चालू घडामोडी : Daily Current Affiars 10 June 2019

‘IndSpaceEx’: जुलैमध्ये होणारा भारताचा प्रथम आभासी अंतराळ युद्धाभ्यास
 • अंतराळात संरक्षणासंबंधी क्षेत्रात प्रगती करण्याच्या उद्देशाने, भारत आता येत्या जुलै महिन्यात पहिला-वहिला ‘आभासी अंतराळ युद्धाभ्यास’ (simulated space warfare exercise) आयोजित करण्याची योजना आखत आहे. 
 • या क्षेत्रात भारताच्या क्षमतांचे मूल्यांकन करणे हा या अभ्यासाचा मुख्य उद्देश आहे.
 • 'इंडस्पेसएक्स (IndSpaceEx)' या नावाने हा सराव आयोजित केला जाणार आहे. ही एकप्रकाराची स्पर्धा आहे जी सिम्युलेटरचा वापर करून कंप्युटरद्वारे खेळली जाणार.
 • त्यात लष्करी आणि वैज्ञानिक समुदायातले सर्व भागधारक सहभागी होणार आहेत. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संरक्षण मंत्रालयाच्या इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ याच्या अधीन हा कार्यक्रम चालवला जाणार.

न्या. धीरूभाई नारनभाई पटेल : दिल्ली उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश
दिल्ली उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश दि. 8 जून रोजी न्यायमूर्ती धीरूभाई नारनभाई पटेल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. नायब राज्यपाल अनिल बैजल राज यांनी त्यांना पदाची शपथ दिली.या नियुक्तीपूर्वी, न्यायमूर्ती पटेल झारखंड उच्च न्यायालयात याच पदावर होते.

भारतीय उच्च न्यायालय :
 • भारताच्या राज्यघटनेत नमूद कलम क्र. 214 अन्वये प्रत्येक घटकराज्याला एक उच्च न्यायालय असेल किंवा एक किंवा दोन राज्यांसाठी मिळून एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे.
 • सध्या देशात 25 उच्च न्यायालये (नव्या आंध्रप्रदेश उच्च न्यायालयामुळे) कार्यरत आहेत. याशिवाय प्रत्येक राज्यामध्ये विभागीय पातळीवर खंडपीठे निर्माण करण्यात आली आहेत.
 • उच्च न्यायालयात एक मुख्य न्याय‍धीश आणि राष्ट्रपतीच्या आदेशानुसार ठरविण्यात आलेल्या संख्येनुसार इतर न्याय‍धीश असतात. उच्च न्यायालयातल्या सर्वोच्च न्यायाधिशांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे.
 • महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई येथे असून त्याची महाराष्ट्रात पणजी (गोवा), नागपूर, औरंगाबाद अश्या तीन ठिकाणी तीन खंडपीठे आहेत.

BCCIच्या AGMसाठी निवडणूक अधिकारीम्हणून गोपालस्वामी यांची नियुक्ती
 • माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांची दि. 22 ऑक्टोबर 2019 रोजी होणार्‍या भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (AGM) तसेच इंडियन क्रिकेटर्स असोसिएशन (ICA) यांच्या निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 • BCCI बद्दल भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) याची तामिळनाडू सोसायटी नोंदणी कायद्याच्या अंतर्गत 1928 साली एक संस्था म्हणून स्थापना झाली. 
 • त्याचे मुख्यालय महाराष्ट्र राज्याच्या मुंबई या शहरात आहे. ही भारतातल्या क्रिकेटसाठी असलेली राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे. हा राज्य क्रिकेट संघांचा एक महासंघ आहे.

भारतीय लेखिका अ‍ॅनी झैदी: 2019 सालाच्या ‘नाइन डॉट्स’ पारितोषिकाची विजेती
 • भारतीय लेखिका अ‍ॅनी झैदी यांचे नाव 2019 या सालाच्या ‘नाइन डॉट्स’ पारितोषिकाची विजेती म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
 • मुंबईच्या झैदी या एक स्वतंत्र लेखिका आहेत. त्यांना त्यांच्या 'ब्रेड, सिमेंट, कॅक्टस' या लेखनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. भारतातल्या समस्यांचे दर्शन घडविणारे हे लेखन आहे.
 • पुरस्काराविषयी ‘नाइन डॉट्स’ पारितोषिकाद्वारे समकालीन सामाजिक समस्यांच्या संदर्भात मूळ विचारांना पुरस्कृत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 
 • हा पुरस्कार ‘कदास प्राइज फाउंडेशन (लंडन) या संस्थेतर्फे प्रायोजित आहे. पुरस्कार स्वरुपात 1 लक्ष अमेरिकन डॉलर एवढी रक्कम विजेत्याला दिली जाते.

मालदीवचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन पंतप्रधान मोदी यांचा सन्मान
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 8 जून 2019 रोजी मालदीव देशाला भेट दिली. शेजारील राष्ट्रांशी संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने हा परदेश दौरा होता.
 • त्याप्रसंगी, मालदिवचे पंतप्रधान इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी नरेंद्र मोदी यांना 'द मोस्ट ऑनरेबल ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्वीश रुल ऑफ निशान इज्जुदीन' या मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले.
 • मालदिवचे राष्ट्रपती अब्दुल्ला सालिह यांनी ही घोषणा केली. परेदेशातील मान्यवरांना हा पुरस्कार दिला जातो.
 • मालदीव हा हिंद महासागरातला एक उष्णकटिबंधीय बेटराष्ट्र आहे. हा देश 1000 पेक्षा जास्त कोरल बेटांपासून बनलेला आहे. माले हे देशाचे राजधानी शहर असून मालदीवी रुफिया हे राष्ट्रीय चलन आहे.

नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) :- आठवा राष्ट्रीय पक्ष
 • नुकत्याच झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीतील प्रदर्शन पाहून नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) हिला देशातील आठवा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळाला आहे. असा दर्जा मिळवणारा तो उत्तरपूर्व भारतातील पहिला पक्ष आहे. पक्षाची स्थापना ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष कै.पी ए संगमा यांनी केली होती.
 • यापूर्वी या पक्षाला नागालँड, मेघालय आणि मणिपूर या राज्यांत राज्य पक्ष म्हणून दर्जा प्राप्त होता आणि पक्षाचे अध्यक्ष काँराड संगमा हे मेघालयचे मुख्यमंत्री आहेत. आता अरुणाचल प्रदेश राज्यात विधानसभा निवडणुकीत चांगले प्रदर्शन करून तिथेही पक्षाने राज्य पक्ष म्हणून दर्जा मिळवला. किमान चार राज्यांत राज्य पक्ष झाल्याने NPP राष्ट्रीय पक्ष ठरला आहे.
 • यापूर्वी हा दर्जा असणारे सात राष्ट्रीय पक्ष - काँग्रेस, भाजप, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस.

Post a Comment

0 Comments