Daily Current Affiars 20 March 2019 (चालू घडामोडी)


मनु सोहनी: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन CEO
 • दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी मनु सोहनी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 • ICCचे विद्यमान CEO डेव्हिड रिचर्डसन हे इंग्लंडमध्ये होणार्‍या ICC विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर म्हणजेच जुलै 2019 या महिन्यात निवृत्त होत आहेत. मनु सोहनी हे व्यवसायिक प्रसार माध्यम क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती म्हणून ओळखली जाते.
 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) हे क्रिकेट खेळासाठीचे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापक मंडळ आहे. सन 1990 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या प्रतिनिधींनी ICC ची ‘इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स’ या नावाने स्थापना केली होती आणि सन 1989 मध्ये याला वर्तमान नाव प्राप्त झाले.
 • ICC चे मुख्यालय संयुक्त अरब अमिरात (UAE) देशाच्या दुबई शहरात आहे. ICCचे 105 सदस्य संघ आहेत आणि त्यात 12 पूर्ण सदस्य आहेत, जे कसोटी सामने खेळतात.
 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) दर चार वर्षांनी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन करते. 1975 साली सर्वप्रथम एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आले.


मर्सर संस्थेचा ‘क्वालिटी ऑफ लिव्हिंग (इंडिया) रॅंकिंग 2019’ अहवाल
 • मर्सर संस्थेचा ‘क्वालिटी ऑफ लिव्हिंग (इंडिया) रॅंकिंग 2019’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. 
 • अहवालानुसार, सलग सातव्यांदा हैदराबाद (तेलंगणा) आणि पुणे (महाराष्ट्र) या शहरांनी भारतामधल्या शहरांच्या यादीत अग्रस्थान (संयुक्त) पटकावले आहे.
 • व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) हे जगातले सर्वात जगण्यायोग्य शहर ठरले आहे. सलग दहाव्यांदा या शहराचे जीवनमान उच्च कोटीचे राहिले आहे.
 • जागतिक पातळीवर हैदराबाद आणि पुणे या शहरांचा एकत्र 143 वा क्रमांक लागतो आहे.
 • वैयक्तिक सुरक्षेच्या बाबतीत, चेन्नई हे भारतासोबतच संपूर्ण आग्नेय आशियातले सर्वात सुरक्षित शहर ठरले. जगात त्याचा 105 वा क्रमांक आहे.
 • यंदाच्या अहवालाच्या 21 व्या आवृत्तीत जगभरातल्या शहरांच्या सर्वेक्षणात 231 शहरांचा समावेश करण्यात आला, ज्यात भारताच्या सात शहरांचा समावेश आहे.


BEEचा ‘अनलॉकिंग नॅशनल एनर्जी एफिशिएंसी पोटेन्शियल’ (UNNATEE) कार्यक्रम
 • भारतात ऊर्जा कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी ऊर्जा कार्यक्षमता विभागाने (BEE) राष्ट्रीय धोरण विकसित केले आहे.
 • ऊर्जा पुरवठा-मागणी परिस्थिती आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या संधी यांच्यादरम्यान स्वच्छ दुवे स्थापित करण्यासाठी त्यासंबंधी कार्यचौकट आणि अंमलबजावणीबाबतचे धोरण स्पष्ट करण्यात आले आहे.
 • या दस्तऐवजात विविध उपायांद्वारे पर्यावरणविषयक आणि हवामानातले बदल कमी करण्याच्या भारताच्या कृतींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
 • BEE बाबत ऊर्जा कार्यक्षमता विभाग (Bureau of Energy Efficiency) ही मार्च 2002 मध्ये स्थापना झालेली भारत सरकारच्या वीज मंत्रालयाची एक संस्था आहे. अर्थव्यवस्थेतली ऊर्जा मागणीतली तीव्रता कमी करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.


केरळमध्ये पश्चिमी नील विषाणू (WNV) रोगाची प्रकरणे आढळून आली
 • केरळ राज्यात मलप्पुरम येथे मच्छरांमुळे होणार्‍या पश्चिमी नील विषाणू (West Nile virus -WNV) या रोगाची प्रकरणे आढळून आली आहेत.
 • पश्चिमी नील विषाणू हा एक संक्रामक रोग आहे, जो पहिल्यांदा 1937 साली युगांडाच्या पश्चिम नील जिल्ह्यात आढळून आला. आता आफ्रिका, युरोप आणि आशियातही या विषाणूचा प्रसार झाला. 1952 साली भारतात पहिल्यांदा याचे प्रकरण आढळून आले.
 • हा रोग मच्छरांमुळे होतो. आजारात ताप, डोकेदुखी अशी सामान्य लक्षणे दिसून येतात, मात्र हा मृत्यूस कारणीभूत ठरू शकतो. या रोगावर कोणतीही विशेष लस वा उपचार नाही.


अझीम प्रेमजींनी धर्मादाय निधीत दिले ५२ हजार कोटी
 • आयटी क्षेत्रातील विप्रो लिमिटेड या प्रख्यात कंपनीचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी कंपनीचे त्यांच्या मालकीचे आणखी तब्बल ५२ हजार ७५० कोटी रुपयांचे शेअर धर्मादाय कामासाठी दान करण्याचे ठरविले आहे.
 • प्रेमजी यांच्या दानातून धर्मादाय कामे करणाऱ्या अझीम प्रेमजी फाउंडेशनने बुधवारी ही माहिती देताना निवेदनात म्हटले, की अझीम प्रेमजी यांच्या या नव्या दानामुळे फाउंडेशनच्या गंगाजळीत त्यांचे एकूण योगदान आता १.४५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 
 • अशा प्रकारे प्रेमजी यांनी विप्रो कंपनीची त्यांच्याकडे असलेली ७३ टक्के मालकी धर्मादाय कामांकडे वळविली आहे.
 • अझीम प्रेमजी फाउंडेशन बहुवार्षिक अनुदान देऊन शिक्षणाची सोय नसलेल्या ठिकाणी ते उपलब्ध करण्याचे व असलेल्या सोयी अधिक सुधारण्याचे काम करते. सध्या देशाच्या १० राज्यांमध्ये फाउंडेशनचे हे काम सुरू आहे.
 •  नव्या निधीमुळे बंगळुरू येथील अझीम प्रेमजी विद्यापीठाचा अधिक विस्तार करून पाच हजार अधिक विद्यार्थी व ४०० नव्या अध्यापकांची तेथे सोय करता येईल. याखेरीज समाजातील शोषित वर्गांसाठी काम करणाऱ्या सुमारे १५० स्वयंसेवी संस्थांनाही हे फाउंडेशन मदत करते.


स्वदेशी कमी वजनाच्या रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी यशस्वी
 • स्वदेशात विकसित केलेल्या हाताळण्यास सोपे अश्या कमी वजनाच्या रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची (MPATGM) संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (DRDO) राजस्थानमधल्या वाळवंटात 14 मार्चला दुसरी यशस्वी चाचणी घेतली.
 • यामध्ये ‘इमेजिंग इन्फ्रारेड रडार’ याचा वापर करण्यात आला आहे. या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 13 मार्चला झाली होती. या दोनही चाचण्यांदरम्यान क्षेपणास्त्राने नियोजित लक्ष्याचा अचूक भेद घेतला.
 • संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) ही भारताच्या संरक्षण क्षेत्रात संशोधनासाठी समर्पित असलेली प्रमुख संस्था आहे. त्याची स्थापना 1958 साली करण्यात आली आणि मुख्यालय नवी दिल्लीत आहे.

Post a Comment

0 Comments