चालू घडामोडी : Daily Current Affiars 16 May 2019

भारताच्या पहिल्या महिला आयसीसी मॅचरेफरी जी. एस. लक्ष्मी यांची निवड
 • भारताच्या जी. एस. लक्ष्मी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सामनाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. लक्ष्मी या पहिल्या महिला आयसीसी मॅचरेफरी होणार आहेत.
 • या नियुक्तीसह लक्ष्मी महिला क्रिकेटच्या बरोबरीने पुरुषांच्या सामन्यासाठीही मॅचरेफरी म्हणून काम करतील. त्यांची आयसीसीच्या मॅचरेफरी पॅनेलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
 • ऑस्ट्रेलियाच्या क्लेअर पोलोसक यांनी पुरुषांच्या सामन्यात अंपायरिंग करत नवा मापदंड प्रस्थापित केला होता. क्लेअर यांच्या बरोबरीने इलोइस शेरीदान आता महिला तसंच पुरुषांच्या क्रिकेटमध्ये अंपायरिंग करताना दिसतील.
 • लौरन एगनबर्ग, किम कॉटन, शिवानी मिश्रा, स्यू रेडफर्न, मेरी वॉल्ड्रन आणि जॅक्वेलिन विल्यम्स या पॅनेलमधील अन्य महिला अंपायर्स आहेत.
 • आयसीसीच्या अंपायर्स पॅनेलमध्ये नियुक्त होणाऱ्या कॅथी क्रॉस या पहिला महिला अंपायर होत्या. त्या गेल्या वर्षी निवृत्त झाल्या.
जी. एस. लक्ष्मी
 • उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या लक्ष्मी आऊटस्विंग करणाऱ्या गोलंदाज म्हणूनही प्रसिद्ध होत्या.
 • 1986 ते 2004 या कालावधीत त्यांनी भारतीय संघासह साऊथ सेंट्रल रेल्वे, आंध्र प्रदेश, बिहार, पूर्व विभाग, दक्षिण विभाग अशा संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे.
 • 51 वर्षीय लक्ष्मी 2008 पासून भारतातील महिला क्रिकेटमध्ये सामनाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
 • आतापर्यंत त्यांनी 3 महिला वनडे तसंच 3 महिला ट्वेन्टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनाधिकारी म्हणून काम केलं आहे.


अमेरिका देणार भारताला ‘थाड’ संरक्षण व्यवस्था; एस-४०० ची किंमत तीन अब्ज अमेरिकन डॉलर
 • रशियाच्या एस-४०० ला पर्याय म्हणून अमेरिकेने भारताला टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स (टीएचएएडी) आणि पॅट्रियट अडव्हान्स कॅपॅबिलिटी (पीएसी-३) क्षेपणास्त्र संरक्षण व्यवस्था देण्याची तयारी दाखवली आहे. 
 • अनेक वर्षांपासून रशियाशी सुरू असलेल्या वाटाघाटींनंतर ही व्यवस्था मिळवण्याच्या जवळ आम्ही असल्याचे भारताने म्हटले.
 • डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने काही आठवड्यांपूर्वी ही यंत्रणा देण्याची तयारी दाखवली होती, असे समजते. २०१६ मध्ये अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने केलेल्या कथित हस्तक्षेपाबद्दल त्याला शिक्षा करण्यासाठी म्हणून भारताने त्याच्याकडून वरील व्यवस्था विकत घेतल्यास त्याच्यावर निर्बंध लादले जाणार नाहीत हे आश्वासन अमेरिकेने मागे घेतले.


