चालू घडामोडी : Daily Current Affiars 22 May 2019

गोल्फपटू टायगर वूड्स यांना अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान दिला गेला

 • अमेरिकेचे गोल्फपटू टायगर वूड्स यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते ‘प्रेसिडेंशीएल मेडल ऑफ फ्रीडम’ हा अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देवून सन्मानित करण्यात आले आहे.
 • टायगर वूड्स हे क्रिडा जगतातल्या अमेरिकेच्या महान खेळाडूंपैकी एक असल्याचे वर्णन केले जाते. 43 वर्षीय वूड्स हा चौथा आणि सर्वात तरुण गोल्फपटू आहे, ज्याला अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला.
 • वयाच्या 20 व्या वर्षी वूड्स यांचे व्यवसायिक खेळाडू म्हणून 1996 साली पदार्पण झाले आणि त्यांनी 15 प्रमुख स्पर्धांमध्ये विजय मिळवलेला आहे.


न्या. पी. आर. रामचंद्र मेनन: छत्तीसगडचे नवे मुख्य न्यायाधीश
 • न्यायमूर्ती पी. आर. रामचंद्र मेनन यांनी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. 
 • छत्तीसगडचे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. न्या. मेनन आधी केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीश होते.
 • लोकपालमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती केल्यानंतर मुख्य न्यायाधीश अजय कुमार त्रिपाठी यांनी राजीनामा दिला, त्यानंतर छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद रिक्त होते.


“SIMBEX 2019”: भारत आणि सिंगापूरयांच्या नौदलांचा सागरी सराव
 • दक्षिण चीन समुद्राच्या प्रदेशात सिंगापूर आणि भारत या देशांच्या नौदलांच्या “SIMBEX 2019” या द्वैपक्षीय सागरी सरावाच्या 26 व्या आवृत्तीचा आरंभ झाला.
 • चार दिवस चालणार्या या सागरी युद्धसरावात INS कोलकाता आणि INS शक्ती या जहाजांनी भाग घेतला आहे.
 • सिंगापूर आणि भारत यांच्या नौदलांमधील सागरी सहकार्य वाढविण्यासाठी आणि दोन्ही राष्ट्रांमध्ये मैत्रीचे संबंध बळकट करण्यासाठी 1993 सालापासून SIMBEX सरावाचे आयोजन केले जात आहे.
 • सिंगापूर हा मलेशियाच्या दक्षिणेकडील एक बेट राष्ट्र आहे. हे एक जागतिक आर्थिक केंद्र आहे. सिंगापूर हे एक शहर, राजधानी आणि राष्ट्र आहे. देशाचे राष्ट्रीय चलन सिंगापूर डॉलर हे आहे.


व्हिक्टर वेस्कॉवोने पाण्यात बुडी मारून नवीन विश्व रेकॉर्डची स्थापना केली
 • व्हिक्टर वेस्कॉवो (53 वर्ष वय) यांनी इतिहासातील पाण्यात सर्वात खोल बुडी मारून जागतिक विक्रम मोडला. 
 • यूएस नागरिक वेस्कॉवो समुद्रखाली शोध लावणारे अन्वेषक आहे जे पॅसिफिक महासागरच्या मारियाना खोऱ्यात 6.8 मैलापर्यंत बुडी मारून पोहोचले. 
 • चैलेंजर खोल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात कोणी मानवाने बुडी मारण्याचा हा तिसरा प्रसंग आहे. 
 • 1960 मध्ये नोंदविलेली खोल बुडीपेक्षा ही बुडी 52 फूट (16 मीटर) अधिक खोलवर गेली.


राफेल नदाल: ‘इटालियन ओपन 2019’ टेनिस स्पर्धेचा विजेता
 • ATP टूरवरील रोम येथे खेळवण्यात आलेल्या ‘इटालियन ओपन 2019’ या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकल गटात स्पेनच्या राफेल नदालने जेतेपद पटकावले आहे.
 • स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नदालने सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच ह्याचा पराभव केला. नदालने आतापर्यंत ही स्पर्धा नऊवेळा जिंकली आणि त्याच्या कारकीर्दीतले हे 81 वे जेतेपद आहे.
 • रोम ओपन (किंवा इटालियन ओपन) ही इटलीच्या रोम शहरात खेळवली जाणारी एक वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. ही फ्रेंच ओपन स्पर्धेनंतर जगातल्या सर्वात प्रतिष्ठित रेड क्ले टेनिस स्पर्धांपैकी एक आहे. ही स्पर्धा पहिल्यांदा सन 1930 मध्ये खेळवली गेली होती.


बिश्केक येथे ‘SCO परराष्ट्र मंत्री परिषद’ आयोजित केली जाणार
 • 21 आणि 22 मे 2019 रोजी किर्गिजस्तानाच्या बिश्केक या शहरात ‘शांघाय सहकार संघटना (SCO) परराष्ट्र मंत्री परिषद’ भरविण्यात येणार आहे. परिषदेत SCOच्या प्रदेशात आर्थिक सहकार आणि व्यापाराची वृद्धी या दोन घटकांवर चर्चा करण्यावर भर दिला जाणार. 
 • शांघाय सहकार संघटना (Shanghai Cooperation Organisation -SCO) याची 2001 साली स्थापना झाली. त्याचे बिजींग (चीन) येथे मुख्यालय आहे. चीन SCO चा संस्थापक देश आहे. भारत 2017 साली समुहाचा पूर्ण सदस्य बनला. वर्तमानात रशियाकडे समूहाचे अध्यक्षपद आहे.
 • समूहामध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे. भारत 2017 साली SCOचा पूर्ण सदस्य बनला.


भारताचे माजी सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश यांची कॉमनवेल्थ ट्रिब्यूनल सदस्य म्हणून नियुक्ती
 • न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) के. एस. राधाकृष्णन, सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश, यांची 8 मे 201 9 रोजी लंडनच्या कॉमनवेल्थ सचिवालय आर्बिट्राल ट्रिब्यूनलचे सदस्य म्हणून नियुक्त झाली.
 • ते 1 जून 2019 ते 31 मार्च 2023 पर्यंत न्यायाधिकरण सदस्य म्हणून 4-वर्षांच्या कालावधीसाठी काम करतील.
 • कॉमनवेल्थ सचिवालय मध्यस्थ न्यायाधिकरणाने कॉमनवेल्थ संस्था, आंतरराष्ट्रीय किंवा आंतर-सरकारी यांच्या विवादांचे निराकरण करते.
 • लंडनमध्ये स्तिथ, कॉमनवेल्थ सचिवालय मध्यस्थ न्यायाधिकरण (CSAT) कॉमनवेल्थ सरकारने मान्य केलेल्या संविधानानुसार कार्य करते.
 • CSAT मध्ये एकूण आठ सदस्य आहेत, ज्यात अध्यक्ष व 7 सदस्य आहेत.
 • यामध्ये 4-वर्षांच्या टर्मसाठी सदस्यांची नियुक्ती केली जाते. तथापि, त्यांच्या टर्मचे नूतनीकरण केले जाऊ शकते, मात्र एकदाच.

Post a Comment

0 Comments