Daily Current Affiars 26 March 2019 (चालू घडामोडी)


अमेरिकेच्या गणितज्ञ कॅरेन उलेनबेक यांना गणिताचा एबल पारितोषिक
 • संयुक्त राज्ये अमेरिकेच्या गणितज्ञ आणि शिक्षीका कॅरेन उलेनबेक यांना 2019 सालाचा गणित विषयातला प्रतिष्ठित एबल पारितोषिक जाहीर झाला आहे.
 • हा सन्मान प्राप्त करणारी ती प्रथम स्त्री आहे.
 • आंशिक विभेद (Partial Differential) समीकरणाच्या बाबतीत केलेल्या कामासाठी कॅरेन उलेनबेक यांना हा पुरस्कार दिला गेला. 
 • जियोमॅट्रिक अनॅलिसिस आणि गेज सिद्धांत या विषयात 40 वर्षापासून त्या काम करीत आहेत.
 • त्यांनी मांडलेल्या सिद्धांतांनी साबणामुळे तयार होणार्या बुडबुड्यांच्या पृष्ठभागाप्रमाणे असलेल्या किमान पृष्ठभागाला समजून घेण्यासाठी तसेच उच्च आयामांमध्ये अधिक जनरल मिनिमायझेशन समस्यांविषयी आपली समज वाढविण्यासाठी क्रांती केली.


भारताच्या प्रथम वन प्रमाणपत्र योजनेला जागतिक मान्यता मिळाली
 • जिनेव्हा येथील काऊंसिल ऑफ प्रोग्राम फॉर एंडोर्समेंट ऑफ फॉरेस्ट सर्टिफिकेशन (PEFC) या ना-नफा संस्थेकडून शाश्वत वन व्यवस्थापन संदर्भात प्रमाणता मानक (Certification Standard for Sustainable Forest Management -SFM) या भारताच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. 
 • काऊंसिल ऑफ प्रोग्राम फॉर एंडोर्समेंट ऑफ फॉरेस्ट सर्टिफिकेशन (PEFC) या ना-नफा संस्थेकडून शाश्वत वन व्यवस्थापन संदर्भात स्वतंत्र तृतीय-पक्ष प्रमाणपत्र दिले जाते.


भारताने सलग पाचव्यांदा SAFF महिला फुटबॉल स्पर्धा जिंकली
 • नेपाळमध्ये ‘SAFF महिला फुटबॉल अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेचे जेतेपद भारताने जिंकले आहे.
 • स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान नेपाळचा पराभव करून सलग पाचव्यांदा जेतेपद पटकावले.
 • दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (SAFF) या क्रिडासंस्थेची स्थापना 1997 साली झाली. बांग्लादेश, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघाचे संस्थापक सदस्य आहेत. 
 • पुढे भुटान (2000) आणि अफगाणिस्तान (2005) यात सामील झालेत.


देशात सर्वाधिक दान करणारे उद्योजक
देशात सर्वाधिक दान करणाऱ्यांच्या यादीत मुकेश अंबानी प्रथम क्रमांकावर आहेत.
 • मुकेश अंबानी (रिलायन्स इंडस्ट्रीज):- ४३७ कोटी रुपये
 • अजय पिरामल (पिरामल समूह):- २०० कोटी रुपये
 • अझीम प्रेमजी (विप्रो):- ११३ कोटी रुपये
 • आदि गोदरेज (गोदरेज समूह):- ९६ कोटी रुपये
 • युसूफ अली एम ए (लूलू समूह) ७० कोटी रुपये


जागतिक शिक्षक पुरस्कार 2019
 • केनिया देशातील - विज्ञान विषयाचे पीटर तबीची यांना - जागतिक शिक्षक पुरस्कार 2019 जाहीर
 • जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षकास हा पुरस्कार दिला जातो.
 • पीटर हे केनियातील केरिको स्कुलमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र विषयाचे शिक्षक आहेत.
 • 2015 पासून 'Global Teacher Prize' हा पुरस्कार अमेरिकेतील Varkey Foundation द्वारे दिला जातो.
  पुरस्कार स्वरूप - 1 दशलक्ष अमेरिकन डॉलर


युरोपीय संघाचा ‘PRISMA’ पृथ्वी-निरीक्षण उपग्रह
 • युरोपीय संघाने त्याच्या ‘वेगा’ अग्निबाणाच्या साहाय्याने इटालियन स्पेस एजन्सी या अंतराळ संस्थेसाठी पृथ्वीच्या कक्षेत ‘PRISMA’ नावाचा पृथ्वी-निरीक्षण उपग्रह पाठवला आहे. 
 • PRISMA (हायपरस्पेक्ट्रल प्रीकर्सर ऑफ द अॅप्लिकेशन मिशन) उपग्रह हा पर्यावरणविषयक देखरेख, स्त्रोतांचे व्यवस्थापन, प्रदूषण आणि पीकांचे आरोग्य याविषयी माहिती प्रदान करण्यासाठी तयार केला गेला आहे.

Post a Comment

0 Comments