Daily Current Affiars 19 March 2019 (चालू घडामोडी)


प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री, राजभवनात घेतली शपथ
 • गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून गोव्याचे सभापती प्रमोद सावंत यांनी आज शपथ घेतली. त्यांच्यासोबत सुदीन ढवळीकर आणि विजय सरदेसाई या दोघांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात सावंत यांचा शपथविधी सोहळा पार पडला. 
 • गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झाल्यानंतर भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी सावंत यांची नियुक्ती करण्यात आली होती.
 • गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे कर्करोगाने निधन झाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी रविवारी रात्रभर गोवा भाजपची मॅरेथॉन बैठक पार पडली होती. या बैठकीला स्वत: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. 
 • मात्र सहा तासाच्या या बैठकीनंतरही मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला नव्हता. आज सायंकाळी पुन्हा भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यात सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रात्री उशिरा भाजप नेत्यांनी राजभवनमध्ये राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर राजभवनातच सावंत यांचा शपथविधी सोहळा पार पडला.


सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश पिनाकी सी. घोष देशाचे पहिले लोकपाल
 • लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून माजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोषयांची देशाच्या पहिल्या लोकपालपदी नियुक्त करण्यात आली आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा सोमवारी होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांकडून कळते. 
 • घोष यांनी आंध्र प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश म्हणून काम केले आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश आणि विरोधकांच्या टीकेनंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
 • लोकपाल नियुक्तीच्या निवड समितीने ही नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्य न्यायाधीश किंवा त्यांच्याद्वारे नियुक्त न्यायाधीश, विरोधी नेता, लोकसभा अध्यक्ष आणि एक निवड सदस्य असतो. 
 • सुप्रीम कोर्टात विरोधी नेता नसल्याने अशा स्थितीत विरोधी पक्षाच्या नेत्यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात येणार होते.
 • देशाचे पहिले लोकपाल नियुक्त करण्यात आलेलेन्या. पी. सी. घोष हे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश होते. तसेच आंध्र प्रदेश हायकोर्टाचे ते मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्यही आहेत. 
 • न्या. घोष आपल्या निर्णयांमध्ये मानवाधिकारांचे संरक्षणाबाबत वारंवार भाष्य करत असत. न्या. घोष यांना मानवाधिकार कायद्याचे विशेषतज्ज्ञ म्हणून ओळखले जाते.


महाराष्ट्रातील 6 मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान
 • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 58 पुरस्कार्थींना पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यात महाराष्ट्राच्या श्री अनिलकुमार नायक, डॉ. अशोकराव कुकडे, दिनयार कॉन्ट्रॅक्टर, मनोज वाजपेयी, डॉ. सुदाम काटे, शब्बीर सय्यद यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 शब्बीर सय्यद :
 • यांना पद्मश्री सामाजिक कार्य व प्राणी कल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शब्बीर सय्यद यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या पन्नास वर्षांपासून दुष्काळी भागातील गायींची देखभाल व त्यांना जगविण्याचे काम ते अव्याहतपणे करीत आहेत.
अनिलकुमार नाईक :
 • यांना पद्मविभूषण महाराष्ट्रातून व्यापार व उद्योग-पायाभूत सुविधा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे समूह अध्यक्ष अनिलकुमार नाईक यांना सर्वोच्च मानाच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. अशोक कुकडे :
 • यांना पद्मभूषण वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. कुकडे यांनी लातुर येथे विवेकानंद हॉस्पिटलची स्थापना केली व या माध्यमातून त्यांनी गरीब रूग्णांना रास्तदरात आरोग्य सुविधा पुरविण्याचे मोलाचे कार्य केले आहे.
अभिनेते दिनयार काँट्रॅक्टर :
 • यांना पद्मश्री प्रसिध्द अभिनेते दिनयार काँट्रॅक्टर यांनी कला व नाट्य क्षेत्रात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काँट्रॅक्टर हे विनोदी भूमिकांसाठी प्रसिध्द असून पारसी आणि गुजराती रंगभूमीवर त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
अभिनेता मनोज वाजपेयी :
 • यांना पद्मश्री कला व चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द अभिनेते मनोज वाजपेयी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. सुदाम काटे :
 • यांना पद्मश्री सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करून वैद्यकीय क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. सुदाम काटे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. सुदाम काटे हे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशातील आदिवासी भागांमध्ये सिकलसेल आजाराबाबत जनजागृती व उपचाराचे कार्य करीत आहेत.


“अल नागह 2019”: भारत आणि ओमान याचा संयुक्त युद्धसराव
 • दिनांक 13 मार्च 2019 रोजी भारत आणि ओमान यांच्या “अल नागह 2019” नावाच्या संयुक्त युद्धसरावाचा शुभारंभ झाला. 
 • भारतीय पायदळ आणि रॉयल आर्मी ऑफ ओमानी यांचा दोन आठवडे चालणारा हा सराव ओमानमध्ये निझवा येथील तळावर आयोजित करण्यात आला आहे. 
 • ओमान हा आशिया खंडातला अरबी द्वीपकल्पवरील एक देश आहे. मस्कट ही या देशाची राजधानी आहे आणि ओमानी रियाल हे राष्ट्रीय चलन आहे.

वाणिज्य मंत्रालयाचा ‘वुमॅनिया ऑन GeM’ पुढाकार
 • भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या ‘गव्हर्नमेंट 
 • ई-मार्केटप्लेस’ (GeM) कडून महिला उद्योजक आणि महिलांच्या स्वयंसेवी गटांना GeM या ऑनलाइन मंचावर विविध उत्पादने विकण्यास प्रोत्साहन देण्याकरिता ‘वुमॅनिया ऑन GeM’ नावाचा नवा कार्यक्रम चालवला जात आहे.
 • हा उपक्रम महिला उद्योजकांना आणि महिलांच्या स्वयंसेवी गटांना हस्तशिल्प आणि हातमाग, तागाची उत्पादने, गृह व कार्यालयाचे सुशोभीकरण अश्या विविध उत्पादनांची थेट विक्री करण्यास सक्षम करतो.

Post a Comment

0 Comments