प्रफुल्ल शिलेदार यांना अनुवादासाठी ‘साहित्य अकादमी’पुरस्कार २०१८

‘साहित्य अकादमी’ पुरस्कार २०१८ च्यावतीने अनुवादासाठी दिला जाणारा पुरस्कार नागपूरचे कवी-अनुवादक प्रफुल्ल शिलेदार यांना मिळाला आहे. ज्येष्ठ कवी ज्ञानेंद्रपती यांच्या 'संशयात्मा' या हिंदी काव्यसंग्रहाच्या शिलेदार यांनी मराठीत अनुवादित केलेल्या याच शीर्षकाच्या काव्यसंग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Sahitya akadmi purskar 2018
Sahitya akadmi purskar 2018

 ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार २०१८ प्रफुल्ल शिलेदार यांना

  • ज्ञानेंद्रपती यांना या 'संशयात्मा' काव्यसंग्रहाला २००६ साली साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • राजवाडे लेखसंग्रह या विश्वनाथ राजवाडे लिखित मराठी निबंधांच्या कोंकणी अनुवादासाठी नारायण भास्कर देसाई यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • फ्रॉम गंगा टू ब्रह्मपुत्रा'च्या आसामी अनुवादासाठी पार्थ प्रतिम हजारिका यांना पुरस्कार घोषित झाला.

अनुवादासाठी पुरस्कार :
  • दरवर्षी सर्व २४ भाषांमधील उत्कृष्ट अनुवादकास दिला जातो
  • सुरुवात :- १९८९
  • स्वरूप :-पन्नास हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह
  • २०१७ चा पुरस्कार : सुजाता देशमुख यांना विक्रम संपत लिखित माय नेम इज गौहर जान या इंग्रजी पुस्तकाच्या गौहर जान म्हणतात मला या मराठीतील अनुवादासाठी.

Post a Comment

0 Comments