loading...

Daily Current Affiars 2 March 2019 in Marathi

loading...
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात परतले,देशात एकच विजयी जल्लोष

Abhinandan Back to india
Abhinandan Back to india
 • भारतीय हवाई दलाच्या विमानांनी मंगळवारी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी तळावर हवाई हल्ला करत उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी दिनांक 27 फेब्रुवारीला सकाळी भारतात घुसखोरी केली होती.
 • पाकच्या विमानांना सडेतोड उत्तर देताना मिग-21चे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकच्या हद्दीत शिरले होते.तेव्हापासुन ते पाकिस्तानच्या लष्कराच्या ताब्यात होते.
 • त्यानंतर भारताने केलेल्या दबाव यंत्राणाखाली झुकत आज अखेर पाकिस्तानने अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे सुपूर्द केलं आहे.
 • विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाकिस्तानामधून भारतात आले आहेत.सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाकने अभिनंदन यांना भारताच्या लष्करी दलांकडे स्वाधीन केलेय.
 • हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि अभिनंदन यांच्या आई-वडिलांनी अटारी बॉर्डरवर हजर राहून त्याचं भारतात स्वागत केले आहे.अभिनंदन वर्धमान यांना इस्मालाबादहून लाहोरमार्गे वाघा बॉर्डरवर आणले गेले असून, त्यांना आता अमृतसरमार्गे दिल्ली येथे घेऊन जाण्यात येणार आहेत.


केसरी नंदनमध्ये झळकणार मेरी कोम
 • कलर्सची प्रोत्साहनपर कहाणी असलेल्या केसरी नंदनमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगपटू मेरीकोम पाहुण्या कलाकार म्हणून झळकणार आहेत. 
 • मेरी कोम केसरीच्या आयुष्यात एक मसीहा बनून अवतरणार असून त्या केसरीला तिचे कुस्तीपटू बनण्याचे स्वप्न साकार करण्याबरोबरच समाजाची पर्वा न करण्याचा सल्ला देणार आहेत. 
 • या कार्यक्रमाविषयी मेरी कोम म्हणाल्या,'केसरी नंदन हा शो तरूण मुलींनी त्याच्या आवडीच्या खेळांत करीयर करण्यास प्रोत्साहन देणारा आहे आणि लिंगभेद न मानता खेळात चमकण्यासाठी प्रोत्साहन देणारा असा हा खेळ आहे. 
 • केसरी सुध्दा सामाजिक दबावापुढे न झुकता शिकत आहे आणि मी या गोष्टीला नेहमीच प्रोत्साहन देत असते. मी या टिमला शुभेच्छा देते'.


भारतीय रेल्वेत ‘ग्रुप डी’ पदांसाठी मोठी भरती :
 • रेल्वेत ग्रुप-डी पदासाठी तब्बल एक लाख जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रेल्वेच्या या भरतीत सवर्णांना १० टक्के आरक्षण दिले जाणार आहे.
 • RRC Group D Level-1 या मार्फत नव्या उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यामध्ये ट्रॅक मेंटेनर ग्रेड ४, टेक्निकल डिपार्टमेंट्समध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर, मॅकेनिकल आणि सहायक हेल्पर या जागांसाठी हि भरती घेण्यात येणार आहे.
 • २३ फेब्रुवारी रोजी रेल्वे विभागाच्या वतीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. १२ मार्च हि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 
 • ऑनलाईन अर्जासोबत परीक्षेचे ५०० रुपये एवढे शुल्क आकारले जाणार आहे. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी तसेच महिलांसाठी परीक्षेचे शुल्क हे २५० रुपये आकारले जाणार आहे.


बिहार राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री वृद्धजन पेंशन योजना’
 • वृद्धांसाठीची एक सार्वत्रिक निवृत्तीवेतन योजना जाहीर केली आहे.
 • जी 60 हून अधिक वय असलेल्या सर्व लोकांसाठी आहे.
 • लागू दिनांक :- 1 एप्रिल 2019 योजनेमधून सरकारी सेवांमधून सेवानिवृत्त होणार्या ज्येष्ठ नागरिकांना वगळले आहे. (400 रुपये मासिक निवृत्तीवेतन दिले जाणार.)


ग्रीन बुक आणि फर्स्ट मॅनसाठी 4 ऑस्कर
 • रिलायन्स एंटरटेनमेंटचे अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील च्या स्टीव्हन स्पीलबर्ग आणि पार्टिसिपंट मीडिया यांच्या संयुक्त उपक्रमाने ऍकॅडमी ऍवॉर्डसच्या सोहळ्यात चार पुरस्कारांवर नाव नोंदवून घसघशीत यश मिळवले. 
 • 'ग्रीन बुक' या पीटर फॅरेली दिग्दर्शित सिनेमाने बेस्ट पिक्चर ऑफ द इअर हा मानाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला. या चित्रपटासाठी माहेरशाला अली यांना बेस्ट सपार्ंटग ऍक्टर आणि निक वॅलेलोंगा, ब्रायन करी आणि पीटर फॅरेली यांना ओरिजनल स्क्रीनप्ले ऑस्कर देण्यात आला. 
 • रायन गॉसलिंग यांची भूमिका असलेल्या 'फर्स्ट मॅन' या सिनेमाला बेस्ट व्हिज्युअल इफेक्टसाठीचा ऑस्कर देण्यात आला.


शिक्षकांनाही लागू होणार सातवा वेतन आयोग :
 • अनुदानित खासगी शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक व कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबतचा सरकारचा निर्णय 22 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाला. 
 • त्यानुसार सरकारी कर्मचारीआणि शिक्षकांना एकाच वेळी सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.
 • वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिक्षकांना कधी सहा महिन्यांनी, तर कधी आठ महिन्यांनी लाभ मिळत असे. यंदा पहिल्यांदाच सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे.
 • तर या आदेशामुळे राज्यातील अनुदानित खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये आणि सैनिकी शाळांतील पूर्णवेळ शिक्षक, कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळेल.


भारताची नेमबाज अपुर्वी चंडेलाचा विश्वविक्रमासह ‘सुवर्ण’ वेध
 • नेमबाजीच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या अपुर्वी चंडेलाने 10 मी एअर रायफलमध्ये सुवर्णपदकजिंकले आहे.
  तर अपुर्वीने 252.9 गुणांसहीत केला विश्वविक्रमाची नोंद केली आहे.
 • तसेच दोन फेऱ्या शिल्लक असताना 0.8 गुणांचीआघाडी घेतली होती. चिनच्या झाओ रौझोने त्यानंतर 10.5 चा निशाणा साधला, परंतु अपुर्वीने त्याला 10.8च्या निशाण्याने प्रत्युत्तर देताना आघाडी 1.1 अशी वाढवली.
 • अखेरच्या फेरीत अपुर्वीने 10.5 गुणांची कमाई करताना विश्वविक्रम नोंदवला.
 • तर तिनो झाओच्या नावावर असलेला विक्रम मोडताना भारताच्या खात्यात सुवर्णपदक जमा केले.

Post a Comment

0 Comments