चालू घडामोडी : Daily Current Affiars 17 May 2019

सेवानिवृत्त न्या. एम. बी. लोकुर यांची फिजीच्या सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती
 • सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त झालेले मदन भीमराव लोकुर यांना फिजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात अनिवासी मंडळाचे सदस्य म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. 

 • डिसेंबर 2018 मध्ये न्यायमूर्ती लोकुर सर्वोच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाले. फिजीच्या सरन्यायाधीशांनी त्यांना फिजीच्या सर्वोच्च न्यायालयात सामील होण्यासाठी निमंत्रित केले होते.
 • न्यायमूर्ती लोकूर 1977 साली न्यायाधीशांच्या बारमध्ये दाखल झाले आणि वकिली सुरू केली. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात कार्य केलेले आहे. 
 • 2012-2018 या काळात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
 • फिजीचे प्रजासत्ताक हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातला एक द्वीप-देश आहे. फिजीची राजधानी सुवा व्हिटी लेवू बेटावर वसली आहे. फिजीयन डॉलर हे त्याचे राष्ट्रीय चलन आहे.


जपानचा पहिला खाजगी रॉकेट ‘मोमो -3’ प्रक्षेपित करण्यात आला
 • इंटरस्टेलर टेक्नॉलॉजीज (आयएसटी) जपानची पहिली खाजगी कंपनी बनली आहे ज्यांनी स्पेसमध्ये रॉकेट Momo-3 प्रक्षेपित केला. 
 • इंटरस्टेलर टेक्नोलॉजीजने होक्काइडो स्पेस सेंटरमधून मोमो-3 रॉकेट लॉन्च केला. इंटरस्टेलर टेक्नॉलॉजीजचे संस्थापक ताकाफुमी होरी यांनी सांगितले की ही पूर्ण यश आहे. 
 • आम्ही त्वरीत चक्रामध्ये स्थिर लॉन्च आणि मास-उत्पादन (रॉकेट्स) साध्य करण्यासाठी कार्य करू. या चाचणीचा उद्देश किमान पातळीवर, तसेच इंधन कमी वापरणे आहे.


डच टेनिसपटू किकी बर्टन्सने ‘माद्रिद ओपन 2019’ ही स्पर्धा जिंकली
 • नेदरलँड्सचे टेनिसपटू (डच) किकी बर्टन्स हिने शारजाह येथे खेळल्या गेलेल्या ‘माद्रिद ओपन 2019’ या स्पर्धेच्या महिला एकल गटाचे जेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात बर्टन्सने सिमोना हेलपचा पराभव केला.
 • अन्य गटाचे विजेते – पुरुष एकल - नोव्हाक ज्योकोव्हिच (सर्बिया)पुरुष दुहेरी - जीन-जुलियन रोझर (नेदरलँड्स) व होरिया टेकाऊ (रोमानिया)महिला दुहेरी - सीह सु-वेई (चीनी तैपेई) व बार्बोरा स्ट्रिकोव्हा (झेक प्रजासत्ताक)
 • सन 2002 मध्ये सुरू करण्यात आलेली ‘माद्रिद ओपन’ स्पेनमध्ये (माद्रिद येथे) खेळली जाणारी प्रमुख टेनिस स्पर्धा आहे आणि ATP वर्ल्ड टूरचा एक भाग आहे.


ISROने 'युविका 2019' या कार्यक्रमाचा आरंभ केला
 • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे (ISRO) या वर्षीपासून उन्हाळ्याच्या सुट्टीत नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “युविका 2019” (युवा विज्ञानी कार्यक्रम - Yuvika) या नावाची एक नाविन्यपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
 • दिनांक 14 मे 2019 रोजी आंध्रप्रदेशातल्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावर या कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला.
 • कार्यक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना, ते शाळेत शिकत असलेल्या विज्ञानाचा प्रत्यक्ष अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञानाशी कसा संबंध आहे याचा परिचय करून दिला जाणार आहे. 
 • ही कार्यशाळा दोन आठवड्याची असेल. त्यात तज्ज्ञांची व्याख्याने, प्रयोगशाळांना भेटी, शास्त्रज्ञांशी थेट भेट आणि गप्पा अशा कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.


लवकरच भारताचे पहिले क्षेपणास्त्र निर्यात होणार
 • भारत लवकरच क्षेपणास्त्रांची पहिली बॅच निर्यात करण्याच्या तयारीत आहे. मंगळवार दि. १४ मे पासून सिंगापूरमद्ये तीन दिवसीय 'आशियाई आंतरराष्ट्रीय समुद्री संरक्षण प्रदर्शना'ची सुरूवात झाली. 
 • या प्रदर्शनादरम्यान बोलताना, भारताने तयार केलेल्या क्षेपणास्त्रांच्या पहिल्या बॅचची निर्यात करण्यास तयार असून यासाठी सरकारची आवश्यक मंजुरी मिळणे बाकी असल्याची माहिती 'ब्रह्मोस एअरोस्पेस'चे मुख्य महाप्रबंधक कमोडोर एस.के.अय्यर यांनी दिली.
 • या प्रदर्शनात भारतीय नौदलाच्या 'आयएनएस कोलकाता' आणि 'आयएनएस शक्ती' या युद्धनौका सहभागी झाल्या आहेत.
 • अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करणाऱ्या ब्रह्मोस, लार्सन अँड टुब्रो यांसरख्या कंपन्यांनीही आतरराष्ट्रीय समुद्री संरक्षण प्रदर्शनात सहभाग घेतला आहे.


डीआरडीओने केली "अभ्यास' ची यशस्वी चाचणी
 •  संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआडीओने सोमवारी ओडिशातल्या चंडीपूर इथल्या परिक्षण केंद्रावरुन 'अभ्यास' या 'हायस्पीड एक्स्पांडेबल एरिअल टार्गेट' (हिट) ची यशस्वी चाचणी केली.
 • या चाचणीच्या वेळी 'अभ्यास'मधील विविध रडार तसेच इलेक्ट्रोऑप्टिक प्रणालीवर लक्ष ठेवण्यात आले. 
 • आणि 'अभ्यास' ने स्वत:च दिशा निश्चित करुन आपली चाचणी यशस्वी केली.
 • 'अभ्यास' एका छोट्या गॅस टर्बाईनवर काम करत असून, यामध्ये स्वदेशी बनावटीच्या दिशादर्शक प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. 
 • हे अत्याधुनिक विमान देशाची सुरक्षा अधिक मजबूत करेल.

Post a Comment

0 Comments