(चालू घडामोडी) Daily Current Affiars 13 April 2019


नरेंद्र मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर
 • सध्या नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यातच मोदींसाठी चांगली बातमी आहे. रशियाने पंतप्रधान मोदींना ‘सेंट एंड्रयू अवॉर्ड’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे. 
 • त्यामुळे नरेंद्र मोदींना आता जगातील आणखी एका पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे
 • रशिया आणि भारत यांच्यातील संबंध एका नव्या उंचीवर नेल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. रशियन दुतावासाने याबाबतची अधिकृत माहिती जारी केली आहे. 
 • १२ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा करण्यात आल्याचं रशियाने म्हटलंय. हा पुरस्कार मिळवणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान असतील.
 • यापूर्वी दक्षिण कोरियाने सियोल शांती पुरस्काराने मोदींना सन्मानित केलं होतं. तसचं युएई कडूनही त्यांना जायद पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे.


UNFPAचा ‘स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन 2018’ अहवाल.
 • अहवालानुसार, सन 2010 आणि सन 2019 या काळात भारताची लोकसंख्या 1.2% इतक्या वार्षिक दराने वाढली, जेव्हा की याच कालावधीत जागतिक पातळीवर हा वार्षिक दर सरासरी 1.1% एवढा होता.
 • 2019 साली जागतिक लोकसंख्या 7.715 अब्ज इतकी वाढली, जी वर्षापूर्वी 7.633 अब्ज एवढी होती. 
 • भारताचा लोकसंख्या दर चीनच्या दुप्पट असून चीनचा वार्षिक दर हा 0.5% एवढा होताचीनची लोकसंख्या २०१९ मध्ये १४२ कोटींवर पोहोचली आहे.
 • १९६९ मध्ये जन्माबरोबरच सरासरी आयुर्मान हे ४७ वर्ष होते. १९९४ मध्ये ६० वर्ष झाले त्यानंतर २०१९ मध्ये ते ६९ वर्ष झाले. जगाच्या आयुर्मानाचा सरासरी दर ७२ वर्ष आहे. 
 • अहवालात २०१९ मध्ये भारताच्या लोकसंख्येच्या आकडेवारीचा एक आलेख दिला आहे. यामध्ये म्हटले आहे की, देशाची २७-२७ टक्के लोकसंख्येचे आयुर्मान हे ० ते १४ आणि १०-२४ वर्ष इतके आहे. तर देशाची ६७ टक्के लोकसंख्या १५-६४ या वयोगटातील आहे.


लिंगाधारित अर्थसंकल्प [Gender Budget]
 • या संकल्पनेचा उद्य 90 च्या दशकात झाला. 
 • जागतिक महिला परिषद 1995 नंतर "युनिफेम"तर्फे 1996 मध्ये द. आफ्रिका, पूर्व आफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया, मध्य अमेरिका या भागात या संकल्पनेवर काम सुरू झाले. 
 • ही संकल्पना सर्वप्रथम ऑस्ट्रेलियात स्विकारण्यात आली.

लिंगाधारित अर्थसंकल्प नक्की संकल्पना काय ?

 • जेंडर बजेट म्हणजे महिलांसाठी वेगळा अर्थसंकल्प नव्हे, तर अर्थसंकल्पातील विविध प्रस्तावांचे महिलाकेंद्रित विश्लेषण होय.
 • थोडक्यात स्त्रियांच्या स्थितीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या वित्तीय सुधारणांचे अंतिम परिणाम मोजणे म्हणजे जेंडर बजेट. 

भारतात सुरूवात लिंगाधारित अर्थसंकल्प ?

 • सर्वप्रथम 2001 मध्ये या संकल्पनेवर विचार होवू लागला. 
 • तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या 2000-2001 च्या अर्थसंकल्पीय भाषणात पहिल्यांदा जेंडर बजेटचा उल्लेख झाला. 
 • 2004 मध्ये केंद्र सरकारने ही संकल्पना स्विकारली तर 2005 पासून त्यावरचे परिशिष्ट हा बजेटचा भाग बनले. 
 • ओरिसा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, केरळ, इ. राज्यांनी या संकल्पनेची अंमलबजावणी केली.

महाराष्ट्रात सुरूवात लिंगाधारित अर्थसंकल्प ?

 • राज्यात 2013 मध्ये जेंडर बजेट ही संकल्पना स्विकारण्यात आली.
 • 1994, 2001 आणि 2014 अशी तीन महिला धोरणे महाराष्ट्र सरकारने तयार केली आहेत. 
 • 1992 पासून राज्यात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिला व बालकल्याण समिती स्थापने बंधनकारक करण्यात आले आहे. 
 • महापालिकेच्या एकूण बजेटपैकी 5% रक्कम जेंडर बजेटसाठी राखून ठेवण्याचे बंधनकारक आहे.

जेंडर बजेटची उद्दिष्टे लिंगाधारित अर्थसंकल्प ?

 • महिलांच्या सामाजिक समानतेसाठीच्या प्रमुख गरजा ओळखून त्यांची क्रमवारी लावून, त्यासाठी सुयोग्य आर्थिक तरतूद करणे. 
 • सामाजिक योजना आणि आर्थिक तरतुदी यांची सांगड घालणे.
 • विशेष सामाजिक योजनांवरील खर्चावर नियंत्रण ठेवणे.

अर्थसंकल्पाची कार्यपद्धती लिंगाधारित अर्थसंकल्प ?

 • लिंगाधारित अर्थसंकल्पासाठी स्वतंत्र आदेश जारी करणे. 
 • जेंडर बजेट सेल स्थापन करणे.
 • जेंडर बजेट अहवाल प्रसिद्ध करणे.

Post a Comment

0 Comments