चालू घडामोडी : Daily Current Affiars 27 May 2019

“पॅसिफिक व्हॅनगार्ड”: अमेरीका, जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांचाप्रथम सागरी युद्धाभ्यास
 • अमेरीकेच्या नौदलाने जपान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया यांच्या नौदलांच्या भागीदारीसह “पॅसिफिक व्हॅनगार्ड 2019” या नावाने पहिलाच संयुक्त सागरी युद्धाभ्यास आयोजित केला आहे.
Marine maneuvers

 • पश्चिम प्रशांत प्रदेशात अमेरिकेच्या गुआम बेटाजवळ 23 मे रोजी या सरावाला सुरुवात झाली. या प्रदेशात वाढत चाललेल्या चीनी लष्करी ताकदीचा प्रतिकार करण्यास मदत करण्यासाठी आशियातल्या देशांसोबत सहयोगाची अमेरीकेची इच्छा आहे.
 • सहा दिवस चालणारा “पॅसिफिक व्हॅनगार्ड” नौदल सराव हे आशिया-प्रशांत  क्षेत्रातला संयुक्त नौदल शक्तीचे नवीन प्रदर्शन आहे.


कॅरोलीना प्लिस्कोव्हा: ‘इटालियन ओपन 2019’ स्पर्धेच्या महिला एकेरी गटाची विजेता
 • झेक प्रजासत्ताकची कॅरोलीना प्लिस्कोव्हा हिने ‘इटालियन ओपन 2019’ या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले आहे.
 • स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्लिस्कोव्हाने ब्रिटनची जोहाना कोन्ता हिचा करुन यावर्षीचा दुसरा किताब जिंकला.
 • रोम ओपन (किंवा इटालियन ओपन) ही इटलीच्या रोम शहरात खेळवली जाणारी एक वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. 
 • ही फ्रेंच ओपन स्पर्धेनंतर जगातल्या सर्वात प्रतिष्ठित रेड क्ले टेनिस स्पर्धांपैकी एक आहे. ही स्पर्धा पहिल्यांदा सन 1930 मध्ये खेळवली गेली होती


न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL): ISROची नवी व्यवसायिक शाखा
 • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) या नावाची नवी व्यवसायिक शाखा अधिकृतपणे बेंगळुरू येथे उघडली आहे.
 • भारतीय अंतराळ मोहीमांमध्ये उद्योगांची भागीदारी वाढविणे हा या उपकंपनीचा मुख्य उद्देश आहे. दि. 6 मार्च 2019 रोजी ही कंपनी कार्यरत झाली.
 • अंतराळ मोहीमांमध्ये लागणार्‍या संबंधित तंत्रज्ञानांमध्ये खासगी उद्योजकता विकसित करण्यास ही शाखा प्रोत्साहन देणार. विशेषतः, लघु उपग्रह प्रक्षेपास्त्र (SSLV) आणि ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपास्त्र (PSLV) यांच्या निर्मितीसाठी हे विभाग जबाबदार असेल.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)
 • ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे. संस्थेचे बेंगळुरू येथे मुख्यालय आहे.
 •  
 • दि. 15 ऑगस्ट 1969 रोजी ISROची स्थापना झाली, ज्याने 1962 सालच्या ‘इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च’ (INCOSPAR) याला बरखास्त करीत त्याची जागा घेतली. 
 • ही संस्था भारत सरकारच्या विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते.


CSO, MOSPI विलीन करून राष्ट्रीयसांख्यिकी कार्यालय (NSO) तयार केले जाणार
 • सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय सांख्यिकी कार्यालय (CSO) आणि राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (NSSO) यांना विलीन करून एक संस्था तयार करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.
 • विलीन झालेल्या नवीन संस्थेचे नाव राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) असे नाव देण्यात येणार आहे आणि मंत्रालयाचे सचिव नव्या कार्यालयाचे प्रमुख राहतील.


परदेशी गुंतवणूकदारांद्वारे VRRगुंतवणूकीच्या संदर्भात नियम RBI कडून जाहीर
 • भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) वॉल्युंटरी रिटेंशन रूट (VRR) संदर्भात परदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांसाठी (FPIs) नव्या नियमांना अधिसूचित केले आहेत.
 • VRR योजना दि. 1 मार्च 2019 पासून लागू करण्यात आली आणि सुधारित VRR योजना दि. 27 मे 2019 पासून लागू असेल.
 • नव्या नियमांनुसार, RBIने VRR याच्या अंतर्गत FPI गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक मर्यादा 54,606.55 कोटी रुपये एवढी निश्चित केली आहे. या निर्णयामुळे कॉर्पोरेट कर्ज तसेच सरकारी रोख्यांमध्ये निधी गुंतविण्यासाठी परवानगी मिळते.
 • रिटेंशन कालावधी कमीतकमी तीन वर्षांचा असेल. या काळात FPI गुंतवणूकदाराने भारतात गुंतवणुकीसाठी परवानगी दिलेल्या रकमेच्या किमान 75% भाग राखून ठेवणे गरजेचे आहे.


स्क्वेअर किलोमीटर अ‍ॅरे (SKA): जगातलीसर्वात शक्तिशाली रेडिओ दूर्बिण
 • कॉम्प्लेक्स स्क्वेअर किलोमीटर अ‍ॅरे (SKA) या नावाची पृथ्वीवरची सर्वात मोठी आणि सर्वात शक्तिशाली रेडिओ दूर्बिण (telescope) तयार केली जात आहे. त्यासाठी लागणार्‍या 'मेंदू' म्हणजेच केंद्रीय यंत्रणा तयार करण्याचे काम केंब्रिजमधील शास्त्रज्ञांनी नुकतेच पूर्ण केले आहे.
 • सायन्स डेटा प्रोसेसर (SDP) या मुख्य इलेक्ट्रॉनिक चिपच्या अभियांत्रिकी रचनेचे कार्य पूर्ण केले आहे.
 • ही दुर्बिण कार्यरत झाल्यानंतर इतर कोणत्याही दुर्बिणीच्या 50 पट संवेदनशीलतेच्या तुलनेत 10,000 पट अधिक वेगाने तारांगणाची माहिती घेतली जाऊ शकणार .

Post a Comment

0 Comments