नोव्हाक ज्योकोव्हिचने ‘माद्रिद ओपन 2019’ ही टेनिस स्पर्धा जिंकली
 • सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक ज्योकोव्हिच ह्याने शारजाह येथे खेळल्या गेलेल्या ‘माद्रिद ओपन 2019’ या स्पर्धेचे तिसर्यांदा जेतेपद पटकावले आहे.
 • अंतिम लढतीत नोव्हाकने ग्रीकच्या सिटसिपेसचा एकतर्फी पराभव केला. याआधी त्याने 2011 व 2016 मध्ये जेतेपद मिळवले होते. हे ज्योकोव्हिकचे मास्टर्स स्पर्धेतले 33 वे जेतेपद ठरले आहे. तसेच ATP क्रमवारीतही त्याने अव्वलस्थान कायम राखले आहे.
 • ताज्या क्रमवारीत ज्योकोव्हिच 12,115 गुणासह अव्वलस्थानी विराजमान आहे. स्पेनचा राफेल नदाल 7945 गुणासह द्वितीय तर स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर 5770 गुणासह तृतीय स्थानी आहे.


चीनी नौदलात दोन नवीन गाइडेड मिसाइल डिस्ट्रोयर युद्धनौकांचा समावेश
 • आग्नेय चीनच्या लिओनिंग प्रांतातल्या डालियन शिपयार्ड या बंदरावर 10 मे 2019 रोजी दोन नवीन गाइडेड मिसाइल डिस्ट्रोयर या युद्धनौकांचे जलावतरण करण्यात आले.
 • ही युद्धनौका प्रगत इलेक्ट्रॉनिक स्कॅन अरे रडार सिस्टम आणि 64 व्हर्टिकल लॉंच मिसाइल सेल्स सोबतच विविध शस्त्र आणि उपकरणांनी सुसज्जित आहेत.
 • चीन दक्षिण चीनी समुद्रात आणि हिंद महासागरात आपले वर्चस्व गाजविण्याच्या वारंवार प्रयत्न करीत आहे. त्यातच इतिहासातील पहिल्यांदाच हिंद महासागरातल्या जिबूती येथे एक मालवाहतुकीसाठीचे तळ तयार केले आहे आणि अरबी समुद्रात पाकिस्तानात ग्वादर बंदर विकसित करीत आहे.
 • याव्यतिरिक्त चीनने 99 वर्षांकरिता श्रीलंकाचे हंबांटोटा बंदरही विकत घेतले आहे.


पोर्तुगालमध्ये 2020 साली UNची ‘महासागर परिषद’ आयोजित केली जाणार
 • संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनी (UNGA) 2020 साली 2 जून ते 6 जून या काळादरम्यान पोर्तुगाल देशाच्या लिस्बन या शहरात ‘महासागर परिषद’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • "ध्येय 14 याच्या अंमलबजावणीसाठी विज्ञान आणि नवकल्पनावर आधारित असलेल्या महासागरासंदर्भात कृतींमध्ये वाढ करणे: उपलब्धता, भागीदारी आणि उपाययोजना" या संकल्पनेवर आधारित असलेली ही परिषद पोर्तुगाल आणि केनियाच्या सरकारच्या सहकार्याने आयोजित केली जाणार आहे.
 • शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र आणि सागरी स्त्रोतांचे जतन करणे आणि शाश्वत वापर करणे हे 2030 सालासाठी ठरविण्यात आलेले शाश्वत विकास ध्येय 14 आहे.


डीआरडीओने केली "अभ्यास' ची यशस्वी चाचणी
 • संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआडीओने सोमवारी ओडिशातल्या चंडीपूर इथल्या परिक्षण केंद्रावरुन 'अभ्यास' या 'हायस्पीड एक्‍स्पांडेबल एरिअल टार्गेट' (हिट) ची यशस्वी चाचणी केली.
 • या चाचणीच्या वेळी 'अभ्यास'मधील विविध रडार तसेच इलेक्‍ट्रोऑप्टिक प्रणालीवर लक्ष ठेवण्यात आले. 
 • आणि 'अभ्यास' ने स्वत:च दिशा निश्‍चित करुन आपली चाचणी यशस्वी केली.
 • 'अभ्यास' एका छोट्या गॅस टर्बाईनवर काम करत असून, यामध्ये स्वदेशी बनावटीच्या दिशादर्शक प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. 
 • हे अत्याधुनिक विमान देशाची सुरक्षा अधिक मजबूत करेल.

Post a Comment

0 Comments