Daily Current Affiars 24 March 2019 (चालू घडामोडी)

LIMA प्रदर्शनी 2019’ यात भारतीय हवाई दल सहभागी होणार


Indian Air Force will participate in LIMA exhibition 2019 MPSCKIDA
Indian Air Force will participate in LIMA exhibition 2019 MPSCKIDA
 • 26 ते 30 मार्च या काळात मलेशियात ‘लांगकावी आंतरराष्ट्रीय सागरी व हवाई प्रदर्शनी (LIMA 2019)’ भरविण्यात येणार आहे.
 • भारतीय हवाई दल प्रथमच या सागरी हवाई प्रदर्शनीत सहभागी होणार असून, स्वदेशी विकसित ‘तेजस’ ही वजनानी हलकी लढाऊ विमाने (LCA) येथे प्रदर्शित केले जाणार आहे.
 • या प्रदर्शनीत सहभागी झाल्यामुळे भारतीय हवाई दलाला रॉयल मलेशियन एयर फोर्स समवेत संवाद साधण्यासाठी आणि दोन्ही देशातल्या हवाई दलात अधिक घनिष्ट संबंध निर्माण करण्यासाठी संधी मिळणार आहे.
 • ‘लांगकावी आंतरराष्ट्रीय सागरी व हवाई प्रदर्शनी (LIMA)’ ही एक सागरी व हवाई प्रदर्शनी आहे, जी मलेशियाच्या लांगकावी शहरात दर दोन वर्षांनी एकदा भरविण्यात येते. 1991 साली पहिल्यांदा ही प्रदर्शनी भरविण्यात आली. 
 • हा कार्यक्रम आशिया-प्रशांत क्षेत्रात भरविण्यात येणार्या सर्वात मोठ्या सागरी आणि हवाई प्रदर्शनींपैकी एक आहे.


ग्राहक किंमत निर्देशांकसाठीचे ‘आधारभूत वर्ष’ बदलण्यात आले
 • 2019-20 या आर्थिक वर्षात नव्या ‘आधारभूत वर्ष’ सोबत सकल स्थानिक उत्पन्न (GDP) आणि ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) माहिती निश्चित करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे.
 • सध्या GDPसाठीचा आधारभूत वर्ष 2011-12 हा आहे आणि CPIसाठी 2012 हा वर्ष आहे. सुधारित आवश्यकतेनुसार आधारभूत वर्ष GDPसाठी 2017-18 आणि CPIसाठी 2018 असा पकडण्याची गरज असल्याने सरकारने हा निर्णय घेतला.
  भारतात महागाईचे मोजमाप करण्यासाठी सर्वसाधारणपणे घाऊक किंमत निर्देशांक (RPI) आणि ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) असे दोन निर्देशांक वापरले जातात. 
 • घाऊक किंमत निर्देशांक हा घाऊक बाजारपेठेतल्या वस्तूंच्या किंमतीवर किंवा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वस्तूंच्या व्यवहारांच्या किंमतीवर आधारित असतो तर ग्राहक किंमत निर्देशांक हा ग्राहक खरेदी करीत असलेल्या किंमतीवर किंवा किरकोळ स्वरूपाच्या होणाऱ्या व्यवहार ज्या किंमतीवर होतात, त्या किंमतीवरून निश्चित केला जातो. 
 • देशाच्या आर्थिक स्थितीत होणार्या बदलांमुळे सुधारित मूल्यांकनासाठी आणि कार्यात फेरबदल करण्यासाठी दर पाच वर्षांमध्ये एकदा आधारभू


ब्रेक्झिटसाठी आता ब्रिटनपुढे दोन पर्याय, विलंबाची शक्यता
 • ब्रिटनला युरोपीय समुदायातून काडीमोड घेण्यासाठीच्या माघारी करारावर युरोपीय नेत्यांनी दोन पर्याय दिले आहेत. त्यात योग्य पद्धतीने ब्रेक्झिटसाठी ब्रिटनला काहीसा उशीर झाला तरी चालेल यावर पंतप्रधान थेरेसा मे व युरोपीय नेत्यांच्याचर्चेत मतैक्य झाले आहे.
 • ब्रिटनसमोर आता युरोपीय समुदायातून बाहेर पडण्यासाठी २९ मार्चची कालमर्यादा आहे, पण युरोपीय समुदायातील सहकाऱ्यांनी सांगितले की, ब्रिटीश खासदार जर माघारी कराराला पुढीलआठवडय़ात मान्यता देण्यास तयार असतील.
 • २२ मे पर्यंत मुदत वाढवून देण्याची युरोपीय समुदायाची तयारी आहे, पण जर हाऊस ऑफ कॉमन्सने माघारीबाबतचा समझोता करार फेटाळला तर १२ एप्रिलला ब्रेक्झिट करावे लागेल पण त्यासाठी युरोपीय समुदायाच्या संसदीय निवडणुकात सहभागी व्हायचे का नाही याचा निर्णय ब्रिटनला घ्यावा लागणार आहे.
 • युरोपीय समुदाय मंडळाचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी सांगितले की, १२ एप्रिल ही ब्रिटनसाठी महत्त्वाची कालमर्यादा आहे. त्यात त्यांनी निवडणुकीत सहभागी व्हायचे कीनाही याचा निर्णय घ्यायचा आहे.
 • २३ ते २६ मे दरम्यान या निवडणुका होणार असून त्यात सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय घेण्यास ब्रिटनला काही काळ लागणार आहे. युरोपीय समुदायातून बाहेर पडण्यासाठी मतदान केल्यानंतर तीन वर्षांनी लोकांना युरोपीय संसदेच्या निवडणुकीसाठी मतदान करायला लावणे मला योग्य वाटत नाही असे मत पंतप्रधान थेरेसा मे यांनी व्यक्त केले आहे.


