Daily Current Affiars 30 March 2019 (चालू घडामोडी)


मर्सर संस्थेचा ‘क्वालिटी ऑफ लिव्हिंग (इंडिया) रॅंकिंग 2019’ अहवाल
 • मर्सर संस्थेचा ‘क्वालिटी ऑफ लिव्हिंग (इंडिया) रॅंकिंग 2019’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 • अहवालानुसार, सलग सातव्यांदा हैदराबाद (तेलंगणा) आणि पुणे (महाराष्ट्र) या शहरांनी भारतामधल्या शहरांच्या यादीत अग्रस्थान (संयुक्त) पटकावले आहे. 
 • व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) हे जगातले सर्वात जगण्यायोग्य शहर ठरले आहे. सलग दहाव्यांदा या शहराचे जीवनमान उच्च कोटीचे राहिले आहे.
 • जागतिक पातळीवर हैदराबाद आणि पुणे या शहरांचा एकत्र 143 वा क्रमांक लागतो आहे.
 • वैयक्तिक सुरक्षेच्या बाबतीत, चेन्नई हे भारतासोबतच संपूर्ण आग्नेय आशियातले सर्वात सुरक्षित शहर ठरले. जगात त्याचा 105 वा क्रमांक आहे.
 • यंदाच्या अहवालाच्या 21 व्या आवृत्तीत जगभरातल्या शहरांच्या सर्वेक्षणात 231 शहरांचा समावेश करण्यात आला, ज्यात भारताच्या सात शहरांचा समावेश आहे.


कूर्ग अरेबिका कॉफी आणि अन्य चार कॉफी प्रकारांना GI टॅग
 • कूर्ग अरेबिका कॉफी तसेच वायनाद रोबस्टा कॉफी, चिकमगालूर अरेबिका कॉफी, अराकू व्हॅली अरेबिका कॉफी आणि बाबाबुदंगीरीस अरेबिका कॉफी अश्या पाच कृषी उत्पादनांना भौगोलिक खूण (GI) टॅग प्राप्त झाले आहे.  
 • कूर्ग अरेबिका कॉफी - कर्नाटक राज्याच्या कोडागू जिल्ह्यात. 
 • वायनाद रोबस्टा कॉफी - पश्चिम घाटाच्या वायनाद प्रदेशात 
 • चिकमगालूर अरेबिका कॉफी आणि बाबाबुदंगीरीस अरेबिका कॉफी - - कर्नाटकाच्या चिकमगालूर जिल्ह्यात. 
 • अराकू व्हॅली अरेबिका कॉफी - आंध्रप्रदेशाच्या विशाखापट्टनम जिल्ह्यात आणि ओडिशाच्या कोरापूट जिल्ह्यात.


अमर्त्य सेन यांना बोडली पदक
 • नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना ऑक्सफोर्डच्या जागतिक प्रसिद्ध बोडलेयन ग्रंथालयातील सर्वोच्च सन्मानित बोडली पदक देऊन गौरविण्यात आले आहे.
 • पदक अशा व्यक्तींना देण्यात आले आहे ज्यांनी बोडलेयन सक्रिय असलेल्या साहित्य, संस्कृती, विज्ञान आणि संप्रेषण क्षेत्रात उत्कृष्ट योगदान केले आहे.
 • अमर्त्य सेन 85 वर्षीय असून आर्थिक विज्ञानांतील नोबेल मेमोरियल पुरस्कार विजेते आहेत. हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आणि हार्वर्ड लॉ स्कूलमधील शिक्षक सदस्य आहेत.
 • अमर्त्य सेन एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांना कल्याणकारी अर्थशास्त्र आणि सामाजिक निवड सिद्धांत आणि गरीब सदस्यांच्या समस्या बाबत त्यांचे स्वारस्य बद्दल 1998 च्या आर्थिक विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते.


केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे Compressed बायोगॅस उत्पादन वाढवण्यासाठी - SATAT अभियान
 • SATAT - Sustainable Alternative Towards Affordable Transportation उद्देश
 •  देशातील Compressed बायोगॅस उत्पादन वाढवणे व पारंपारिक इंधनास पर्याय उपलब्ध करून देणे


ग्राहक किंमत निर्देशांकासाठीचे ‘आधारभूत वर्ष’ बदलण्यात आले.
 • 2019-20 या आर्थिक वर्षात नव्या ‘आधारभूत वर्ष’ सोबत सकल स्थानिक उत्पन्न (GDP) आणि ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) माहिती निश्चित करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे.
 • सध्या GDPसाठीचा आधारभूत वर्ष 2011-12 हा आहे आणि CPIसाठी 2012 हा वर्ष आहे. सुधारित आवश्यकतेनुसार आधारभूत वर्ष GDPसाठी 2017-18 आणि CPIसाठी 2018 असा पकडण्याची गरज असल्याने सरकारने हा निर्णय घेतला.
 • भारतात महागाईचे मोजमाप करण्यासाठी सर्वसाधारणपणे घाऊक किंमत निर्देशांक (RPI) आणि ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) असे दोन निर्देशांक वापरले जातात.
 • घाऊक किंमत निर्देशांक हा घाऊक बाजारपेठेतल्या वस्तूंच्या किंमतीवर किंवा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वस्तूंच्या व्यवहारांच्या किंमतीवर आधारित असतो तर ग्राहक किंमत निर्देशांक हा ग्राहक खरेदी करीत असलेल्या किंमतीवर किंवा किरकोळ स्वरूपाच्या होणाऱ्या व्यवहार ज्या किंमतीवर होतात, त्या किंमतीवरून निश्चित केला जातो.

Post a Comment

0 Comments