Daily Current Affiars 27 March 2019 (चालू घडामोडी)


यूपीएस मदान राज्याचे नवे मुख्य सचिव
 • राज्याच्या मुख्य सचिवपदी अखेर वित्त विभागाचे विद्यमान सचिव यूपीएस मदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांची लोकपाल सदस्य म्हणून राष्ट्रपतींकडून नियुक्ती झाल्याने मदान यांच्याकडे राज्याचं मुख्य सचिवपद सोपवण्यात आलं आहे. मदान हे जैन यांच्याच बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
 • राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून यूपीएस मदान आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची नावे सर्वात आघाडीवर होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून मेहता बाजी मारतील, असेही सांगितले जात होते. मात्र सेवाज्येष्ठतेनुसार मदान यांच्याकडे राज्याचं मुख्य सचिवपद आलं आहे.
 • मदान हे १९८३च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून सध्या ते वित्त विभागाचे सचिव होते. मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणात त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळलेली आहे.


युरोपीय संघाचा ‘PRISMA’ पृथ्वी-निरीक्षण उपग्रह
 • युरोपीय संघाने त्याच्या ‘वेगा’ अग्निबाणाच्या साहाय्याने इटालियन स्पेस एजन्सी या अंतराळ संस्थेसाठी पृथ्वीच्या कक्षेत ‘PRISMA’ नावाचा पृथ्वी-निरीक्षण उपग्रह पाठवला आहे.
 • उपग्रह PRISMA (हायपरस्पेक्ट्रल प्रीकर्सर ऑफ द अॅप्लिकेशन मिशन) उपग्रह हा पर्यावरणविषयक देखरेख, स्त्रोतांचे व्यवस्थापन, प्रदूषण आणि पीकांचे आरोग्य याविषयी माहिती प्रदान करण्यासाठी तयार केला गेला आहे.


मनु सोहनी: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन CEO
 • दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी मनु सोहनी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 • ICCचे विद्यमान CEO डेव्हिड रिचर्डसन हे इंग्लंडमध्ये होणार्‍या ICC विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर म्हणजेच जुलै 2019 या महिन्यात निवृत्त होत आहेत. मनु सोहनी हे व्यवसायिक प्रसार माध्यम क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती म्हणून ओळखली जाते.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) हे क्रिकेट खेळासाठीचे आंतरराष्ट्रीय व्
 • यवस्थापक मंडळ आहे. सन 1990 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या प्रतिनिधींनी ICC ची ‘इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स’ या नावाने स्थापना केली होती आणि सन 1989 मध्ये याला वर्तमान नाव प्राप्त झाले.
 • ICC चे मुख्यालय संयुक्त अरब अमिरात (UAE) देशाच्या दुबई शहरात आहे. ICCचे 105 सदस्य संघ आहेत आणि त्यात 12 पूर्ण सदस्य आहेत, जे कसोटी सामने खेळतात.
 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) दर चार वर्षांनी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन करते.


भारत आणि इंडोनेशिया यांचा ‘इंड-इंडो कॉर्पेट 2019’ गस्त कार्यक्रम
 • भारत आणि इंडोनेशिया यांच्या नौदलांचा ‘इंड-इंडो कॉर्पेट 2019’ नावाचा सागरी गस्त कार्यक्रम 19 मार्च ते 4 एप्रिल या काळात आयोजित करण्यात आला. या वार्षिक कार्यक्रमाची ही 33 वी आवृत्ती आहे.
 • इंड-इंडो कोऑर्डिनेटेड पेट्रोल (CORPAT) हा भारत आणि इंडोनेशिया यांचा कार्यक्रम आहे. यावर्षी पोर्ट ब्लेअर (अंदमान व निकोबार बेट) येथे हा सागरी कार्यक्रम चालवला जात आहे.
 • दोन्ही देशांची जहाजे आणि विमाने 236 नॉटिकल मैलांच्या आंतरराष्ट्रीय समुद्री सीमेवर संबंधित बाजूंवर गस्त घालतील. 22 मार्च ते 31 मार्च या काळात तीन टप्प्यांमध्ये ही गस्त घालण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात इंडोनेशियाच्या बेलवाना येथे समारोप होईल.
 • इंडोनेशिया (दिपांतर प्रजासत्ताक) आग्नेय आशिया आणि ओशिनिया येथील एक देश आहे. हा 17508 बेटांचा राष्ट्र आहे आणि सुमारे 109 कोटी लोकसंख्येसह जगातला तिसरा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. जकार्ता हे देशाचे राजधानी शहर आहे आणि इंडोनेशियाई रुपिया हे राष्ट्रीय चलन आहे.


सुपरस्टॅट्स’: ESPN द्वारे क्रिकेटसाठी तयार केलेले नवीन मेट्रिक्स
 • ‘ESPN क्रिकइन्फो’ या क्रिडाविषयक डिजिटल बातमीपत्राने ‘सुपरस्टॅट्स’ या नावाने क्रिकेटला समर्पित असलेल्या नव्या एकात्मिक मॅट्रिक्सचे अनावरण केले.
 • IIT मद्रासच्या सहकार्याने खेळाविषयी टाकलेल्या प्रत्येक चेंडूची माहिती तसेच आयोजित केल्या जाणार्या प्रत्येक कार्यक्रमाविषयी माहिती गोळा करण्यासाठी आणि ती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या तंत्रावर आधारित असलेली ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.
 • IIT मद्रास या संस्थेची ‘ज्ञान डेटा प्राय. लिमिटेड’ ही संगोपन कंपनी या प्रकल्पाची भागीदार आहे. ‘सुपरस्टॅट्स’चे तीन मॅट्रिक आहेत – “लक इंडेक्स, फोरकास्टर आणि स्मार्ट स्टॅट्स”, जे संपूर्ण माहिती प्रदान करणार.

Post a Comment

0 Comments