Daily Current Affiars 11 April 2019 (चालू घडामोडी)


विस्डेन लिडिंग क्रिकेटर ऑफ द इयर
 • क्रिकेटमधील बायबल समजल्या जाणाऱ्या 'विस्डेन' मासिकाच्या 'विस्डेन लिडिंग क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्काराचा - विराट कोहली - सलग तिसऱ्या वर्षी मानकरी ठरला आहे. 
 • 2018 , 2017 , 2016 असे सलग 3 वर्ष 'विस्डेन लिडिंग क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार कोहलीस
 • सलग 3 वर्ष पुरस्कार प्राप्त करणारा - कोहली जगातील प्रथम खेळाडू
 • विस्डेन लिडिंग विमेन क्रिकेटर ऑफ द इयर' हा पुरस्कार - स्मृती मानधनास जाहीर
 • "विस्डेन - 5 क्रिकेटर ऑफ द इयर" पुरस्कार - टॅमी ब्ल्यूमॉँट , जोस बटलर ,सॅम कुरेन , राशीद खान , रोरी बर्न्स यांना जाहीर
 • सर्वोत्कृष्ट T-20 क्रिकेटर पुरस्कार - अफगाणिस्तानच्या राशीद खानला जाहीर
 • ऑस्ट्रेलियाचे सर डॉन ब्रॅडमन - 10 वेळा पुरस्कार विजेते
 • इंग्लंडच्या जॅक होब्स यांना - 8 वेळा पुरस्कार


हानीकारक ठरणार्या ऑनलाइन सामग्रीवर लक्ष ठेवण्यासाठी ब्रिटनची नवी वॉचडॉग यंत्रणा
 • ब्रिटनच्या प्रशासनाने देशातल्या डिजिटल सामाजिक माध्यमांच्या व्यासपीठावर टाकल्या जाणार्या व हानीकारक ठरणार्या ऑनलाइन सामग्रीवर लक्ष ठेवण्यासाठी नवी वॉचडॉग (देखरेख) यंत्रणा प्रस्थापित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
 • नव्या नियमांनुसार, वापरकर्त्यांना हानीकारक सामुग्रीपासून दूर ठेवण्यात अपयशी ठरणार्या सामाजिक माध्यम कंपन्या आणि तंत्रज्ञान/इंटरनेट कंपन्यांना मोठा दंड सहन करावा लागू शकतो. 
 • आत्महत्येसाठी प्रेरित करणारी आणि उदासिनता वाढविणारी डिजिटल सामुग्री तरुणांना सहज उपलब्ध होत आहे. त्यातच ब्रिटनमधील 14 वर्षीय मुलीने केलेल्या आत्महत्येनंतर या गंभीर मुद्द्याकडे लक्ष दिले जात आहे. जगभरातल्या लोकांमध्ये, विशेषत: तरुणाईमध्ये, ही समस्या वाढीला लागली आहे.


व्याघ्रपरिषद २०१९ : व्याघ्र संवर्धन
 • व्याघ्र संवर्धन प्रकल्पांचा आढावा घेणाऱ्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे २८ जानेवारी रोजी नवी दिल्लीत उद्घाटन झाले. भारतात होणारी ही दुसरी व्याघ्रपरिषद आहे. 
 •  केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालय तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन परिषद यांनी ही परिषद आयोजित केली आहे. 
 • उद्घाटक:-डॉ हर्षवर्धन ( केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्री)
 • २०१० मध्ये पिट्सबर्ग येथे झालेल्या परिषदेत, २०२० पर्यंत जगातील वाघांची संख्या दुपटीने वाढवण्याचा वचननामा स्वीकारण्यात आला होता.
 • त्यावेळी भारतात वाघांची संख्या १४११ इतकी होती, २०१४साली झालेल्या व्याघ्रगणनेनुसार ती २२२६ पर्यत पोहोचली. २०१४ ची परिषद भारतात आयोजित करण्यात आली होती.


प्रसिद्ध नाटककार कार्तिक चंद्र रथ यांचे निधन
 • दिनांक 1 एप्रिल 2019 रोजी प्रसिद्ध नाटककार कार्तिक चंद्र रथ यांचे आजाराने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते.
 • सलग 25 वर्षापासून न चुकता इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल आणि थिएटर ओलंपियाड ही लोकप्रिय कार्यक्रमे एकट्याने आयोजित करण्यामध्ये कार्तिक चंद्र रथ यांचा हातखंडा होता.
 • त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत 500 पेक्षा अधिक नाटके लिहिली आणि दिग्दर्शित केलीत. 1980च्या दशकातल्या "भगवान जाने मनीषा" या नाटकाने त्यांच्या कारकि‍र्दीला सुरुवात झाली. 
 • त्यांना केंद्र संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि ओडिशी संगीत नाटक अकादमी पुरस्कार दिला गेला.


ग्रॅहम रीड: भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक
 • ऑस्ट्रेलियाचे ग्रॅहम रीड यांची भारतीय वरिष्ठ पुरुष हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 • 54 वर्षीय ग्रॅहम रीड लवकरच बेंगळूरमध्ये सुरू असलेल्या हॉकी शिबिरात दाखल होणार आहेत. 
 • पुढील वर्षीच्या अखेरपर्यंत त्यांच्या प्रशिक्षकपदाची मुदत निश्चित करण्यात आली आहे. 
 • अपेक्षित कामगिरी झाल्यास त्यांना 2022 सालाच्या FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेपर्यंत मुदतवाढ दिली जाऊ शकते.
 • भरतीय हॉकी संघाचे प्रमुख प्रशिक्षकपद गेल्या जानेवारीत हरेंद सिंग यांची हकालपट्टी झाल्यानंतर रिक्त राहिले होते.

Post a Comment

0 Comments