(चालू घडामोडी) Daily Current Affiars 5 May 2019


घाना देशाने जगातली सर्वात मोठी वैद्यकीय ड्रोन वितरण सेवा सुरू केली
 • घाना या आफ्रिकेच्या देशाने जगातली सर्वात मोठी वैद्यकीय ड्रोन वितरण सेवा सुरू केली आहे. या सेवेची प्रात्यक्षिक चाचणी घेतली जात आहे आणि त्यातून रक्त आणि लसींचे वितरण केले जात आहे.
 • देशाचे राष्ट्राध्यक्ष नाना आकुफो-एड्डो यांनी ही सेवा सुरू केली. देशातल्या 500 केंद्रांच्या मार्फत प्रत्येकाच्या 80 किलोमीटर त्रिज्याच्या क्षेत्रफळात घानाच्या दुर्गम भागात वैद्यकीय सेवांचा पुरवठा केला जाणार आहे.
 • घाना हा पश्चिम अफ्रिकेच्या उपप्रदेशातला, गिनीच्या आखाती प्रदेशातला आणि अटलांटिक महासागरामधील एक देश आहे. अक्रा ही घानाची राजधानी आहे आणि सेडी हे राष्ट्रीय चलन आहे. घाना हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. 
 • घानाच्या पश्चिमेला कोट दि आईव्होर, उत्तरेला बर्किना फासो व पूर्वेला टोगो हे देश तर दक्षिणेला गिनीचे आखात आहे.
 • आक्रा ही घानाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.१५ व्या शतकात युरोपीय शोधक दाखल होण्याआधी येथे स्थानिक जमातींचे राज्य होते. 
 • १८७४ साली ब्रिटिशांनी येथे वसाहत स्थापन केली व येथील सोन्याच्या मुबलक साठ्यांमुळे ह्याचे नाव गोल्ड कोस्ट असे ठेवले. गोल्ड कोस्टला १९५७ साली स्वातंत्र्य मिळाले व घाना देशाची निर्मिती झाली.


HD 21749b - नासाच्या टेस एक्सप्लॅनेट मिशनने शोधलेला पृथ्वीच्या आकाराचा पहिला ग्रह
 • नॅशनल एरोनॉटिक्स अण्ड स्पेस अडमिनिस्ट्रेशन (नासा) यांनी नवीनतम ग्रह-शोधणाऱ्या प्रोब TESS याने पृथ्वीच्या आकाराचा पहिला ग्रह - एक्सप्लानसेट शोधला आहे.
 • प्रोब ने नव्याने शोध लावलेला हा पृथ्वीच्या आकाराच्या एक्सप्लॅनेट पृथ्वीपासून 53 प्रकाश-वर्ष दूर असलेल्या ताऱ्याच्या कक्षेत भ्रमण करत आहे.
 • ऍस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये प्रकाशित केल्या गेलेल्या अभ्यासानुसार ट्रान्झिटिंग एक्सप्लॅनेट सर्वे (TESS) ने त्याच ताऱ्याच्या बोवती भ्रमण करत असलेला एक उबदार उप-नेप्च्यून आकाराचा ग्रह देखील शोधला आहे.
 • जवळजवळ 36 दिवसात पूर्ण होणारी कक्षा असलेल्या उप-नेप्च्यून, HD 21749b चा आतापर्यंत प्रकाशित केलेल्या कोणत्याही TESS शोधांपैकी सर्वात मोठा कालावधी आहे.
 • त्याचा केंद्रस्थानी असलेला ताऱ्याचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या वस्तुमानाच्या तुलनेत सुमारे 80 टक्के आहे आणि तो पृथ्वीपासून सुमारे 53 प्रकाश-वर्ष अंतरावर आहे.


युरोपातील सर्वात मोठी युद्धनौका अरबी समुद्रात
 • युरोपातील सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका 'चार्ल्स डी गॉल' नुकतीच अरबी समुद्रात दाखल झाली.
 • गोव्याच्या समुद्रात हिंदुस्थान आणि फ्रान्सच्या नौदलाच्या संयुक्त कवायती होत आहेत. मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम नौदल कमांडने या कवायतींचे आयोजन केले आहे. त्यासाठी फ्रान्सची ही युद्धनौका बुधवारी मार्मागोवा येथे दाखल झाली.
 • हिंदुस्थान आणि फ्रान्सच्या नौदलादरम्यान 'वरुण 19.1' व 'वरुण 19.2' या कवायतींचे आयोजन केले आहे.
 • या दोन्ही कवायतींसाठी 'चार्ल्स डी गॉल' ही नौका फ्रान्समधील डी ब्रेस्ट या नाविक तळावरून 7100 कि.मी.चे अंतर पार करून अरबी समुद्रात दाखल झाली आहे.


दुबईच्या वाळवंटात साकारतेय जगातील सर्वात मोठे सौर उर्जा पार्क
 • दुबईच्या वाळवंटात युएइ पंतप्रधान मोहम्मद बिन रशीद अल माक्तून याच्या नावाने साकारले जात असलेले सौर उर्जा पार्क जगातील सर्वात मोठे पार्क बनणार असून सध्याच ते रोज नवे विक्रम नोंदवीत आहे. 
 • हे पार्क उभारणीसाठी ९५,२०० कोटी खर्च होणार आहे आणि हे पार्क पूर्णत्वाने कार्यान्वित झाले कि त्यातून १३ लाख घरांना वीज पुरविली जाणार आहे.
 • या पार्क मधून ५ हजार मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. या सौर उर्जा पार्कच्या तीन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून चौथ्या टप्प्याचे काम सुरु आहे.
 • हे पार्क २०३० सालापर्यंत पूर्ण केले जाणार आहे.
 • हे पार्क म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याच्या दिशेने टाकले गेलेले महत्वाचे पाउल असून त्यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वर्षाला ६५ लाख टनांनी कमी होणार आहे.
 • सध्याचे सर्वात मोठे सौर उर्जा पार्क चीन मध्ये असून त्यातून १५४७ मेगावॉट वीजनिर्मिती होते आहे.


चक्रीवादळाला असं नाव दिलं जातं...
 • जगभरातील समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या देशांचा समूह, तेथे निर्माण झालेल्या वादळांना नावं देत असतात.
 • या नावांची यादी जिनेव्हाला जागतिक हवामान खात्याच्या कार्यालयाला पाठवली जातात. तेथूनच वादळाला नावं ठेवली जातात. 
 • चक्रीवादळाला नाव देण्याची सुरूवात अमेरिकेने १९५३ साली पहिल्यांदा केली. १९७८ पर्यंत चक्रीवादळास फक्त स्त्रीलिंगी नाव देण्यात येत होते. मात्र महिला संघटनांनी यावर आक्षेप घेतला.
 • चक्रीवादळ हा शब्द पु्ल्लिंगी असताना, फक्त स्त्रीलिंगी नाव कशासाठी असा आक्षेप घेतल्यानंतर, १९७८ पासून पुल्लिंगी नावही दिले जाऊ लागले. भारतीय उपखंडात २००० पासून चक्रीवादळांना नावं देण्यास सुरूवात झाली.

Post a Comment

0 Comments