Daily Current Affiars 31 March 2019 (चालू घडामोडी)


टाईम्सची उच्च शिक्षण विषयक जागतिक विद्यापीठाची क्रमवारी 2019
प्रथम 250 मध्ये एकही भारतीय संस्था नाही. जगातील प्रथम 5 संस्था (1238 विद्यापीठांपैकी)
 1. ऑक्सफर्ड विद्यापीठ
 2. केम्ब्रिज विद्यापीठ
 3. स्टॅनफोर्ड विद्यापीठ
 4. MIT विद्यापीठ , USA

 • भारतातील प्रथम विद्यापीठ - IISc बंगलोर (जगात 250-300 दरम्यान क्रमांक)
 • भारतात द्वितीय - IIT इंदोर (351-400)
 • तृतीय - IIT मुंबई (401 ते 500)
 • महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भारतात 9 व्या स्थानी व जगात 501-600 दरम्यान क्रमांक.


ताशिगंगमध्ये - जगातील सर्वात उंच ठिकाणी मतदान केंद्र
 • 15255 फूट उंचीवर मतदान केंद्र
 • 6 घरांची वस्ती
 • हिमाचल प्रदेशातील स्पिती खोऱ्यात
सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धा 2019
 • स्थळ - इपोह , मलेशिया
 • विजेता - कोरिया
 • उपविजेता - भारत
 • सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटवर
 • 4:2 असा


मर्सर संस्थेचा ‘क्वालिटी ऑफ लिव्हिंग (इंडिया) रॅंकिंग 2019’ अहवाल
 • मर्सर संस्थेचा ‘क्वालिटी ऑफ लिव्हिंग (इंडिया) रॅंकिंग 2019’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 • अहवालानुसार, सलग सातव्यांदा हैदराबाद (तेलंगणा) आणि पुणे (महाराष्ट्र) या शहरांनी भारतामधल्या शहरांच्या यादीत अग्रस्थान (संयुक्त) पटकावले आहे. 
 • व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) हे जगातले सर्वात जगण्यायोग्य शहर ठरले आहे. 
 • सलग दहाव्यांदाया शहराचे जीवनमान उच्च कोटीचे राहिले आहे.जागतिक पातळीवर हैदराबाद आणि पुणे या शहरांचा एकत्र 143 वा क्रमांक लागतो आहे.
 • वैयक्तिक सुरक्षेच्या बाबतीत, चेन्नई हे भारतासोबतच संपूर्ण आग्नेय आशियातले सर्वात सुरक्षित शहर ठरले. जगात त्याचा 105 वा क्रमांक आहे.
 • यंदाच्या अहवालाच्या 21 व्या आवृत्तीत जगभरातल्या शहरांच्या सर्वेक्षणात 231 शहरांचा समावेश करण्यात आला, ज्यात भारताच्या सात शहरांचा समावेश आहे.


नदीच्या पृष्ठभागावर वीज निर्मिती करण्याचा IIT रुडकीचा प्रयोग यशस्वी
 • नदीच्या पृष्ठभागावर वीज निर्मिती करण्याचा भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) रुडकीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
 • संशोधकांनी वाहत्या पाण्यावर तरंगणारे एक असे उपकरण तयार केले आहे, जे प्रवाहाच्या शक्तीचा वापर करून वीज निर्मिती करते. हा अक्षय ऊर्जेसाठी एक पर्यायी स्रोत ठरत आहे.
 • या उपकरणासाठी ‘हायड्रो-कायनेटिक’ तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. पाण्याचा प्रवाह वाहत्या वार्‍यापेक्षा शंभर पटीने अधिक ऊर्जा उत्पन्न करू शकते, असे संशोधनात आढळून आले आहे.
 • पारंपारिक जलविद्युत प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर धरणाची बांधणी करावी लागते, ज्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. या समस्येला एक पर्याय म्हणून नवे तंत्र विकसित करण्यावर भर दिला जात आहे.


हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांचे निधन
 • ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखिका कृ्ष्णा सोबती यांचे 26 मार्चला निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या.
 • स्त्रियांचे भावविश्व, वेदना, स्वाभिमान आपल्या साहित्यांतून सशक्तपणे मांडणाऱ्या साहित्यिका म्हणून ओळखल्या जात होत्या.
 • कृष्णा सोबती यांचा जन्म पाकिस्तानमधील एका गावात झाला. 1950 साली 'कहानी लामा' पासून त्यांनी आपल्या साहित्यिक प्रवासाला सुरुवात केली. 'मित्रो मरजानी', 'जिंदगीनामा', 'सूरजमुखी अंधेरे के', 'दिलो दानिश', 'समय सरगम' आदी साहित्यकृतींसाठी ओळखल्या जातात.
 • 'जिंदगीनामा'साठी 1980 साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर, 2017 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले. 
 • देशभरातल्या असहिष्णूतेच्या विरोधात 2015 साली आपला साहित्य अकादमी पुरस्कारदेखील परत केला होता. 
 • याशिवाय त्यांना पद्मभूषण, व्यास सम्मान, शलाका सम्मान या पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments