Daily Current Affiars 9 April 2019 (चालू घडामोडी)


IUCNच्या रेड लिस्टमध्ये भारतीय ‘महासीर’ मासा समाविष्ट करण्यात आला
 • आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) याच्या ‘रेड लिस्ट ऑफ थ्रेटंड स्पेसीज’ या यादीत कुबड असलेला भारतीय ‘महासीर’ मासा समाविष्ट करण्यात आला आहे. या यादीत सूचीबद्ध होणे म्हणजे "लुप्त होत असलेली प्रजाती" असा अर्थ होतो.
 • ‘महासीर’ मासा ताज्या पाण्यात आढळणारा मोठ्या आकाराचा मासा आहे. त्याला पाण्यातला वाघ म्हणतात. हा मासा केवळ कावेरी नदीच्या खोर्‍यात (केरळच्या पंबर, काबीनी आणि भवानी नद्यांमध्येही) आढळतो.
 • नोव्हेंबर 2018 मध्ये ग्रेट हॉर्नबिल या मास्यासह अन्य 12 भारतीय प्रजातींना देखील या यादीत समाविष्ट केले गेले. 
 • संस्थेबाबत 1948 साली स्थापना झालेली आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (International Union for Conservation of Nature -IUCN) ही संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) याची अधिकृत सल्लागार संस्था आहे. 
 • ही निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात तसेच नैसर्गिक स्त्रोतांचा शाश्वत वापर या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली संस्था आहे. या संस्थेचे मुख्यालय ग्लॅंड (स्विर्त्झलँड) या शहरात आहे.


‘ब्लॅक राईस’ उत्पादनाचा राज्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी.
 • कमी दिवसात जास्त उत्पादन देणाऱ्या भात पिकांच्या रोवणीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यात प्रथमच औषधी गुणधर्म असलेल्या ‘ब्लॅक राईस’ उत्पादनाला प्रोत्साहन दिल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील 70 एकर क्षेत्रावर ‘ब्लॅक राईस’चा प्रयोग यशस्वी ठरला आहे. 
 • सर्वसाधारण पारंपरिक भात पिकापासून 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन होते. त्यामुळे अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणांना कृषी विभागाच्या 'आत्मा'अंतर्गत ‘ब्लॅक राईस’ लागवडीचा प्रयोग नागपूर जिल्ह्यातील रामटेक, मौदा, उमरेड, कुही, पारशिवनी व कामठी या तालुक्यातील निवडक शेतकरी गटाच्या माध्यमातून पहिल्यांदा 70 एकरामध्ये हा प्रयोग राबविण्यात आला आहे.


नौदल मोहीमा शाखेचे नव्या महासंचालक पदी व्हाईस ॲडमिरल एम. ए. हंपीहोली
 • व्हाईस ॲडमिरल एम. ए. हंपीहोली ह्यांनी भारतीय नौदलाच्या नौदल मोहीमा (Naval Operations) शाखेच्या महासंचालक पदाचा भार स्वीकारला आहे. 
 • राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे पदवीधर असलेले व्हाईस ॲडमिरल हंपीहोली भारतीय नौदलात कार्यकारी शाखेत 1 जुलै 1985 रोजी दाखल झाले. 
 • ते पाणबुडी-रोधी युद्धशास्त्रात महत्वाची कामगिरी केली आहे. त्यांना नौ सेना पदक (2011 साली) आणि अतिविशिष्ट सेवा पदक (2019) देवून सन्मानित केले गेले आहे.


स्लोव्हाकियाच्या प्रथम महिला राष्ट्रपती: जुझाना कापुतोवा
 • स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच स्लोव्हाकिया या युरोपीय देशाच्या सर्वोच्च पदावर म्हणजेच राष्ट्रपती पदी जुझाना कापुतोवा या महिलेची निवड झाली आहे. 45 वर्षीय कोपुतोवा यांना 58% मते मिळाली आहेत. तर सत्ताधारी पक्षाचे उमेदवार सेफकोविक यांना 42% मते मिळाली.
 • लिबरल प्रोग्रेसिव्ह स्लोव्हाकिया या पक्षाच्या त्या सदस्य असून पक्षातून एकही उमेदवार संसदेत निवडून गेलेला नाही. कापुतोवा यांनी सरकारवर सातत्याने टीका आणि भ्रष्टाचार विरोधी लढ्यात नेहमी पुढाकार घेतला आहे. 
 • स्लोव्हाकिया हा मध्य युरोपातला लहानसा देश आहे. 1992 साली हा देश अस्तित्वात आला. ब्रातिस्लावा ही या देशाची राजधानी आहे.
 • बर्लिनची भिंत पाडल्यानंतर युरोपात अनेक देश अस्तित्वात आले. त्यात झेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकिया यांचाही समावेश आहे. 1991 साली झालेल्या या फाळणीला ‘व्हेलव्हेट क्रांती’ म्हणतात.


कूर्ग अरेबिका कॉफी आणि अन्य चार कॉफी प्रकारांना मिळाला GI टॅग
कूर्ग अरेबिका कॉफी तसेच वायनाद रोबस्टा कॉफी, चिकमगालूर अरेबिका कॉफी, अराकू व्हॅली अरेबिका कॉफी आणि बाबाबुदंगीरीस अरेबिका कॉफी अश्या पाच कृषी उत्पादनांना भौगोलिक खूण (GI) टॅग प्राप्त झाले आहे.
 • कूर्ग अरेबिका कॉफी - कर्नाटक राज्याच्या कोडागू जिल्ह्यात.  
 • वायनाद रोबस्टा कॉफी - पश्चिम घाटाच्या वायनाद प्रदेशात 
 • चिकमगालूर अरेबिका कॉफी आणि बाबाबुदंगीरीस अरेबिका कॉफी - कर्नाटकाच्या चिकमगालूर जिल्ह्यात. 
 • अराकू व्हॅली अरेबिका कॉफी - आंध्रप्रदेशाच्या विशाखापट्टनम जिल्ह्यात आणि ओडिशाच्या कोरापूट जिल्ह्यात.

भौगोलिक खूण (GI)म्हणजे काय ?

भौगोलिक खूण (Geographical Indication) हे उत्पादनांवर छापले जाणारे चिन्ह आहे. या चिन्हामुळे उत्पादनाला विशेष भौगोलिक ओळख मिळते आणि त्याची मूळ गुणवत्ता दर्शवते. उदा. दार्जीलिंगची चायपत्ती, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी. भारताच्या बौद्धिक संपदा अधिकार जाहिरात व व्यवस्थापन विभाग (Cell for IPR Promotion and Management -CIPAM) कडून भारतीय उत्पादनांना GI टॅग प्रदान केला जातो.

Post a Comment

0 Comments