Daily Current Affiars 8 March 2019 in Marathi


आंतरराष्ट्रीय महिला दिन - 8 मार्च
 • 2019 करिता संकल्पना(Theme) - Think equal, build smart, innovate for change
 • UNO द्वारे साजरा
 • 1910 साली झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेपासून 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा
 • 2018 वर्षाची Theme - Time is Now: Rural and urban activists transforming women’s lives.


जीत’ प्रकल्प : क्षयरोगमुक्त महाराष्ट्र
 • राज्यातील १३ शहरांचा समावेश
 • 'जीत' प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त क्षयरुग्णांना वेळेवर व संपूर्ण उपचार घेण्यास प्रवृत्त करण्यात येणार आहे.
 • या उपक्रमात खासगी रुग्णालये तसेच शासकीय आरोग्य संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. 
 • टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथे 'राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम' अंतर्गत 'जीत' प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा पार पडला.


स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार -2019
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्लीत झाले पुरस्कारांचे वितरण हे सर्वेक्षण देशातील 4,237 शहरांमध्ये करण्यात आले. 28 दिवस डिजीटल पद्धतीने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणाचे निकाल राष्ट्रपतींनी जाहीर केले
स्वच्छ सर्वेक्षण 2019मध्ये :
 • पहिला क्रमांक --छत्तीसगडने, 
 • दुसरा क्रमांक-- झारखंडने 
 • तिसरा क्रमांक -- महाराष्ट्र

मध्य प्रदेशमधील इंदुरने देशातील सर्वात स्वच्छ शहराचा सन्मान मिळवला, इंदुरने हा मान सलग तीनवर्षापासून मिळवला
महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार : 
 • ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान’मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक 45 पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान मिळविले उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राला तिसरे स्थान मिळाले

रँकिंगमध्ये पहिल्या शंभरांत राज्यातील 24 शहरे खालीलप्रमाणे :  
नवी मुंबई (7), कोल्हापूर (16), मीरा-भाईंदर (27), चंद्रपूर (29), वर्धा (34), वसई-विरार (36), पुणे (37), लातूर (38), सातारा (45), पिंपरी-चिंचवड (52), उदगीर (53), सोलापूर (54), बार्शी (55), ठाणे (57), नागपूर (58), नांदेड-वाघाळा (60), नाशिक (67), अमरावती (74), जळगाव (76), कल्याण-डोंबिवली (77), पनवेल (86), अचलपूर (89), बीड (94) व यवतमाळ (96)
27 शहरे ठरली कचरामुक्त :  
मूल, वैजापूर, वसई विरार, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, खोपोली, जुन्नर, लोणावळा, सासवड, भोर, इंदापूर, संगमनेर, परळी, पंढरपूर, महाबळेश्वर, पाचगणी, रत्नागिरी, पन्हाळा, वडगाव, कोल्हापूर, विटा, तासगाव, कोरेगाव


गुरूग्राम: जगातले सर्वात प्रदूषित शहर
 • IQ एअरव्हिज्युअल्स अँड ग्रीन पीस संस्थेच्या अहवालानुसार जगातल्या प्रदूषित शहरांमध्ये गुरुग्राम (हरयाणा) हे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले.
 • प्रथम दहा प्रदूषित शहरे - गुरुग्राम (हरयाणा), गाझियाबाद (उत्तरप्रदेश), फैसलाबाद (पाकिस्तान), फरिदाबाद (हरयाणा), भिवाडी (राजस्थान), नोएडा (उत्तरप्रदेश), पटना (बिहार), होतान (चीन), लखनऊ (उत्तरप्रदेश), लाहोर (पाकिस्तान).

Post a Comment

0 Comments