(चालू घडामोडी) Daily Current Affiars 4 May 2019


सौदी अरब 2020 साली G-20 शिखर परिषद आयोजित करणार
 • नोव्हेंबर 2020 मध्ये सौदी अरब 'जी-20 शिखर परिषद’ आयोजित करणार आहे. ही परिषद रियाध येथे भरविली जाणार. अरब प्रांतात प्रथमच जी-20 शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे.
 • या वर्षी जून महिन्यात जपानच्या ओसाका या शहरात जी-20 शिखर परिषदेचे आयोजन करण्याचे नियोजित आहे.
 • जी-20 समूह आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि वित्तीय ध्येयाच्या सर्वात महत्त्वाच्या पैलूंसंदर्भात आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी ‘ग्रुप ऑफ ट्वेंटी’ (किंवा जी-20) हा प्रमुख मंच आहे.
 • वित्त मंत्र्यांचा आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरांचा नवा ग्रुप ऑफ ट्वेंटी (जी-20) फोरम 25 सप्टेंबर 1999 रोजी औपचारिकपणे तयार केला गेला.
 • या समूहात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, युरोपीय संघ (EU), फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, टर्की, ब्रिटन (UK) आणि संयुक्त राज्ये अमेरिका (USA) या देशांचा समावेश आहे. हा समूह एकत्रितपणे जागतिक GDPच्या 90%, जागतिक व्यापाराच्या 80% आणि जागतिक लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकांचे प्रतिनिधित्व करतो.


कॅनरा बँक: RBIचे EMV मानदंड पूर्ण करणारी देशातली पहिली सार्वजनिक बँक
 • कॅनरा बँक ही देशातली सार्वजनिक क्षेत्रातली पहिली बँक आहे, ज्याने भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) ठरवून दिलेले EMV मानदंड पूर्ण केले. ATM जाळ्याच्या माध्यमातून सध्या केल्या जाणार्या व्यवहारांसाठी वापरल्या जाणार्या कार्डसाठी EMV चिप आणि पिन या सुरक्षा योजना योजल्या गेल्या आहेत.
 • ACI वर्ल्डवाइड या संस्थेनी अशी घोषणा केली की, कॅनरा बँकेनी देशभरातले त्याचे ATM जाळे आणि आधारचे प्रमाणीकरण तसेच ACIच्या UP रिटेल पेमेंट्स सोल्यूशनचा लाभ घेण्यासाठी EMV कार्डला समर्थन देणारी नवीन कार्यक्षमता यशस्वीरित्या अंमलात आणली आहे.
 • RBIने परंपरागत चुंबकीय पट्टी असलेल्या कार्डला बदलण्यासाठी EMV चिपचा वापर करण्यास 31 डिसेंबर 2018 ही अंतिम मुदत ठरविण्यात आली होती. गहाळ आणि चोरी झालेल्या कार्डमार्फत होणारी फसवणूक तसेच बनावट कार्डची प्रकरणे कमी करणे हा या मागचा उद्देश आहे.


NASAची प्रथम महिला अंतराळवीर जेरी कॉब यांचे निधन
 • अमेरिकेची नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अडमिनिस्ट्रेशन (NASA) या अंतराळ संस्थेची प्रथम महिला अंतराळवीर ठरलेली जेरी कॉब यांचे दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या.
 • जेरी कॉब ह्या 1961 साली अंतराळवीर बनण्यासाठी घेतली जाणारी परीक्षा उत्तीर्ण करणार्‍या प्रथम महिला होत्या. कॉब ह्यांनी अनेक दशके अमेझोनच्या जंगलामध्ये मदत पोहचविण्यासाठी विमानचालक म्हणून काम केले होते.


घाना देशाने जगातली सर्वात मोठी वैद्यकीय ड्रोन वितरण सेवा सुरू केली
 • घाना या आफ्रिकेच्या देशाने जगातली सर्वात मोठी वैद्यकीय ड्रोन वितरण सेवा सुरू केली आहे. या सेवेची प्रात्यक्षिक चाचणी घेतली जात आहे आणि त्यातून रक्त आणि लसींचे वितरण केले जात आहे.
 • देशाचे राष्ट्राध्यक्ष नाना आकुफो-एड्डो यांनी ही सेवा सुरू केली. देशातल्या 500 केंद्रांच्या मार्फत प्रत्येकाच्या 80 किलोमीटर त्रिज्याच्या क्षेत्रफळात घानाच्या दुर्गम भागात वैद्यकीय सेवांचा पुरवठा केला जाणार आहे.
 • घाना हा पश्चिम अफ्रिकेच्या उपप्रदेशातला, गिनीच्या आखाती प्रदेशातला आणि अटलांटिक महासागरामधील एक देश आहे. अक्रा ही घानाची राजधानी आहे आणि सेडी हे राष्ट्रीय चलन आहे.


जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या क्रमवारीत भारत 140 वी स्थानी
 • जगभरातल्या 180 देशांच्या ‘जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2019’ यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्रमवारीत भारत 140 व्या स्थानावर आह़े. यावेळी जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचे म्हणजेच भारताचे स्थान गेल्या निर्देशांकाच्या तुलनेत दोन स्थानाने घसरले आह़े.
 • जगभरातले पत्रकार भीतीच्या छायेखाली जगत आहेत आणि त्यांच्याबाबतीत हिंसा वाढली आहे, असे ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर’ या संस्थेनी म्हटले आह़े.


"वरुण 2019": भारत आणि फ्रान्स यांचा संयुक्त सागरी सराव
 • भारतीय नौदल आणि फ्रेंच नौदल त्यांच्यातला "वरुण 2019" नावाचा संयुक्त सागरी सराव मे महिन्यात गोव्याच्या किनारपट्टीलगत आयोजित केला जाणार आहे.
 • सरावादरम्यान अँटी-सबमरीन वॉरफेअर (ASW) प्रशिक्षणावर प्रमुख लक्ष केंद्रित केले जाईल.

Post a Comment

0 Comments