Daily Current Affiars 2 April 2019 (चालू घडामोडी)


 न्या. डी. के. जैन: BCCI चे तात्पुरते इथिक्स अधिकारी
 • 28 मार्चला निवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन ह्यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) इथिक्स अधिकारी (नीतीमत्ता अधिकारी) पदी तात्पुरत्या आधारावर नेमणूक करण्यात आली आहे. 
 • भारतीय क्रिकेटच्या हितार्थ उद्भवलेल्या वादांशी संबंधित मुद्दे शोधण्यासाठी आणि ठरविण्यासाठी इथिक्स अधिकारी नियुक्त केले जाते.
 • डी. के. जैन हे सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेले BCCIचे पहिले लोकपाल आहेत.
 • भारतीय क्रिकेट नियामक मंडळासंदर्भात तक्रारींच्या निवारणाची जबाबदारी नव्या लोकपालाकडे दिली गेली आहे.
 

युरोपीय संघाचा ‘PRISMA’ पृथ्वी-निरीक्षण उपग्रह
 •  युरोपीय संघाने त्याच्या ‘वेगा’ अग्निबाणाच्या साहाय्याने इटालियन स्पेस एजन्सी या अंतराळ संस्थेसाठी पृथ्वीच्या कक्षेत ‘PRISMA’ नावाचा पृथ्वी-निरीक्षण उपग्रह पाठवला आहे.
 • PRISMA (हायपरस्पेक्ट्रल प्रीकर्सर ऑफ द अप्लिकेशन मिशन) उपग्रह हा पर्यावरणविषयक देखरेख, स्त्रोतांचे व्यवस्थापन, प्रदूषण आणि पीकांचे आरोग्य याविषयी माहिती प्रदान करण्यासाठी तयार केला गेला आहे.
 

भारतीय लष्करात चार ‘धनुष्य’ होव्हित्झर तोफा समाविष्ट करण्यात आल्या
 • देशातच विकसित करण्यात आलेल्या चार ‘धनुष्य’ तोफा भारतीय लष्करात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. 
 • स्वदेशी धनुष्य तोफ : देशातच विकसित करण्यात आलेली ‘धनुष्य’ तोफ प्रणाली (artillery gun) ही 1980च्या दशकात भारताने खरेदी केलेल्या स्वीडिश बोफोर्स होव्हित्झर तोफेची एक अद्ययावत आवृत्ती आहे.
 • भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) आणि खाजगी क्षेत्राने एकत्रितपणे विकसित केलेल्या अडव्हान्स टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम (ATAGS) म्हणजेच ‘धनुष्य’ तोफेने 48 किलोमीटर अंतरावरचे लक्ष्य भेदून नवा विक्रम केलेला आहे.
 • 155 मि.मी. x 45 मि.मी. कॅलिबर या आकाराचा तोफेचा गोळा ही तोफ वापरते. ही तोफ अत्याधिक पाऊस असो वा बर्फवृष्टी, कोणत्याही परिस्थितीत अचूक वेध घेऊ शकते. 
 • ही कोणत्याही प्रदेशात (सपाट मैदान, वाळवंट वा डोंगराळ भागात) हाताळण्यास सहज आहे.
 

​PSLV -C45 EMISAT या उपग्रहासह इतर 28 देशांच्या 28 उपग्रहांचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले.
 • भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.
 • भारताच्या एमीसॅट उपग्रहासह इतर देशांचे 28 नॅनो उपग्रहांचे आज (1 एप्रिल) श्रीहरिकोटा येथील अवकाशतळावरून पीएसएलव्ही सी 45 प्रक्षेपकाच्या मदतीने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
 • एमीसॅट आणि नॅनो उपग्रह एकाच वेळी अंतराळात पाठवण्याची ऐतिहासिक कामगिरी इस्रोने केली. सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी पीएसएलव्ही सी 45 प्रक्षेपक एमीसॅट व 28 नॅनो उपग्रहांना घेऊन झेपावले.
 • पीएसएलव्ही प्रक्षेपकाने चांद्रयान 2008 व मंगळ ऑर्बिटर 2013 या दोन्ही मोहिमांत मोठी भूमिका पार पाडली होती. यात अमेरिकेतील 24, लिथुआनियातील 11, स्पेनमधील 1 तर स्वित्झर्लंडमधील एका उपग्रहाचा समावेश आहे.
 • ‘इस्रो’चा हा 47वा पीएसएलव्ही मोहीम असून ही मोहीम चार टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. 
 • एमीसॅट उपग्रह हा विद्युत चुंबकीय मापनासाठी काम करणार आहे. प्रक्षेपक अंतराळात 749 किमीवर एमीसॅट उपग्रहल सोडेल आणि 504 किमी ऑर्बिटमध्ये इतर उपग्रहांना प्रक्षेपित करेल.


अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील बेटांची नवीन नावे
 1. रॉस बेट - नेताजी सुभाषचंद्र बोस बेट
 2. नील बेट - शहीद बेट
 3. हॅवलॉक बेट - स्वराज बेट

 • रॉस बेटाचे नाव कॅप्टन डॅनियल रॉस या ब्रिटिश जलसर्वेक्षणकाराच्या नावावरून देण्यात आले असून हे बेट पोर्ट ब्लेअरच्या बांधणीपूर्वी अंदमान-निकोबार बेटांचे प्रशासकीय केंद्र होते.
 • 1943 साली आझाद हिंद सेनेने जपानच्या मदतीने ही बेटे जिंकल्यानंतर नेताजींनी येथे तिरंगा फडकवला होता तसेच काही दिवस वास्तव्यही केले होते.
 • ब्रिगेडियर जेम्स नील आणि मेजर जनरल हेन्री हॅवलॉक यांनी 1857 च्या बंडाचा बिमोड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्यांच्या नावावरून दुसरी दोन नावे देण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments