(चालू घडामोडी) Daily Current Affiars 17 April 2019

 2019 च्या विश्वचषकासाठी भारतीय संघ :

2019 च्या विश्वचषकासाठी भारतीय संघ
ICC world cup teem 2019
 • विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के एल राहुल, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी यांचा समावेश संघात करण्यात आला आहे.
 • इंग्लंडमध्ये खेळवल्या जाणाऱ्या क्रिकेट विश्वचषकासाठी 15 जणांचा समावेश असलेल्या टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या 15 क्रिकेटपटूंशिवाय आणखी चार खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. खलील अहमद, आवेश खान, दीपक चाहर आणि नवदीप सैनी यांना टीम इंडियाच्या नेट सरावासाठी इंग्लंडला पाठवण्यात येणार आहे.
 • हे चौघं क्रिकेटपटू विश्वचषक दौऱ्यात भारतीय संघाला मदत करतील. खलील अहमद, आवेश खान, दीपक चाहर आणि नवदीप सैनी हे चारही गोलंदाज सध्या आयपीएलमध्ये वेगवेगळ्या टीम्समध्ये खेळत आहेत.
 • क्रिकेट विश्वचषकाला 30 मेपासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगेल.


नेपाळमध्ये पबजी गेमवर बंदी, खेळताना सापडल्यास अटक, भारतातही बंदीची मागणी
 • जगभरात लोकप्रिय असलेला इंटरनेट गेम 'पबजी'वर कोर्टाच्या आदेशानंतर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या गेममुळे तरुण आणि लहान मुलांच्या वागणुकीवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे कोर्टाचे म्हणणे आहे. 
 • याबाबतचे वृत्त नेपाळी माध्यमांनी प्रसारित केले आहे. दरम्यान, हा गेम खेळताना सापडल्यास त्या व्यक्तीला अटक केली जाणार आहे. नेपाळमध्ये 'पबजी'वर (PlayerUnknown's Battlegrounds ) बंदी घातल्यानंतर या गेमवर भारतातही बंदी घालण्याची मागणी होत आहे. 
 • नेपाळी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार नेपाळ दूरसंचार प्राधिकरणाने (दी नेपाल टेलिकम्युनिकेशन अथॉरिटी) सर्व इंटरनेट आणि मोबाईल सेवा प्रदात्यांना 'पबजी' या गेमवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पबजीवर बंदी घातल्यानंतर कोणतीही व्यक्ती हा गेम खेळताना सापडल्यास त्याला अटक केली जाईल.
 • महानगरीय गुन्हे शाखेद्वारे काठमांडू जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, हा गेम खेळल्याने लहान मुलांच्या वागणुकीवर नकारात्मक परिणाम होतात. या मुद्द्याकडे लक्ष वेधत कोर्टाने पबजीवर बंदी घालण्याची परवानगी दिली आहे. कोर्टाच्या परवानगीनंतर गुन्हे शाखेने नेपाळ दूरसंचार प्राधिकरणाला (एटीए) पत्र लिहून गेमवर बंदी घालण्याची विनंती केली.


मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर
 • या वर्षीच्या विजेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील. 
 • सलीम खान, नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर, हेलन मानकरी
 • मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानद्वारे संगीत, नाटय़, कला आणि सामाजिक क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारे मास्टर दीनानाथ पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आले.
 • प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांना या वर्षीचा संगीत आणि कला क्षेत्रातील मास्टर दीनानाथ पुरस्कार देऊ न सन्मानित करण्यात येणार असून मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव प्रसिद्ध लेखक सलीम खान यांना प्रदान करण्यात येणार आहे.


अमेरिकेच्या 'द कॅपिटल गॅझेट' वृत्तपत्राला पुलित्झर पुरस्कार जाहीर
 • अमेरिकेतील एका वृत्तपत्राला त्यांच्याच कार्यालयात झालेल्या हल्ल्याच्या वार्तांकनासाठी पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. 
 • कॅपिटल गॅझेट या वृत्तपत्राला हा पुरस्कार मिळाला आहे. मात्र हा पुरस्कार मिळाल्यानंतरही या कार्यालयात कोणत्याही प्रकारचा आनंदोत्सव साजरा केला नाही. तिथल्या कर्मचाऱ्यांनी या निमित्ताने फक्त मृत कर्मचाऱ्यांची आठवण काढली.
 • एका शस्त्रधारी व्यक्तीने जून 2018 मध्ये या कार्यालयावर हल्ला केला होता. न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉल स्ट्रीट जर्नलला सुद्धा यावर्षीचा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे.
 • अमेरिकेच्या पत्रकारितेतल्या इतिहासातील हा एक अतिशय निर्घृण हल्ला होता. या हल्ल्याच्या वृत्तांकनाच्या वेळी वृत्तपत्राने जे धैर्य दाखवलं त्यासाठी त्यांना हा विशेष पुरस्कार देण्यात आला आहे.
 • मानपत्र आणि आणखी परिणामकारकरित्या पत्रकारिता करण्यासाठी 100000 डॉलर इतका निधी दिला आहे.


स्वातंत्रसैनिक पुष्पलता मोकाशी यांचे निधन
 • ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पुष्पलता मोकाशी यांचे आज सकाळी विलेपार्ले येथील राहत्या घरी निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात संदेश, अभय आणि शैलेश ही तीन मुले, सुना, नातवंडे, पणतू असा परिवार आहे.
 • ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पुष्पलता मोकाशी यांचे आज सकाळी विलेपार्ले येथील राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात संदेश, अभय आणि शैलेश ही तीन मुले, सुना, नातवंडे, पणतू असा परिवार आहे.
 • पुष्पलता मोकाशी यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी सहा वाजता विलेपार्ले येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
 • ज्येष्ठ समाजवादी नेते एस.एम. जोशी यांच्या नेतृत्वातील प्रजा समाजवादी पक्षात त्या सक्रिय होत्या. तत्पूर्वी स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी हिररीने सहभाग घेतला होता. स्वातंत्र्य चळवळीतील नाटकांमध्ये आणि गायनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. 
 • पुष्पलता मोकाशी यांचे पती वसंत मोकाशी यांचे २७ मार्च रोजी निधन झाले होते. वसंत मोकाशीदेखील स्वातंत्र्यसैनिक होते. त्याशिवाय त्यांनी एकाच वेळी परराष्ट्र खाते आणि श्रम मंत्रालय अशा दोन महत्त्वाच्या खात्यातील जबाबदारी सांभाळली होती. पासपोर्ट अधिकारी म्हणून केलेल्या कामाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला होता.


खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची केंद्रात महत्वाच्या खात्यांमध्ये संयुक्त सचिव म्हणून थेट नियुक्ती.
 • खासगी क्षेत्रातल्या 9 तज्ज्ञांची थेट केंद्रातल्या महत्वाच्या खात्यांमध्ये संयुक्त सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. मोदी सरकारनं घेतलेल्या या निर्णयाची  अंमलबजावणी सुरु झाली आहे. सर्वसाधारणपणे सचिव होण्यासाठी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं असतं. मात्र जलद आणि पारदर्शक कारभार व्हावा, या हेतूनं 9 जणांची मोदी सरकारनं थेट निवड केली आहे.
 • यामध्ये अमर दुबे (नागरी उड्डयन ), अरुण गोयल (वाणिज्य), राजीव सक्सेना (आर्थिक मुद्दे ), सुजीत कुमार बाजपेयी (पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन), सौरभ मिश्रा (वित्तीय सेवा) आणि दिनेश दयानंद जगदाळे (अपारंपरिक ऊर्जा ), सुमन प्रसाद सिंह (रस्ते, परिवहन आणि  राजमार्ग मंत्रालय), भूषण कुमार (जहाजरानी) आणि कोकोली घोष (कृषी आणि शेतकरी कल्याण) यांची संबंधित खात्यांमध्ये संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 • ८९ जण शॉर्टलिस्ट - यासाठी आलेल्या 6,077 अर्जांपैकी 89 जणांना मुलाखतीसाठी बोलावले होते. यांनतर त्यांना पुढील प्रक्रियेसाठी विस्तृत अर्ज भरायला सांगितलं होतं. निश्चित कालावधीसाठी लेटरल इंट्रीच्या माध्यमातून तज्ज्ञांना सिस्टममध्ये सामावून घेणं महत्वाचं असल्याचे नीती आयोगाने आपल्या एका अहवालात म्हटले आहे.
 • केंद्रात संयुक्त सचिवपदी खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची तीन वर्षांसाठी निवड करण्याचा निर्णय सरकारने गेल्या वर्षी जाहीर केला होता. त्याबाबत एक अधिसूचनाही जाहीर करण्यात आली होती. UPSCची परीक्षा न देताही आता सरकारी अधिकारी होता येणार असल्याने यावर अनेक मतभेद झाले होते.

Post a Comment

0 Comments