(चालू घडामोडी) Daily Current Affiars 19 April 2019


चंदीगडमध्ये ‘मार्शल अर्जुन सिंग स्मारक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा 2019’ आयोजित
 • चंदीगड या शहरात द्वितीय ‘मार्शल अर्जुन सिंग स्मारक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
 • ही स्पर्धा 16 एप्रिल ते 25 एप्रिल या काळात हवाई दल क्रिडा नियंत्रण मंडळाने आयोजित केली आहे. ही स्पर्धा मार्शल अर्जुन सिंग यांच्या स्मरणार्थ आयोजित केली जाते.

मार्शल अर्जुन सिंग कोण आहेत?

 • भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जुन सिंग हे सन 1964 ते सन 1969 या काळात भारतीय हवाई दलाचे प्रमुख होते. ते सन 1966 साली भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून पदोन्नत्ती मिळविणारे पहिले IAF अधिकारी ठरले. 2002 साली ते भारतीय हवाई दलाचे प्रथम आणि एकमेव अधिकारी ठरले, ज्यांना भारतीय हवाई दलाचे मार्शल म्हणून फाइव्ह-स्टार रँकवर पदोन्नती मिळाली.


स्वदेशी ‘निर्भय’ या सब सॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
 • स्वदेशी बनावटीच्या आणि देशातच विकसित केलेल्या लांब पल्ल्याच्या ‘निर्भय’ या प्रथम सब-सॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राची ओडिशातल्या चंदीपूर येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली.
 • संरक्षण संशोधन व विकास संस्थेने ही चाचणी घेतली. चाचणीसाठी ठेवण्यात आलेल्या सर्व उद्दिष्टांची पूर्तता झाली.
 • ‘निर्भय’ क्षेपणास्त्र समुद्रसपाटीपासून अतिशय कमी उंचीवर असलेले लक्ष्य भेदले जाऊ शकते. त्याची मारा क्षमता 1000 किलोमीटर एवढी आहे. हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (DRDO) बेंगळुरूमधील प्रगत संरक्षण आस्थापनाद्वारे (ADE) संरचित आणि विकसित केले गेले आहे.


गोल्फपटू टायगर वूड्सने ‘2019 मास्टर्स चॅम्पियनशिप’ स्पर्धा जिंकली
 • अमेरिकेचा गोल्फपटू टायगर वूड्स ह्यांनी ऑगस्टा नॅशनल (अमेरिका) येथे खेळल्या गेलेल्या ‘2019 मास्टर्स अजिंक्यपद’ या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आणि पाचव्यांदा हिरव्या रंगाचा जाकीट जिंकला.
 • ‘मास्टर्स अजिंक्यपद’ (मास्टर्स टूर्नामेंट किंवा मास्टर्स किंवा यू.एस. मास्टर्स) ही चार प्रमुख व्यवसायिक गोल्फ स्पर्धांपैकी एक आहे. 
 • ही स्पर्धा ऑगस्टा (जॉर्जिया, अमेरिका) या शहरात दरवर्षी खेळवली जाते. 1934 साली पहिल्यांदा ही स्पर्धा  खेळवली गेली. 
 • 1949 सालापासून स्पर्धेच्या विजेत्याला हिरवे जाकीट देण्यात येते, जे विजय मिळविल्यानंतर एक वर्षानंतर क्लबहाऊसला परत केले जाते.


‘टाइम्स’च्या यादीत मुकेश अंबानी, अरुंधती काटजू, मेनका गुरुस्वामी
 • न्यू यॉर्क : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि लोकचळवळींसाठी कायदेशीर लढा देणाऱ्या अरुंधती काटजू आणि मेनका गुरुस्वामी यांचा सहभाग जगभरातील प्रभावी व्यक्तींमध्ये करण्यात आला आहे.
 • ‘टाइम’ या नियतकालिकाने जगभरातील प्रभावी व्यक्तींची २०१९ मधील यादी नुकतीच जाहीर केली आहे. त्यात या तिघांचा समावेश आहे. या यादीत भारतीय-अमेरिकन कॉमेडियन हरन मिनाज, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचाही समावेश आहे.
 • मुकेश अंबानी यांची व्यावसायिक धोरणे ही अधिक व्यापक असून त्यामुळेच जवळपास २८० दशलक्ष लोकांना कमी किमतीत ४जी सेवा उपलब्ध करून दिली आहे.
 • त्याचप्रमाणे जगभरात व्यापाराचा विस्तार करून त्यांची ‘कर लो दुनिया मुठ्ठीमे’ हे घोषवाक्य खरे केले आहे. तर अरुंधती काटजू आणि मेनका गुरुस्वामी यांनी एलजीबीटीक्यू यांच्यासाठी लढा देऊन कायदेशीर मार्गाने त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहेत.


युरोपीय संघाने कॉपीराइट संदर्भातले नियम कठोर केलेत
 • 1 लक्ष कोटी डॉलर एवढी उलाढाल असलेल्या युरोपीय संघाच्या कलात्मक उद्योगांसाठी योग्य मोबदला मिळावा हे सुनिश्चित करण्याकरिता युरोपीय संघाच्या सरकारने डिजिटल सामुग्रीच्या कॉपीराइट (संरक्षण) संदर्भात नवे नियम तयार केले आहेत.
 • नवे नियम आणखीनच कठोर केले गेले आहेत. त्या नियमांच्या अंतर्गत आता EU मधील कंपन्यांना गुगल कंपनीला भरपाई द्यावी लागणार आहे आणि फेसबुकला सामुग्री संरक्षित करावी लागणार.
 • युरोपीय संघातल्या कलात्मक उद्योगांनी आज 11.7 दशलक्ष लोकांना रोजगार दिलेला आहे. नवीन नियमांनुसार, गुगल व इतर ऑनलाइन व्यासपीठांना संगीतकार, कलाकार, लेखक, वृत्तपत्र प्रकाशक आणि पत्रकारांशी त्यांनी केलेले कार्य वापरण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी परवान्यासंदर्भात करार करणे आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments