(चालू घडामोडी) Daily Current Affiars 12 April 2019


करन्सी चेस्ट या व्यवस्थेची स्थापना करण्यासाठी बँकांसाठी RBI ची मार्गदर्शक तत्त्वे
 • भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) करन्सी चेस्ट या व्यवस्थेची स्थापना करण्यासाठी बँकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.

करन्सी चेस्ट म्हणजे काय?

करन्सी चेस्ट ही एक अशी जागा आहे जिथे भारतीय रिझर्व्ह बॅंक बँकांचा सर्व अतिरिक्त पैसा स्वताःच्या देखरेखीखाली आपल्या ताब्यात ठेवते. जेव्हाही RBI नवीन बँकनोटा छापते, तेव्हा त्या नोटा सर्वप्रथम देशभरातल्या करन्सी चेस्टकडे वितरीत केल्या जातात आणि नंतर तेथून त्या नोटा बँकांना वितरीत केल्या जातात.

नवी मार्गदर्शक तत्त्वे :
 • स्ट्रॉंग रूमसाठी 1,500 चौ. फूट एवढे किमान क्षेत्रफळ असावे. डोंगराळ वा दुर्गम ठिकाणी हे क्षेत्रफळ किमान 600 चौ. फुट असावे.
 • दररोज 6.6 लक्ष बँकनोटा एवढी प्रोसेसिंग क्षमता नवीन चेस्टची असणे आवश्यक आहे. डोंगराळ वा दुर्गम ठिकाणी ही क्षमता दररोज 2.1 लक्ष बँकनोटा एवढी असावी.
 • आधुनिक सुविधा आणि कमीतकमी 1,000 कोटी रुपये एवढ्या चेस्ट बॅलन्स लिमीट (CBL) यांसह मोठ्या आकाराचे करन्सी चेस्ट उघडण्यासाठी सर्वोच्च बँकेनी बँकांना प्रोत्साहित करावे.

मानवनिर्मित वनव्यामुळे 'नीलकुरिंजी' वनस्पतीला धोका
 • मानवनिर्मित वनव्यामुळे म्हणजेच मानवी हस्तक्षेपामुळे वनात लागलेल्या आगीचा तेथील वनस्पती व पशूंवर प्रतिकूल परिणाम होतो. वसंत ऋतुत पर्वतीय भागात फुलणार्‍या रमणीय 'नीलकुरिंजी' (Strobilanthes kunthianus) या फूल-वनस्पतीला या वनव्याचा धोका असल्याचे दिसून आले आहे.
 • पहाडी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गवत वाढते आणि उन्हाळ्यात ते वाळते. त्यामुळे आगीच्या एका ठिणगीने संपूर्ण क्षेत्र नष्ट होण्याचा धोका असतो.
 • ‘नीलकुरिंजी’ (जैविक नाव: स्ट्रोबिलंथस कुंथिएनस) ही वनस्पती दक्षिण भारताच्या पश्चिम घाटामध्ये 1800 मीटर उंचीवर शोला गवती मैदानामध्ये मुख्यताः आढळून येते. या रोपाला 12 वर्षांमध्ये केवळ एकदाच बहर येतो.
 • निलगिरी पर्वताला याच वनस्पतीच्या नावावरून नाव मिळाले. निलगिरी पर्वताच्या ‘कलहट्टी’ नावाच्या उतारी प्रदेशात ही वनस्पती बहरल्याचे आढळून आले आहे. त्याच्या निळ्या रंगाच्या फुलांमुळे त्याला नील हे नाव मिळाले. हे परदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षन केंद्र आहे.


2019 सालासाठी NIRF आणि ARIIA क्रमवारी प्रसिद्ध.
 • भारतातल्या संस्थांची गुणवत्ता वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने ‘राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी कार्यचौकट-2019’ (NIRF) हे दस्तऐवज तयार करण्यात आले आहे आणि संस्थांना दिलेली क्रमवारी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
 • 8 एप्रिलला राष्ट्रपतींच्या हस्ते विविध श्रेणीत आठ संस्थांना भारतीय क्रमवारी पुरस्कार दिले गेलेत. ‘IIT मद्रास’ या संस्थेनी NIRF-2019 मध्ये एकूणच सर्व श्रेणींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
 • याशिवाय, अटल रॅंकिंग ऑफ इंस्टीट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचीवमेंट्स (ARIIA) ही क्रमवारी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्यात अग्र ठरलेल्या दोन संस्थांना ‘ARIIA पुरस्कार’ देण्यात आला. ARIIA या क्रमवारीमध्ये मिरंडा हाऊस कॉलेज (दिल्ली विद्यापीठ) या संस्थेनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. 
 • भारतातल्या प्रथम पाच अभियांत्रिकी संस्था – IIT मद्रास, IIT दिल्ली, IIT बॉम्बे, IIT खडगपूर, IIT कानपूर. 
 • भारतातली प्रथम पाच विद्यापीठे – IISc बेंगळुरू, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (नवी दिल्ली), बनारस हिंदू विद्यापीठ (वाराणशी), हैदराबाद विद्यापीठ, कलकत्ता विद्यापीठ (कोलकाता).
 • भारतातली प्रथम पाच महाविद्यालये - मिरंडा हाऊस (दिल्ली), हिंदू कॉलेज (दिल्ली), प्रेसीडेंसी कॉलेज (चेन्नई), सेंट स्टीफेन्स कॉलेज (दिल्ली), लेडी श्रीराम कॉलेज फॉर विमेन (नवी दिल्ली).


UNFPAचा ‘स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन 2018’ अहवाल
 • संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या कोष (UNFPA) कडून ‘स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन 2018’ या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 • अहवालानुसार, सन 2010 आणि सन 2019 या काळात भारताची लोकसंख्या 1.2% इतक्या वार्षिक दराने वाढली, जेव्हा की याच कालावधीत जागतिक पातळीवर हा वार्षिक दर सरासरी 1.1% एवढा होता.
 • 2019 साली जागतिक लोकसंख्या 7.715 अब्ज इतकी वाढली, जी वर्षापूर्वी 7.633 अब्ज एवढी होती.
 • भारताचा लोकसंख्या दर चीनच्या दुप्पट असून चीनचा वार्षिक दर हा 0.5% एवढा होता.
 • सरासरी आयुमर्यादा 72 वर्षापर्यंत आहे.कमी विकसित देशांमध्ये लोकसंख्या दर सर्वाधिक नोंदवला गेला आहे. 
 • आफ्रिका खंडातल्या देशांमध्ये सरासरी वार्षिक दर हा 2.7% एवढा नोंदवला गेला.


बेंजामिन नेतान्याहू इस्त्राएलच्या इतिहासातले सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे
 • इस्त्राएलच्या राष्ट्रीय निवडणुकीत बेंजामिन नेतान्याहू यांनी विजय मिळवला आहे.
 • नेतान्याहू ह्यांची जर पंतप्रधान पदासाठी निवड झाली तर इस्त्राएलचे पंतप्रधानपद भूषवण्याची त्यांची ही विक्रमी पाचवी वेळ असेल आणि ते इस्त्राएलच्या 71 वर्षांच्या इतिहासातले सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती ठरु शकतात.

Post a Comment

0 Comments