PSI STI Combine परीक्षेचा पेपर सोडतेवेळी या गोष्टी लक्षात राहाव्यातच! सविस्तर वाचा…

मित्रांनो पीएसआय एसटीआय कंबाईन परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. परिक्षार्थी परिक्षा देते वेळेस जे चुका करतात व 1 किंवा 2 गुणांनी त्यांच संपूर्ण नुकसान होते अशाच काहि बाबींची पुर्तता या लेखात केली आहे.

 

psi sti combine exams Pree tayari on mpsckida

 

✍ उत्तरपत्रिकेवरील सर्व माहिती योग्य ठिकाणी पूर्ण भरणे गरजेचे असते ए बी सी डी यापैकी कोणताही एक प्रश्नपत्रिका संच आपल्याकडे आलेला असेल तो योग्य पद्धतीने नमूद करून सोडवण्यासाठी घेणे त्यामध्ये कोणताही एक विषय आपल्यापुढे येऊ शकतो यामध्ये फक्त बुद्धिमत्ता व गणित सर्वात शेवटी सोडवायचे आहे.
✍ समजा इतिहास विषयाने आपली सुरुवात झाली तर यामध्ये सोपे मध्यम अवघड असे प्रश्न असतील हे प्रश्न 15 असतील तर यासाठी फक्त तीन ते चार मिनिट इतका वेळ तुम्ही द्यावा कारण हे प्रश्न जर अभ्यासा मधील असतील तर कमी वेळात सोडवता येतात तसेच अनोळखी असतील तरी ते तुम्ही सोडून द्यावेत या विषयांमध्ये लवकरात लवकर निर्णय घेणे अत्यावश्यक आहे.
✍  भूगोल विषयाची पंधरा प्रश्न सोडवताना काही प्रश्न असतील जे तुमच्यासाठी अनोळखी असतील जे प्रश्न नदी प्रणाली प्राकृतिक भूगोल खनीज संपत्ती वने या प्रकरणावर असतील ते तात्काळ तुम्ही सोडवावेत यासाठी चार ते पाच मिनिट इतका वेळ तुम्ही जास्तीत जास्त घेऊ शकता.
राज्यघटना या विषयांमध्ये जर योग्य प्रकारे तुमचा अभ्यास झालेला असेल तर अवघ्या दोन ते तीन मिनिटांमध्ये हे प्रश्न तुम्हाला सुटतील.
विज्ञान या विषयावरील प्रश्न सोडवताना आत्मविश्वास कमी असल्यामुळे खूप लोक लवकर निर्णय घेत नाहीत परंतु बरेच विद्यार्थी यातील प्रश्नांची उत्तरे येत नसतील तर तात्काळ हे प्रश्न सोडून देतात व प्रश्नपत्रिकेमध्ये पुढे निघून जातात.
अर्थशास्त्र या विषयामधील पारंपरिक प्रश्न आल्यानंतर तात्काळ उत्तरे देता येतात अनोळखी प्रश्न आल्यानंतर खूप मुले यासाठी विनाकारण वेळ वाया घालवतात.
चालू घडामोडी हा विषय प्रश्न वाचन करतेवेळीच लक्षात येतो की आपणास हा प्रश्न येऊ शकतो किंवा नाही जर वाचलेला प्रश्न असेल व त्याबद्दल दोन पर्यायांमध्ये कन्फ्युजन असेल तर असे प्रश्न नियमितपणे मुले सोडवतात.
बुद्धिमत्ता व गणित हे जर नियमितपणे सराव करणाऱ्या प्रश्नपत्रिका प्रमाणेच परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले असतील तर कमीत कमी वेळामध्ये हे प्रश्न सोडवता येतात परंतु वेळखाऊ प्रश्न व अनोळखी प्रश्न असेल तर यासाठी अतिरिक्त वेळ देणे परीक्षेमध्ये धोकादायक असते.
✍ सर्वात शेवटी आपल्याकडे पाच किंवा सात मिनिट शिल्लक असतील तर दोन पर्यायांमध्ये कन्फ्युजन असणारे प्रश्न आपण चांगल्या प्रकारे सोडवून प्रश्नपत्रिकेमध्ये अधिक गुण मिळवू शकतो तसेच एकूण प्रश्नपत्रिकेमध्ये आपण किती प्रश्न सोडवले आहेत याचा अंदाज घेता येतो.
✍  जर 85 ते 95 यादरम्यान प्रश्न सोडवलेले असतील तर यापेक्षा अधिक रिस्क घ्यायची आवश्यकता नाही तसेच फक्त 50 व 60 प्रश्न सोडवले असतील तरी निकाल जाण्याची शक्यता असते यामुळे आपल्याकडे जास्तीत जास्त वेगाने प्रश्नपत्रिका सोडवून अंतिम पाच ते सात मिनिट शिल्लक राहणे फायदेशीर राहते तसेच यादरम्यान योग्य प्रश्नांची उत्तरपत्रिकेमध्ये योग्य उत्तरे देणे अनुक्रमणिका न चुकणे हे अत्यंत महत्त्वाचे असते निकाल येणारे विद्यार्थी फक्त योग्य प्रकारे नियोजन करतात म्हणून काही विद्यार्थ्यांचे कमी अभ्यासावर निकाल येतात पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे अभ्यास चांगला असूनही परीक्षे मधील योग्य नियोजन नसल्यामुळे निकाल जातात.
परिक्षार्थी मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला ते खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व आमच्या फेसबूक पेज ला Like (Click) करा.