चालू घडामोडी : Daily Current Affiars 12 May 2019

राज्याच्या मुख्य सचिवपदी अजोय मेहता यांची नियुक्त
 • मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचा अधिकृत आदेश आल्यानंतर अजोय मेहता मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्विकारणार आहेत. 
 • लोकसभा निवडणूक सुरु असल्याने सध्या आचारसंहित लागू आहे. यामुळे राज्य सरकारने अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव स्विकारला आहे.

 • अजोय मेहता यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यामुळे रिक्त होणाऱ्या महापालिका आयुक्तपदी लवकरच नियुक्ती केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 
 • अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी सध्या या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असून त्यांची महापालिका आयुक्तपदी वर्णी लागण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. 
 • दरम्यान, सध्या मुख्य सचिवपदी असणारे यु. पी. एस मदान यांनी स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव दिला आहे. यु. पी. एस मदान ऑक्टोबरमध्ये निवृत्त होणार होते


बेसल कन्व्हेन्शन (COP -14) पक्षांचे 14 वे सम्मेलन स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा येथे आयोजित केले जात आहे
 • बेसेल कन्व्हेन्शन - घातक टाकावू पदार्थांचे हस्तांतरण आणि त्यांच्या विस्थापनाची ट्रांस्बाऊंडरी हालचाली नियंत्रित करणे:
 • 1992 मध्ये हे लागू झाले हैती आणि अमेरिकेने करारावर स्वाक्षरी केली परंतु त्यांनी याची पुष्टी केली नाही.
 • ही एक आंतरराष्ट्रीय संधि आहे जी राष्ट्रामध्ये घातक कचऱ्याच्या हालचाली कमी करण्यासाठी आणि विशेषतः घातक टाकावू पदार्थांचे विकसनशील ते कमी विकसित देशांमध्ये (एलडीसी) हस्तांतरित करण्यास प्रतिबंध करण्यासाठी करण्यात आली आहे.
 • ते रेडियोधर्मी कचरा चळवळ संबोधित करत नाही. 
 • निर्मित कचऱ्याची मात्रा आणि विषबाधा कमी करणे, त्यांचे पर्यावरणात्मक व्यवस्थापन योग्य असल्याचे सुनिश्चित करणे आणि एलडीसीला त्यांनी तयार केलेल्या घातक आणि इतर टाकावू पदार्थांच्या पर्यावरणास चांगल्या व्यवस्थापनात सहाय्य करणे हा देखील उद्देश आहे.


भारतीय रेल्वेची ‘मधमाशी योजना’ संपूर्ण आसाम राज्यात राबवविणार
 • भारतीय रेल्वे हत्तींना रेल ट्रॅकपासून दूर ठेवण्यासाठी आसाम राज्यात ‘मधमाशी योजना’ (Honey Bee plan) राबवविणार आहे.
 • गेल्या वर्षी या योजनेच्या प्रयोगाला सुरुवात झाली आणि ही प्रणाली यशस्वी ठरली त्यामुळे या योजनेचा इतर भागात विस्तार करण्याची योजना भारतीय रेल्वेनी तयार केली आहे.
 • रेल मार्गापासून दूर ठेवण्यासाठी मधमाशींचा रेकॉर्ड केलेला आवाज प्राण्यांना एकविला जातो.
 • या योजनेमुळे रेल्वे ट्रॅकवर होणार्या प्राण्यांचा मृत्यू टाळण्यासाठी मदत होणार.


संयुक्त राष्ट्रसभेमध्ये भारताला एक महत्वपूर्ण विजय मिळाला आहे
 • इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाच्या ( INCB) सदस्यपदी भारताच्या जगजित पोवाडीया यांची फेरनिवड झाली आहे.
 • संयुक्त राष्ट्रसभेच्या आज झालेल्या निवडणुकीमध्ये पोवाडीया यांना ५४ पैकी ४४ मते पडली. 
 • पोवाडीया या २०१५ पासून आयएनसीबीच्या सदस्यपदावर असून फेरनिवडीमुळे त्या २०२५ पर्यंत या पदावर सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत.
 • संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या ५४ सदस्यांनी आज गुप्त मतदान केले. या निवडणुकीतील पाच जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात होते.
 • निवडणूक जिंकण्यासाठी २८ मतांची आवश्यकता असते. ५४ सदस्यांपैकी ४४ सदस्यांनी पोवाडिया यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना निवडून दिले आहे.
 • हा भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग असल्याचे बोलले जात असून भारतासाठी हा मोठा विजय असल्याचे मानले जात आहे.


‘जांभळा बेडूक’: केरळचा राज्य उभयचर प्राणी
 • केरळ राज्य सरकारने ‘जांभळा बेडूक’ हा राज्य उभयचर प्राणी म्हणून निवडला आहे. या निर्णयामुळे विलुप्त होत चाललेल्या या प्रजातीचे संरक्षण करण्यास मदत होणार. उभयचर प्राणी म्हणून निवड करणारा हा पहिला राज्य आहे.
 • जांभळा बेडूक (Purple Frog) ही सुग्लोसीडे कुटुंबातली बेडकाची एक प्रजाती आहे. त्याचे शास्त्रीय नाव Nasikabatrachus sahyadrensis हे आहे. 
 • ही प्रजाती प्रामुख्याने भारतात पश्चिम घाटामध्ये आढळते. हा बेडूक जवळजवळ संपूर्ण आयुष्य भूमिगत राहते आणि वर्षात केवळ एकाच दिवसासाठी पृष्ठभागावर अवतरतो.

Post a Comment

0 Comments