Daily Current Affiars 10 April 2019 (चालू घडामोडी)


जागतिक होमिओपॅथी दिन : 10 एप्रिल
 • दरवर्षी 10 एप्रिल या दिवशी जागतिक होमिओपॅथी दिन पाळण्यात येतो. यावर्षी डॉक्‍टर हॅनिमेन यांची 264 वी जयंती साजरी केली जात आहे.
 • या दिनानिमित्त भारतात नवी दिल्लीत केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद (CCRH) यांच्यावतीने 9 एप्रिल 2019 रोजी दोन दिवस चालणारी परिषद भरविण्यात आली आहे. 
 • दिनामागचा इतिहास दरवर्षी 10 एप्रिल या दिवशी होमिओपॅथी या वैद्यकीय उपचार पद्धतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणारे डॉक्टर क्रिस्टीएन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनिमेन यांचा जन्‍मदिवस ‘जागतिक होमिओपॅथी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. 
 • डॉ. सॅम्युअल हॅनिमेन यांनी 1969 साली पर्यायी औषधोपचार म्हणून होमिओपॅथी ही पद्धत विकसित केली.


प्रसिद्ध नाटककार कार्तिक चंद्र रथ यांचे निधन
 •  सलग 25 वर्षापासून न चुकता इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल आणि थिएटर ओलंपियाड ही लोकप्रिय कार्यक्रमे एकट्याने आयोजित करण्यामध्ये कार्तिक चंद्र रथ यांचा हातखंडा होता.
 • त्यांनी आपल्या कारकिर्दीत 500 पेक्षा अधिक नाटके लिहिली आणि दिग्दर्शित केलीत. 
 • 1980च्या दशकातल्या "भगवान जाने मनीषा" या नाटकाने त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. 
 • त्यांना केंद्र संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि ओडिशी संगीत नाटक अकादमी पुरस्कार दिला गेला.


प्रफुल पटेल: FIFA कार्यकारी परिषदेचे प्रथम भारतीय सदस्य
 • अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांची ‘FIFA कार्यकारी परिषद’ याचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
 • प्रफुल पटेल या मंडळात सामील करण्यात आलेले पहिले भारतीय ठरले आहेत. सन 2019 ते सन 2023 या काळात ते या पदावर राहतील. 
 • आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (International Federation of Football Association -FIFA) हा एक खासगी महासंघ आहे, जो स्वतःस असोसिएशन फुटबॉल, फुटसल आणि बीच सॉकर या क्रिडाप्रकारांची एक आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था म्हणून संबोधतो. 
 • FIFA फुटबॉल या क्रिडाप्रकाराच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या, विशेषत: पुरुष विश्वचषक (1930 सालापासून) आणि महिला विश्वचषक (1991 सालापासून), आयोजनासाठी जबाबदार आहे. 
 • 1904 साली FIFAची स्थापना करण्यात आली आणि त्याचे मुख्यालय झुरिच (स्वित्झर्लंड) येथे आहे. त्याच्या सदस्यत्वामध्ये सध्या 211 राष्ट्रीय संघांचा समावेश आहे.


जपानची हायाबुसा 2 मोहीम प्रगतिपथावर
 • जपानच्या हायाबुसा या शोधक यानाने एका लघुग्रहावर शंकूच्या आकाराचे स्फोटक यंत्र यशस्वीरीत्या पाठवले असून त्याच्या पृष्ठभागावर विवर तयार करून अंतर्गत रचनेचा शोध घेतला जाणार आहे. सौरमाला कशी तयार झाली असावी यावरही त्यामुळे प्रकाश पडणार आहे.
 • ही मोहीम जोखमीची असून जपानच्या अवकाश संस्थेच्या हायाबुसा 2 यानाने पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या आरंभाचा शोध घेण्यासाठी चालवलेल्या अभ्यासाचा एक भाग आहे.
 • हायाबुसा 2 वरून शंकूच्या आकाराचे एक स्फोटक यंत्र पाठवण्यात आले. त्यावेळी हायाबुसा यान रुगु या लघुग्रहापासून 1600 फूट म्हणजे 500 मीटर उंचीवर होते. हे स्फोटक यंत्र तेथे पडल्यानंतर चाळीस मिनिटांनी त्याचा स्फोट होऊन तेथे विवर तयार होईल. 
 • हा लघुग्रह पृथ्वीपासून 30 कोटी किलोमीटर अंतरावर असून हायाबुसा 2 यानाने हे स्फोटक यंत्र अंतराळ कचऱ्याशी टक्कर चुकवून अचूकपणे लघुग्रहावर पाठवले आहे. त्यासोबतच एक कॅमेराही पाठवण्यात आला होता त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमाची छायाचित्रेही टिपण्यात आली आहेत.


अरुणाचल प्रदेशात लोकसभा निवडणूकीचे प्रथम मतदान ITBP दलाच्या सैनिकांकडून
 • भारतातल्या ‘लोकसभा निवडणूक 2019’ याच्या वेळापत्रकानुसार 11 एप्रिल 2019 रोजी पहिल्या टप्प्यात 20 राज्यांमधील 91 जागांसाठी मतदान होण्याचे नियोजित आहे.
 • या मतदानाला सुरुवात करण्यासाठी म्हणून 5 एप्रिलला इंडो-तिबेटी सीमा पोलीस (ITBP) या भारताच्या सशस्त्र दलात सेवेत असलेल्या ‘सेवा’ मतदारांकडून (service voters) अरुणाचल प्रदेशात मतदान केले गेले. लोहितपूर (अरुणाचल प्रदेश) गावातल्या ITBP तळाचे प्रमुख DIG सुधाकर नटराजन यांनी त्यांचे प्रथम मत दिले. 11 एप्रिलला सामान्य नागरिक मतदान करतील.
 • पहिल्याच टप्प्यात 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होणार, त्यामध्ये आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरयाणा, हिमाचल, केरळ, मेघालय, मिझोरम, नागालँड, पंजाब, सिक्किम, तेलंगणा, तामिळनाडू, अंदमान व निकोबार, दादरा व नगर हवेली, दमन व दीव, लक्षद्वीप, दिल्ली, पुडुचेरी, चंदीगड आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे.


नवी दिल्लीत ‘हरित आणि भूदृष्य’ याविषयक राष्ट्रीय परिसंवाद संपन्न
 • केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे (CPWD) नवी दिल्लीत ‘हरित आणि भूदृष्य’ याविषयक राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आले होते.
 • शहरी भागातले हरित क्षेत्र सामाजिक आणि नैसर्गिक स्थिरता आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. हरित आणि स्वच्छ शाश्वत विकासाच्या सतत प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.
 • या कार्यक्रमात पाणी, वायू, ऊर्जा, भूमी, जैवविविधता आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर, अक्षय ऊर्जा, पाण्याचे संवर्धन, सांडपाण्यावरील पुनर्प्रक्रिया अश्या विविध पैलूंवर उजाळा टाकण्यात आला.
 • यादरम्यान केल्या गेलेल्या शिफारसी – बांधकामासाठी लाकूडाला पर्याय स्वीकारण्याची गरज आहे. बांबूसारख्या पर्यायी सामग्रीचा वापर करणे आवश्यक आहे. 
 • भूदृष्य आणि फलोत्पादन या क्षेत्रामध्ये गुंतलेल्या व्यक्तींना नवीन तंत्रज्ञानाविषयी योग्य प्रशिक्षण देण्यात यावे. निरोगी आणि पौष्टिक आहारासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे.

Post a Comment

0 Comments