चालू घडामोडी : Daily Current Affiars 11 May 2019

जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल पोलंडमध्ये
जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल पोलंडमध्ये येत असून, याला 'डीपशॉट डायव्हिंग पूल' म्हटले जात आहे.

 • या स्विमिंग पूलचा सर्वाधिक खोली असलेला भाग ४५ मीटर खोलीचा असून, त्यामध्ये आठ हजार क्युबिक मीटर पाणी भरले जाणार आहे.
 • एकूण सत्तावीस ऑलिम्पिक-साईझ पूल्सच्या आकाराचा हा डीपशॉट डायव्हिंग पूल असणार आहे.
 • सध्या जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल असल्याचा विक्रम इटलीतील 'मॉन्टेग्रोटो टर्मे' येथील 'वाय-४० डीप जॉय' या स्विमिंग पूलच्या नावे असून, हा पूल ४२ मीटर खोल आहे.
 • या पूलला 'ब्ल्यू अबिस' नावाने संबोधले जाणार असून, प्रोफेशनल डायव्हर्स, एरोस्पेस कॅम्युनिटीज आणि मरीन रिसर्चर्स करिता खास या पूलचे निर्माण करण्यात येत आहे.


वन लायनर चालू घडामोडी
● मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

● राफेल लढाऊ विमान खेरदी प्रकरणातील पुनर्विचार याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला

● मुंबईच्या वरिष्ठ आणि २३-वर्षांखालील निवड समितीचे अध्यक्षपद मिलिंद रेगे यांच्याकडे सोपवण्यात आले

● स्पेनचा प्रमुख टेनिसपटू डेव्हिड फेररने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली

● भारतीय महिला कुस्ती संघाची प्रशिक्षक म्हणून शबनम शेख हिची नियुक्ती करण्यात आली

● अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स कम्युनिकेशनमधील संचालक मंडळाचे अधिकार बरखास्त करण्यात आले

● क्रोएशियाचे इगोर स्टिमॅक होणार भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक

● महाराष्ट्राचे मुख्य सचिव यूपीएस मदन यांनी स्वैच्छिक सेवानिवृत्ती घेतली

● महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून अजय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली

● विक्रम राठौर यांची इंडिया 'ए' टीमचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली

● डेल टेक्नोलॉजीज मध्ये आलोक ओहरी यांना भारताचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले

● गेट्स फाउंडेशनने भारतातील निदेशक म्हणून हरि मेनन यांची नियुक्ती केली

● रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ने ब्रिटिश टॉय मेकर कंपनी " हॅमलेज " ६२० कोटी रुपयांना विकत घेतली

● रबींद्र भारती विद्यापीठ कोलकाता ने लेखक संजय चट्टोपाध्याय यांना डी. लिट पदवी देऊन सन्मानित केले

● प्रख्यात चित्रपट टीव्ही अभिनेते मृणाल मुखर्जी यांचे निधन झाले

● भारत - चीन ने भारतीय मिरचीच्या निर्यातीसाठी करार केला

● ऑस्ट्रेलियन फ्लाईट कॅरियर " क्वांटास " ने जगातील पहिल्या झीरो-वेस्ट फ्लाइटचे संचालन केले

● मायक्रोसॉफ्ट कंपनीने सुरक्षित मतदानासाठी " इलेक्शनगॉर्ड " सॉफ्टवेअरची निर्मिती केली

● छत्तीसगड प्रथम अँटी-नक्षल महिला कमांडो युनिट तैनात करण्यात आले

● रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाने छापलेल्या ५० डॉलर्सच्या ४.६ कोटी नोटांवर Responsibility शब्‍दाच्या स्पेलिंगमध्ये चुक झाली आहे

● प्रिन्स मन्सूर बिन नासर बिन अब्दुल अझीझ यांची स्वित्झर्लंडमध्ये सौदी अरेबिया चे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली .


जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल पोलंडमध्ये
 • जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल पोलंडमध्ये येत असून, याला 'डीपशॉट डायव्हिंग पूल' म्हटले जात आहे.
 • या स्विमिंग पूलचा सर्वाधिक खोली असलेला भाग ४५ मीटर खोलीचा असून, त्यामध्ये आठ हजार क्युबिक मीटर पाणी भरले जाणार आहे.
 • एकूण सत्तावीस ऑलिम्पिक-साईझ पूल्सच्या आकाराचा हा डीपशॉट डायव्हिंग पूल असणार आहे.
 • सध्या जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल असल्याचा विक्रम इटलीतील 'मॉन्टेग्रोटो टर्मे' येथील 'वाय-४० डीप जॉय' या स्विमिंग पूलच्या नावे असून, हा पूल ४२ मीटर खोल आहे.
 • या पूलला 'ब्ल्यू अबिस' नावाने संबोधले जाणार असून, प्रोफेशनल डायव्हर्स, एरोस्पेस कॅम्युनिटीज आणि मरीन रिसर्चर्स करिता खास या पूलचे निर्माण करण्यात येत आहे.


"GRIHA फॉर एक्जिस्टिंग डे स्कूल्स"
 • विद्यमान शाळांचे मूल्यांकन करणारी प्रणाली भारतातल्या विद्यमान शाळांमधील पर्यावरण-विषयक कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी GRIHA (ग्रीन रेटिंग फॉर इंटिग्रेटेड हबिटॅट असेसमेंट) परिषदेनी "GRIHA फॉर एक्जिस्टिंग डे स्कूल्स" नावाची मानांकन देणारी प्रणाली प्रसिद्ध केली आहे.
 • ऊर्जा आणि पाणी याबाबत कार्यक्षमता वाढविण्यासाठी सुचविलेल्या उपाययोजना तसेच त्याच्या व्यवस्थापनात येणारा खर्च कमी करण्याबाबतच्या उपाययोजना तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केलेल्या पर्यावरण-विषयक कार्यांचे आणि त्याच्या प्रभावांचे मूल्यांकन केले जाणार आहे.
 • GRIHA (ग्रीन रेटिंग फॉर इंटिग्रेटेड हबिटॅट असेसमेंट) परिषद हा भारतात शाश्वत निवासस्थानाशी संबंधित वैज्ञानिकदृष्ट्या आणि प्रशासकीय मुद्द्यांना संबोधित करणारा एक स्वतंत्र मंच आहे. त्याची स्थापना नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या सहकार्याने ‘द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’ (TERI) या संस्थेनी केली.
 • GRIHA हे एक मानांकन (रेटिंग) साधन आहे, जे राष्ट्रीय पातळीवर ठरविण्यात आलेल्या मानदंडांच्या अंतर्गत लोकांना त्यांच्या इमारतीच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यास मदत करते आणि इमारतीला ‘ग्रीन बिल्डींग’ म्हणून मान्यता देते.


आधुनिक विधि शिक्षणाचे प्रणेते एन.आर माधव मेनन यांचे निधन
 • आधुनिक विधि शिक्षणाचे प्रणेते व नॅशनल लॉ स्कूलचे संस्थापक  एन.आर.माधव मेनन (वय८४) यांचे येथील  रूग्णालयात निधन झाले, 
 • केरळचे राज्यपाल पी.सदाशिवम यांनी मेनन यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले असून कायदेशीर व घटनात्मक बाबींवरील एक तज्ज्ञ व्यक्ती गमावल्याचे म्हटले आहे. 
 • मेनन यांनी कायद्यातील कारकीर्द केरळ उच्च न्यायालयातून वयाच्या एकविसाव्या वर्षी सुरू केली होती. १९६० मध्ये अलिगड मुस्लीम विद्यापीठात अध्यापन केले. 
 • १९८६ मध्ये त्यांनी बंगळुरू येथे नॅशनल लॉ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी ही संस्था स्थापन केली, तेथे ते १२ वर्षे कु लगुरू होते.

Post a Comment

0 Comments