभूत
 • उपविजेता - डॉमनिक थिएम (ऑस्ट्रिया)

ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन
 • जन्म 19 मे 1938 रोजी माथेरान येथील एका कोकणी कुटुंबात झाला.
 • नाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक
 • वय - 81 वर्ष
 • जागतिक स्तरावरील साहित्य आणि कला यामधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना १९९९ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
 • पद्मश्री पुरस्कार ,  पद्मभूषण पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
 • ‘कानुरू हेगाडीथी’ (१९९९) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तर ‘इक्बाल’ (२००५) आणि ‘लाइफ गोज ऑन’ (२००९), एक था टायगर , टायगर जिंदा है अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.
 • त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून त्यापैकी तीन पुरस्कार कन्नड चित्रपट वंश वृक्ष (१९७२), काडू (१९७४), ओन्दानुंडू कालाडल्ली (१९७८) या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी आणि ‘गोधुली’ (१९८०) या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी मिळाला आहे.
 • या शिवाय उंबरठा या मराठी चित्रपटामध्येही त्यांनी काम केले होते.

Post a Comment

0 Comments