Daily Current Affiars 25 March 2019 (चालू घडामोडी)


मित्र शक्ती-6 : भारत आणि श्रीलंका यांचा संयुक्त लष्करी सराव
 • भारत आणि श्रीलंका यांचा ‘मित्र शक्ती-6” हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जाणार आहे. 2018-19 या वर्षासाठी 26 मार्च ते 8 एप्रिल या काळात श्रीलंकेत हा संयुक्त लष्करी सराव होणार आहे.
 • दोन्ही देशाच्या लष्करांच्या दरम्यान लष्करी संबंध आणि देवाणघेवाण यांचा एक भाग म्हणून दरवर्षी ‘मित्र शक्ती’ लष्करी सराव दरवर्षी आयोजित केला जातो.
 • दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आदेशानुसार आंतरराष्ट्रीय घुसखोरीला आळा घालण्यासाठी तसेच दहशतवादाचा सामना करण्यासाठी डावपेचात्मक कारवाईचा यात समावेश असेल.
 • श्रीलंका हा हिंद महासागरातला भारताच्या दक्षिणेकडे असणारा एक बेटराष्ट्र आहे. कोलंबो ही देशाची राजधानी असून श्रीलंकाई रुपया हे त्याचे राष्ट्रीय चलन आहे.


भौगोलिक आफ्रिका खंड
 • आफ्रिका हा आकाराने आणि लोकसंख्येने आशियानंतर क्रमांक दोनचा भौगोलिक खंड आहे. 
 • हा खंड पृथ्वीचा 6% पृष्ठभाग व्यापतो. मादागास्कर आणि इतर बेटांचे समुह मिळून खंडात एकूण 56 सार्वभौम देश आणि दोन मान्यता नसलेले देश आहेत.
 • आफ्रिकेच्या उत्तरेला भूमध्य समुद्र, ईशान्येला सुएझ कालवा, लाल समुद्र आणि सिनाई बेटे आहेत. 
 • आग्नेयेला हिंदी महासागर आणि पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. 
 • विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला हा खंड आहे. उत्तर आणि दक्षिण दोन्ही उष्ण कटिबंध प्रदेशांना सामावणारा आफ्रिका हा एकमेव खंड आहे.


भारतीय निर्यात-आयात बँक (EXIM बँक)
 • ही भारतातली निर्यात-आयात संबंधी प्रमुख वित्त संस्था आहे.
 • ज्याची 1982 साली ‘EXIM बँक अधिनियम-1981’ अंतर्गत स्थापना झाली. 
 • ही भारताचा आंतर्देशीय व्यवहार आणि गुंतवणूक यांना प्रोत्साहन देण्यामध्ये मुख्य भूमिका वठवते. 
 • त्याचे मुख्यालय मुंबई (महाराष्ट्र, भारत) येथे आहे.


दिल्लीत पोलाद मंत्रालयाची ‘दक्षता परिषद’ संपन्न झाली
 • 20 मार्च 2019 रोजी नवी दिल्लीत भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयाने आयोजित केलेली ‘दक्षता परिषद’ पार पडली. 
 • अधिग्रहण, करार, कर्मचारी आणि वित्त यासह विविध कार्यांच्या संबंधित महत्त्वाचे प्रशासकीय आणि व्यवसायिक निर्णय घेताना अनुसरण केली जाणारी मूलभूत तत्त्वे आणि प्रक्रियांच्या बाबतीत पोलाद निर्मिती क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक उपक्रमांच्या अधिकार्‍यांना संवेदनशील बनविण्याचा या परिषदेचा उद्देश होता.
 • परिषदेत दक्षतेसंबंधी मूलभूत मुद्दे, सार्वजनिक खरेदीसंबंधी नियम आणि नियमांचे पालन करणे, निविदा प्रक्रियेत पारदर्शकता, इलेक्ट्रॉनिक खरेदी, GeM, GFR, इलेक्ट्रॉनिक लिलाव, शासनातली नैतिकता, तक्रारीसंबंधी हाताळणी प्रणाली आणि इतर बाबी अश्या मूलभूत मुद्द्यांवर चर्चा झाली.


राज्यातील १ लाख सर्व्हिस वोटर्सपर्यंत पोहोचणार ईटीपीबीएस मतपत्रिका
 • लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस दलातील जवान (सर्व्हिस वोटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमीत्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी भारत निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम (ईटीपीबीएस) उपलब्ध करून दिली आहे. 
 • राज्यात आतापर्यंत १ लाख ८ हजारहून अधिक सर्व्हिस वोटर्सची नोंद झाली असून त्यांच्यापर्यंत इलेक्ट्रॉनिकरित्या मतपत्रिका पोहोचवल्या जाणार आहेत.


नुरसुलतान : कझाकीस्तानच्या राजधानीचे नवे नाव
 • कझाकीस्तानचे राजधानी शहर असलेल्या ‘अस्ताना’ याचे नाव बदलून ‘नुरसुलतान’ असे नामकरण करण्यात आले आहे. ‘नुरसुलतान’ या शब्दाचा अर्थ कझाक भाषेत "प्रकाशाचा राजा" असा होतो.
 • अंतरिम राष्ट्रपती कासीम-जोमर्त तोकाएव्ह यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी संसदेत मांडलेल्या प्रस्तावाला काही तासाभरातच मंजूर करण्यात आले.
 • कझाकीस्तान हा एक मध्य आशियाई देश आणि माजी सोवियत प्रजासत्ताक आहे. या देशाची राजधानी नुरसुलतान (पूर्वीचे अस्ताना) हे शहर आहे आणि कझाकस्तानी टेंगे हे चलन आहे.


युरोपीय संघाच ‘PRISMA’ पृथ्वी-निरीक्षण उपग्रह
 • युरोपीय संघाने त्याच्या ‘वेगा’ अग्निबाणाच्या साहाय्याने इटालियन स्पेस एजन्सी या अंतराळ संस्थेसाठी पृथ्वीच्या कक्षेत ‘PRISMA’ नावाचा पृथ्वी-निरीक्षण उपग्रह पाठवला आहे.
 • PRISMA (हायपरस्पेक्ट्रल प्रीकर्सर ऑफ द अॅप्लिकेशन मिशन) उपग्रह हा पर्यावरणविषयक देखरेख, स्त्रोतांचे व्यवस्थापन, प्रदूषण आणि पीकांचे आरोग्य याविषयी माहिती प्रदान करण्यासाठी तयार केला गेला.

Post a Comment

0 Comments