(चालू घडामोडी) Daily Current Affiars 6 May 2019


“आदित्य-L1”: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ISRO ची अंतराळ मोहीम
 • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) सूर्याचा अधिक अभ्यास करण्यासाठी “आदित्य-L1” नावाची एक अंतराळ मोहीम पाठविण्याची योजना तयार केली आहे. 
 • सूर्याच्या बाह्य वातावरणाचे (कोरोना) निरीक्षण करण्यासाठी 2020 सालापर्यंत ही मोहीम पाठविली जाईल.
 • ‘आदित्य-L1’ मोहीम हे नाव देण्यात आले आहे आणि आता याला L1 (लॅगरेंज बिंदू-1) याच्या आस-पास कोरोना कक्षेत पाठवले जाणार आहे.
 • पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किलोमीटर दूर आहे. कोरोना क्षेत्रात जे सूर्याच्या पृष्ठभागापासून अगदी जवळचे क्षेत्र असते.


न्यायनिश्चिती च्या चौकशीसाठी: न्या. ए. के. पटनायक यांची नियुक्ती
 • सर्वोच्च न्यायालयात हवा तसा न्याय मिळवून देणारे ‘फिक्सर्स’ आहेत काय आणि असे ‘फिक्सिंग’ चालते काय, याचा छडा लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने न्या. ए. के. पटनायक यांच्या नेतृत्वाखाली एकसदस्यीय चौकशी समिती नेमली.
 • न्यायदानातील ‘फिक्सिंग’चे प्रकार गोगोई यांनी मोडून काढल्यामुळेच लैंगिक आरोपाचा कट रचला गेल्याचा दावा वकील उत्सव सिंग बैंस यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हे प्रकरण तडीस नेण्याचे ठरविले आहे.
 • या खंडपीठात न्या. अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील न्या. रोहिंग्टन नरिमन आणि न्या. दीपक गुप्ता यांचा समावेश आहे.
 • सरन्यायाधीशांवर सर्वोच्च न्यायालयातील एका महिला कर्मचाऱ्याने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची मात्र ही समिती चौकशी करणार नाही.


भारताचे चांद्रयान ६ सप्टेंबरला चंद्रावर उतरणार
 • भारताच्या महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान-२' या दुसऱ्या चांद्रमोहिमेचे प्रक्षेपण ९ जुलै ते १६ जुलै दरम्यान करण्यात येणार असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी जाहीर केले. 
 • या मोहिमेसंदर्भातील सर्व यंत्रणा या काळात सज्ज होतील आणि प्रक्षेपणानंतर ६ सप्टेंबर रोजी चांद्रयान- २ चंद्रावर दाखल होईल असे इस्रोने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
 • चांद्रयान-२ मध्ये ३ मॉड्यूल ऑर्बिटर, लँडर (विक्रम) आणि रोव्हर ( प्रज्ञान) यांचा अंतर्भाव असणार आहे.
  जीएसएलव्ही मार्क-३ द्वारे चांद्रयान-२ ऑर्बिटर आणि लँडर पृथ्वीच्या कक्षेच स्थिरावतील. या नंतर ऑर्बिटर आणि लँडर चंद्राच्या कक्षेत सोडण्यात येतील.
 • चांद्रयान-२ चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर लँडर चंद्राच्या जमिनीवर उतरेल. या नंतर रोव्हर बाहेर येत प्रयोग करण्यास सिद्ध होईल. भारताचे चांद्रयान ६ सप्टेंबर या दिवशी चंद्रावर उतरेल असे इस्रोने म्हटले आहे.


इस्रो’च्या माजी प्रमुखांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान
 • भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात झाला आहे. फ्रान्समधील ‘शेवेलियर डी लॉर्ड नॅशनल डी ला लिगियन दी ऑनर’ हा पुरस्कार किरण कुमार यांना प्रदान करण्यात आला.
 • भारत आणि फ्रान्समधील अवकाशसंशोधनाच्या कार्यामध्ये प्रमुख भूमिका पार पाडल्याबद्दल किरण कुमार यांचा सन्मान करण्यात आला.
 • २०१५ ते २०१८ दरम्यान इस्रोचे अध्यक्षपद भूषवताना ए. एस. किरण कुमार यांनी भारत आणि फ्रान्समधील अवकाश संशोधनाला चालना दिली.
 • ‘शेवेलियर डी लॉर्ड नॅशनल डी ला लिगियन दी ऑनर’ हा पुरस्कार देण्याची सुरुवात १८०२ मध्ये नेपोलियन बोनापार्टने केली होती.
 • हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून फ्रान्सच्या प्रगतीमध्ये हातभार लावणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. भारतामधील ‘भारतरत्न’ पुरस्काराप्रमाणेच हा पुरस्कार इतर देशांच्या व्यक्तींनाही त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानासाठी प्रदान केला जातो.


आज पाचव्या टप्प्यातील प्रचार थंडावला; 6 मे ला मतदान
 • लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या, या टप्प्यात 7 राज्यातील 51 मतदारसंघांमध्ये मतदान होणार.
 • या टप्प्यात एकूण उमेदवारांपैकी केवळ 12 टक्के महिला उमेदवार असून 8 कोटी 75 लाख 88 हजार मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार.
 • आचारसंहितेनुसार, मतदानाच्या 48 तास आधी निवडणूक प्रचार संपत असल्याने आज 4 मे रोजी प्रचाराची सांगता झाली.
 • देशात कुठे मतदान? : उत्तर प्रदेश : 14 I राजस्थान : 12 I मध्य प्रदेश : 7 I पश्चिम बंगाल : 7 I बिहार : 5 I झारखंड : 4 I जम्मू-काश्मीर : 2
 • 2014 ची परिस्थिती काय? : 51 मतदार संघांपैकी 39 मतदार संघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत तर तृणमूल काँग्रेसकडे 7 मतदार संघ आहेत.
 • 2 मतदार संघांमध्ये काँग्रेसचे खासदार आहेत तर लोकजनशक्ती पार्टी, राष्ट्रीय लोकसमता पार्टी आणि पीपल्स डेमोक्रेटीक पार्टीकडे प्रत्येकी एक मतदार संघ आहे.

Post a Comment

0 Comments