१४२ वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये बदल, खेळाडूंच्या पोशाखावर नाव आणि नंबर
 • कसोटी क्रिकेट हा अजुनही अनेक चाहत्यांसाठीआस्थेचा विषय आहे. वन-डे आणि टी-२० क्रिकेटच्या जमान्यात कसोटी क्रिकेट तग धरेल का असा सवाल आपण अनेक वर्ष ऐकत आहोत. मात्र आता कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल १४२ वर्षांनी एक बदल होण्याची शक्यता आहे. 
 • लवकरचकसोटी क्रिकेटच्या पांढऱ्या पोशाखावर आता खेळाडूंचे क्रमांक आणि नावं येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 • १८७७ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात खेळाडूंच्या पोशाखावर नाव आणि क्रमांक टाकले होते. मात्रयानंतर आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये एकच पद्धत चालत आलेली आहे. 
 • २०१९ साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या Ashes कसोटी मालिकेने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होते आहे. कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षकांचा ओढा वाढावा यासाठी या बदलाची शिफारस आयसीसीकडे करण्यातआलेली आहे.
 • कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या पोशाखावर त्याचं नाव लिहीलेलं नसल्यामुळे अनेकदा सामन्यादरम्यान, त्यांना ओळखण कठीण होऊन बसतं.


व्ही. करमबीर सिंह होणार नवे नौदल प्रमुख
 • पूर्व नौदल कमांडचे सध्याचे कमांडर व्हाइस अॅडमिरल व्ही. करमबीर सिंह नवे नौदल प्रमुख होणार आहेत.
 • ३१ मे रोजी विद्यमान नौदल प्रमुख सुनील लांबा निवृत्त होणार असून, त्याच दिवशी करमबीर सिंह पदभार स्वीकारणार आहेत. करमबीर सिंह सध्या विशाखापट्टनम येथे पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. 
 • १९८० मध्ये त्यांनी नौदलात आपली सेवा बजावण्यात सुरुवात केली. १९८२ मध्ये ते वैमानिक बनले. चेतक आणि कामोव हेलिकॉप्टर उड्डाणाचा त्यांचा अनुभव दाणगा आहे. नौदलातील आपल्या ३९ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
 • पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यानंतर पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी नौदल सज्ज होते. 
 • दहशतवादाचे बदलते स्वरूप पाहता समुद्रीमार्गानेही हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काळात समुद्र सीमांचे संरक्षण हे करमबीर सिंह यांच्यापुढे आव्हान असणार आहे.


कर्टन रेजर: भारत-श्रीलंका संयुक्त लष्करी सराव ‘मित्र शक्ती-6’
 • भारत आणि श्रीलंका लष्करांच्या दरम्यान लष्करी संबंध आणि देवाणघेवाण यांचा एक भाग म्हणून दरवर्षी मित्र शक्ती लष्करी सराव दरवर्षी घेतला जातो. 
 • 2018-19 या वर्षासाठी 26 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान श्रीलंका येथे हा संयुक्त लष्करी सराव होणार आहे. भारतीय लष्करातील बिहार रेजिमेंटची पहिली पलटण आणि श्रीलंका लष्करातील जेमुनू वॉच बटालियन यात सहभागी होणार आहेत.
 • दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये घट्ट संबंध निर्माण व्हावे यासाठी हा अभ्यास घेण्यात येतो. संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार आंतरराष्ट्रीय घुसखोरीला आळा घालण्यासाठी तसेच दहशतवादाचा सामना करण्यासाठी डावपेचात्मक कारवाईचा यात समावेश असेल.


हायाबुसा-2’: जपानचे अंतराळयान
 • ‘हायाबुसा-2’ हे JAXA या जपानी अंतराळ संस्थेद्वारे संचालित केले जाणारे अंतराळयान आहे. ‘हायाबुसा-2’ यान 3 डिसेंबर 2014 रोजी अंतराळात पाठविण्यात आले. हे यान दीड वर्षाच्या कालावधीसाठी लघुग्रहाच्या निरीक्षणासाठी पाठवले होते.
 • या अंतराळयानावर असलेले 'रोव्हर' ‘Ryugu’ या नावाच्या अशनीवर उतरविण्यात आले. अशनीवर यान उतरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. लघुग्रहाच्या पृष्ठभागाची तपासणी करण्याच्या उद्देशाने हे यान पाठविण्यात आले आहे.
 • लघुग्रहावरील माती आणि खडकाचे नमुने गोळा केले. लघुग्रहाच्या पृष्ठभागावरील एका विवरात स्फोट घडवून आणि त्यातून माती आणि खडकाचे नमुने गोळा केले गेले.


CBIC कडून परकीय चलनाचे नवे विनिमय दर अधिसूचित
 • ‘सीमा शुल्क अधिनियम-1962’ याच्या कलम क्र. 14 अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करीत केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने (CBIC) अनुसूची-I आणि अनुसूची-II यामध्ये स्पष्ट केलेल्या प्रत्येक परकीय चलनाचे (ज्यांचा उल्लेख स्तंभ (2) मध्ये केला गेला आहे) नवे विनिमय दर ठरविले आहेत.
 • नवे विनिमय दर आयात आणि निर्यात केल्या जाणार्या वस्तूंच्या संदर्भात स्तंभ (3) मध्ये केल्या गेलेल्या संबंधित नोंदणीनुसार दि. 21 मार्च 2019 पासून लागू केले जातील.

Post a Comment

0 Comments