(चालू घडामोडी) Daily Current Affiars 7 May 2019


राजा महा वजीरालोंगकोर्न: थायलँडचे नवीन राजा
 • थायलँडचे राजा म्हणून महा वजीरालोंगकोर्न यांनी दिनांक 5 मे 2019 रोजी एका शाही समारंभात अधिकृतपणे मुकुट धारण करून देशाने सूत्र आपल्या हातात घेतले. ते चक्री राजवंशातले दहावे राजा ठरले आहे.
 • 2016 साली राजा भूमिबोल अद्युल्यदेज यांच्या निधनानंतर 66 वर्षीय महा वजीरालोंगकोर्न यांना राजपद बहाल करण्यात आले होते.
 • थायलँड हा एक आग्नेय आशियाई देश आहे. या देशाची राजधानी बँकॉक हे शहर आहे आणि थायी बाहत हे राष्ट्रीय चलन आहे. थायलँडचा राजा ‘रामा X’ या नावाने ओळखला जातो.


ADB Bank ची नवी ‘स्वस्थ महासागर कृती योजना’
 • आशियाई विकास बँकेनी (ADB) फिजी येथे झालेल्या त्याच्या गव्हर्नरांच्या 52 व्या वार्षिक बैठकीत आशिया व प्रशांत क्षेत्रासाठी स्वस्थ महासागर (Healthy Oceans) आणि शाश्वत नील अर्थव्यवस्थांच्या (Sustainable Blue Economies) संदर्भात एक कृती योजना राबवविण्यास सुरुवात केली आहे.
 • 2030 सालासाठी ठरविण्यात आलेल्या शाश्वत विकास ध्येयाचे 14 वे (पाण्याखालील जीवन) ध्येय साध्य करण्याच्या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे, ज्याला ADBच्या सदस्यांचे समर्थन आहे. योजनेच्या अंतर्गत चालणार्या प्रकल्पांना सन 2019 ते सन 2024 या काळात 5 अब्ज डॉलर (सुमारे 346 अब्ज रुपये) एवढा वित्तपुरवठा केला जाणार आहे.
 • या योजनेचा एक भाग म्हणून ADB ओशन फायनान्सिंग इनिश्यीएटिव्ह हा उपक्रम राबवविणार आहे, ज्यामध्ये खासगी क्षेत्राना गुंतवणूक करण्यासाठी संधी दिली जाईल ज्यामुळे महासागरांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. हा उपक्रम ASEAN इन्फ्रास्ट्रक्चर फंड आणि दक्षिण कोरिया प्रजासत्ताक यांच्या सहकार्याने आग्नेय आशियामध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवविला जाईल.
 • आशिया आणि प्रशांत या क्षेत्रात सागरे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेले आहे, त्यामुळे सागरी जीवन आणि प्रत्यक्षपणे या क्षेत्रातल्या नील अर्थव्यवस्थेची उत्पादनक्षमता धोक्यात आली आहे. 88-95% प्लास्टिक जगभरात समुद्रात वाहून नेणार्या 10 नद्यांपैकी 8 या क्षेत्रामध्ये आहेत. 
 • ही एक क्षेत्रीय विकास बँक आहे, ज्याची स्थापना दि. 19 डिसेंबर 1966 रोजी आशियाई देशांमधील आर्थिक विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी केली गेली. मंडालुयोंग (मनिला, फिलीपिन्स) येथे त्याचे मुख्यालय आहे. “फाइटींग पॉव्हर्टी इन एशिया अँड द पॅसिफिक” हे ADBचे घोषवाक्य आहे. याचे 67 देश सदस्य आहेत.


ड्रगान मिहीलोव्हीच (सर्बिया): भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक
 • सर्बियाचे ड्रगान मिहीलोव्हीच यांना भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून भारतीय व्हॉलीबॉल महासंघ (VFI) कडून नियुक्त करण्यात आले आहे.
 • त्यांना पाच महिन्यांकरिता नियुक्त करण्यात आले आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये इराणमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धांसाठी भारतीय संघाला तयार करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.


स्पेस-एक्स कंपनीने NASAसाठी मालवाहू अंतराळ मोहीम पाठवली
 • स्पेस-एक्स या अंतराळ विज्ञान क्षेत्रातल्या खासगी कंपनीने दिनांक 4 मे 2019 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) याकडे NASAची 17 वी व्यवसायिक मालवाहू अंतराळ मोहीम यशस्वीरित्या पाठवली.
 • स्पेस-एक्स कंपनीच्या फाल्कन-9 या शक्तिशाली अग्निबाणाने रोबोटीक ‘ड्रॅगन’ कार्गो कॅप्सूल, ‘ऑर्बिटिंग कार्बन अब्जर्व्हेटरी-3’ या प्रयोगांसह एकूण 2,495 किलोग्राम वजनी आवश्यक पुरवठा करण्यात आला आहे.
 • आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) हे पृथ्वीच्या खालच्या अंतराळ कक्षेत 400 किलोमीटर दूर आकाशात तरंगणारे एक अंतराळ स्थानक आहे. या कृत्रिम उपग्रहावर मानवाचा अधिवास शक्य झाला आहे. 1998 साली या बहू-राष्ट्रीय प्रकल्पाचा पहिला भाग अंतराळात पाठवण्यात आला. ISS वर सध्या अमेरिका, रशिया, कॅनडा आणि जपान या देशांचे अंतराळवीर कार्यरत आहेत.


ISROचे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान
 • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) याचे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे. 
 • फ्रान्समधील ‘शेवेलियर डी लॉर्ड नॅशनल डी ला लिगियन दी ऑनर’ हा पुरस्कार किरण कुमार यांना प्रदान करण्यात आला.


निलीना एम. एस. यांनी ‘ACJ अन्वेषण पत्रकारिता पुरस्कार’ जिंकला
 • गेल्या वर्षी मार्च महिन्यात ‘कारवा’ पत्रिकेत प्रकाशित केल्या गेलेल्या निलीना एम. एस. यांच्या ‘कोलगेट 2.0’ हे शीर्षक असलेल्या लेखाला 2018 सालाचा  ‘ACJ अन्वेषण पत्रकारिता पुरस्कार’ दिला गेला आहे. 
 • देशात झालेल्या कोळसा घोटाळ्याबाबत हा लेख होता. एशियन कॉलेज ऑफ जर्नलिजम्स (ACJ) या संस्थेकडून हा पुरस्कार दिला जातो. 
प्रिय वाचकांनाे तुम्हाला या चालू घडामोडी कशा वाटल्या खाली Comment Box मध्ये Comment करा. किंवा यात काही बदल करावे असे वाटत असल्यास तुमचा अभिप्राय कळवा.. धन्यवाद !!

Post a Comment

0 Comments